Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 20 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharastra Politics |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पुण्यात खाद्यपदार्थ विक्रेत्यांना FDAचा दणका! सात महिन्यांत २६.३३ कोटींचे अन्नपदार्थ जप्त; ४०५ जणांना अटक

पुणे विभागात अन्नभेसळीविरोधात अन्न व औषध प्रशासनाने एप्रिल ते ऑक्टोबरदरम्यान धडक कारवाई केली. सात महिन्यांत ६,९२४ आस्थापनांची तपासणी करून २६.३३ कोटी रुपयांचा अन्नसाठा जप्त करण्यात आला असून, ३०४ गुन्हे दाखल करत ४०५ जणांना अटक करण्यात आली.

  • By प्रीति माने
Updated On: Nov 20, 2026 | 08:50 PM
FDA Tukaram Munde Action in pune

FDA Tukaram Munde Action in pune

Follow Us
Follow Us:
  • अन्न व औषध प्रशासनाची एप्रिल ते ऑक्टोबरदरम्यान कारवाई
  • ६,९२४ आस्थापनांची तपासणी; २,५३१ सुधारणा नोटिसा
  • हॉटेल, रेस्टॉरंटच्या १२१ परवान्यांचे निलंबन
FDA Action in pune : सुनयना सोनवणे : पुणे : अन्नपदार्थांच्या भेसळीला आळा घालण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाकडून (एफडीए) सुरू असलेल्या कारवाईत पुणे विभागात गेल्या सात महिन्यांत २६ कोटी ३३ लाख रुपयांचा अन्नपदार्थांचा साठा जप्त करण्यात आला आहे. या कालावधीत ६ हजार ९२४ अन्नविक्री व उत्पादन आस्थापनांची तपासणी करण्यात आली असून, नियमांचे उल्लंघन करणाऱ्या २ हजार ५३१ आस्थापनांना सुधारणा नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. विविध प्रकरणांत ४०५ जणांना अटक करण्यात आली असून, ३०४ गुन्हे दाखल झाले आहेत.

अन्न व औषध प्रशासनाने १ एप्रिल ते ३१ ऑक्टोबर २०२६ या कालावधीतील राज्यभरातील कारवाईची आकडेवारी जाहीर केली आहे. त्यानुसार पुणे विभागात तपासणी आणि जप्तीच्या कारवाईवर भर देण्यात आला. या काळात विभागातील २२४ आस्थापनांचे परवाने निलंबित करण्यात आले आहेत. राज्यातील सात विभागांच्या तुलनेत पुण्यातील तपासण्यांची संख्या सर्वाधिक आहे. तसेच गुन्हे दाखल करण्याच्या आणि अटक करण्याच्या बाबतीतही पुणे विभाग आघाडीवर आहे.

दूध आणि दुग्धजन्य पदार्थांच्या तपासणीत पुणे विभागात ३६२ आस्थापनांची तपासणी करून ४७३ नमुने घेण्यात आले. त्यापैकी सहा नमुने असुरक्षित आढळले. या कारवाईत १ लाख ५७ हजार ९६५ लिटर दूध जप्त करण्यात आले असून, त्याची किंमत ६६.७३ लाख रुपये आहे. या प्रकरणांत चार गुन्हे दाखल करून ४६ जणांना अटक करण्यात आली.

Rohit Pawar reply on Narco test : ‘आजच्या आज माझी नार्को टेस्ट करा…!’ रोहित पवारांची एक्स पोस्ट चर्चेत

खाद्यतेलाच्या तपासणीत २४१ आस्थापनांची पाहणी करून २३३ नमुने घेण्यात आले. यामध्ये २२ परवाने निलंबित करण्यात आले असून, २ कोटी ६० लाख ७४ हजार रुपयांचा साठा जप्त करण्यात आला. मसाले व मसाल्याच्या पदार्थांच्या तपासणीत १९८ आस्थापनांची तपासणी करण्यात आली. त्यातून ३२१ नमुने घेण्यात आले. या कारवाईत ५ कोटी ६१ लाख ५० हजार रुपयांचा साठा जप्त झाला. हॉटेल, रेस्टॉरंट आणि धाब्यांवरील कारवाईत पुणे विभागातील १,५२८ आस्थापनांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी ८६९ आस्थापनांना सुधारणा नोटिसा बजावण्यात आल्या, तर १२१ परवाने निलंबित करण्यात आले.

PM Modi Baramati Visit Cancel : पंतप्रधान नरेंद्र मोदींचा बारामती दौरा रद्द, पण कारण काय? शरद पवार स्वतः करणार उद्घाटन

पुणे विभागातील FDAची कारवाई

कारवाईचा प्रकार – संख्या / रक्कम

  • आस्थापनांची तपासणी – ६,९२४
  • सुधारणा नोटिसा – २,५३१
  • परवाने निलंबित – २२४
  • जप्त अन्नसाठा – २६.३३ कोटी रुपये
  • दाखल गुन्हे – ३०४
  • अटक व्यक्ती – ४०५
  • दूध जप्त – १,५७,९६५ लिटर
  • हॉटेल-रेस्टॉरंट तपासणी – १,५२८
💡

Frequently Asked Questions

  • Que: पुणे विभागात सात महिन्यांत किती रुपयांचा अन्नसाठा जप्त करण्यात आला?

    Ans: अन्न व औषध प्रशासनाच्या कारवाईत २६ कोटी ३३ लाख रुपयांचा अन्नसाठा जप्त करण्यात आला.

  • Que: पुणे विभागात किती आस्थापनांची तपासणी करण्यात आली?

    Ans: १ एप्रिल ते ३१ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत ६,९२४ आस्थापनांची तपासणी करण्यात आली.

  • Que: अन्नभेसळीच्या कारवाईत किती जणांना अटक झाली?

    Ans: या कालावधीत विविध प्रकरणांत ४०५ जणांना अटक करण्यात आली असून ३०४ गुन्हे दाखल करण्यात आले.

Web Title: Tukaram mundhe fda action pune 2633 crore worth food products seized 405 arrested nrpm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 20, 2026 | 08:49 PM

Topics:  

  • FDA Action
  • FDA Raid
  • pune news

संबंधित बातम्या

Pune FDA News : हेल्थ सप्लिमेंट्सवर आता FDA ची करडी नजर; पुणे विभागातील पाच आस्थापनांवर छापे, ३०.५७ लाखांचा साठा जप्त
1

Pune FDA News : हेल्थ सप्लिमेंट्सवर आता FDA ची करडी नजर; पुणे विभागातील पाच आस्थापनांवर छापे, ३०.५७ लाखांचा साठा जप्त

Chess: महाराष्ट्राच्या मयंक चुलेटची दमदार खेळी! बुद्धिबळ स्पर्धेत ८ पॉईंट्ससह पटकावले अव्वल स्थान
2

Chess: महाराष्ट्राच्या मयंक चुलेटची दमदार खेळी! बुद्धिबळ स्पर्धेत ८ पॉईंट्ससह पटकावले अव्वल स्थान

Pune News : पुण्यात तिसऱ्या दिवशीच रोखला ‘बुलडोझर’; व्यापाऱ्यांनी विरोध केल्यामुळे अतिक्रमण कारवाई थांबली
3

Pune News : पुण्यात तिसऱ्या दिवशीच रोखला ‘बुलडोझर’; व्यापाऱ्यांनी विरोध केल्यामुळे अतिक्रमण कारवाई थांबली

Pune Weather: माणसं काय झाडं पण गारठली! तापमान ११.३ अंशांवर; पुढील दोन दिवसांत…
4

Pune Weather: माणसं काय झाडं पण गारठली! तापमान ११.३ अंशांवर; पुढील दोन दिवसांत…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.