
मनसुखभाई कोठारी नॅशनल स्कूल, कोंढवा, पुणे येथे सुरू असलेल्या या स्पर्धेच्या नवव्या व अंतिम फेरीत मयंक चुलेटने श्रद्धा पाडवेकरचा पराभव करत एकूण ८ गुणांसह निर्विवाद विजेतेपदावर आपले नाव कोरले. प्रद्युम्न मिश्रा याने सोहम लांगोरे याच्याशी बरोबरी साधत 7.5 गुण मिळवले. 54.5बुकोल्झ कट गुणसरासरीच्या आधारे त्याने द्वितीय स्थान पटकावले. कर्नाटकच्या समर्थ चौगुले याने महाराष्ट्राच्या लव्य अग्रवाल याच्याशी बरोबरी साधत 7.5गुण मिळवले.
51.5बुकोल्झ कट गुणसरासरीच्या आधारे त्याने तृतीय क्रमांक मिळवला. यावेळी स्पर्धा आयोजन समितीच्या अध्यक्षा वंदना हलकुडे, आयोजन सचिव नागनाथ हलकुडे, स्पर्धा संचालक योगेश महामुनी, प्राचार्या वर्षा कोकिळ, मुख्य पंच आयए नितीन शेणवी, उपमुख्य पंच आयए आम्रीश तल्लू, राजेंद्र माने, मॅनवेल दास, मदन जुनेजा आदी मान्यवर उपस्थित होते.
लाव्या अग्रवाल(७.५गुण)(महाराष्ट्र)बरोबरी वि.समर्थ चौगुले(७.५गुण)(कर्नाटक); श्रद्धा पाडवेकर (७गुण)(महाराष्ट्र)पराभूत वि.मयंक चुलेट(८गुण)(महाराष्ट्र); सोहम लांगोरे(७गुण)(महाराष्ट्र)बरोबरी वि.प्रद्युम्न मिश्रा(७.५गुण)(महाराष्ट्र); ध्रुव गांधी (७.५गुण)(महाराष्ट्र)वि.वि.प्रद्योत मिश्रा (६.५ गुण)(महाराष्ट्र); रेयांश कामेरकर (७गुण)(महाराष्ट्र)बरोबरी वि.पालेपु संयुक्ता(७ गुण)(महाराष्ट्र); अभिराम देवुलापल्ली (७गुण)(महाराष्ट्र)वि.वि.तन्वी कुलकर्णी (६गुण)(महाराष्ट्र); रोहन ढोरे(६.५गुण)(महाराष्ट्र)बरोबरी वि.पुरुषोत्तम आगळे(६.५गुण)(महाराष्ट्र); अर्णव लाड (६गुण)(महाराष्ट्र)पराभूत वि.सुश्रुत नानल (७गुण)(महाराष्ट्र)
विहान देशमुख (६गुण)(महाराष्ट्र) पराभूत वि.इवान दुबे (७गुण)(महाराष्ट्र); जयकृष्ण चंद्रमौळी(६.५गुण)(महाराष्ट्र)बरोबरी वि.सुधन देव (६.५गुण)(महाराष्ट्र); सुमीत पेठे(६गुण)(महाराष्ट्र)पराभूत वि.मिहिर वैद्य (७गुण) (महाराष्ट्र); पार्थ साळुंखे (६गुण)(महाराष्ट्र) पराभूत वि.चतुर्थी परदेशी(७गुण)(महाराष्ट्र); मास्टर हिमाक्ष चौधरी(६.५गुण) बरोबरी वि.सर्वेश पोतदार(६.५गुण)(महाराष्ट्र); किरण कांबळे(६गुण)(महाराष्ट्र)बरोबरी वि.आराध्या ठाकूरदेसाई (६गुण) (महाराष्ट्र); आरुष शिंदे (६.५गुण) (महाराष्ट्र)वि.वि. यशस्वी गौतम (५.५गुण)(महाराष्ट्र).
स्पर्धेतील विजेत्या मयंक चुलेट याला आकर्षक करंडक व 60,000रुपये, उपविजेत्या प्रद्युम्न मिश्रा याला करंडक व 40,000 रुपये, तर तृतीय क्रमांकाच्या समर्थ चौगुले याला करंडक व 20,000 रुपये अशी पारितोषिके प्रदान करण्यात आली. स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ दाेन वेळचे शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त करणारे ज्येष्ठ बुद्धिबळपटू जयंत गोखले यांच्या हस्ते संपन्न झाला.
Ans: महाराष्ट्राच्या मयंक चुलेट याने स्वर्गीय भारतबाई हलकुडे मेमोरियल अनस्टॉपेबल एलबीएचएम १७०० रेटिंगखालील बुद्धिबळ स्पर्धेचे विजेतेपद पटकावले.
Ans: प्रद्युम्न मिश्रा याने सोहम लांगोरे याच्याविरुद्धचा सामना बरोबरीत सोडवत ७.५ गुण मिळवले.