
Pune Encroachment Action Pune Municipal Corporation PMC
महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत शहरातील अतिक्रमणांच्या विराेधात नगरसेवकांनी ‘अावाज ’उठविला हाेता. प्रशासनावर झालेल्या जाेरदार टिकेमुळे महापालिका आयुक्त नवल किशाेर राम हे ‘अॅक्शन माेड’वर आले. मैदानात उतरत त्यांनी अतिक्रमणांच्या विराेधात पुढील महिना भर महापालिकेचा ‘बुलडाेझर’ चालणार असल्याचे नमूद करीत काेणताही दबाव सहन करू नका, असा आदेश अधिकाऱ्यांना दिला. त्याचवेळी अतिक्रमण कारवाईत हस्तक्षेप करणाऱ्यांची नावे जाहीर करण्याचा इशाराही त्यांनी दिला हाेता. परंतु लक्ष्मी रस्त्यावरील कारवाईतच महापालिकेच्या ‘बुलडाेझर’ला ब्रेक लागला.
शहरातील इमारतींच्या फ्रंट मार्जिन आणि साईट मार्जिनमध्ये करण्यात आलेली अनधिकृत बांधकामे तसेच अतिक्रमणे हटविण्याचे आदेश महापालिका आयुक्तांनी दिल्यानंतर प्रशासनाने लक्ष्मी रस्त्यावर कारवाईला सुरुवात केली. मात्र, प्रत्यक्ष कारवाईदरम्यान अनधिकृत बांधकामे आणि पार्किंगच्या जागा मोकळ्या करण्याऐवजी दुकानांचे फलक काढण्यावरच महापालिका प्रशासनाचा भर राहिल्याचे चित्र दिसून आले. व्यापाऱ्यांच्या विरोधानंतर आणि राजकीय हस्तक्षेपाच्या प्रयत्नांमुळे ही कारवाई अर्धवट थांबविण्यात आली. त्यामुळे आयुक्तांच्या आदेशानुसार होणाऱ्या कारवाईच्या अंमलबजावणीबाबतच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
बेलबाग चौकातून या मोहिमेला सुरुवात करण्यात आली. लक्ष्मी रस्त्यावर अनेक ठिकाणी इमारतींच्या पार्किंगच्या जागांमध्ये दुकाने थाटण्यात आली आहेत. काही ठिकाणी फ्रंट मार्जिन आणि साईट मार्जिनमध्ये कायमस्वरूपी स्वरूपाची बांधकामे करण्यात आली आहेत. लक्ष्मी रस्त्यावरील व्यापाऱ्यांनी कारवाईला विराेध केला.
सभागृहात पडसाद उमटले
लक्ष्मी रस्त्यावर अतिक्रमणविरोधी कारवाई सुरू असतानाच महापालिकेची सर्वसाधारण सभा सुरू होती. लक्ष्मी रस्त्यावर कारवाई सुरू झाल्याची माहिती सभागृहातील काही नगरसेवकांना मिळाली. त्यानंतर या कारवाईबाबत वरिष्ठ नेत्यांना माहिती देण्यात आली. कारवाई थांबविण्यासाठी काही लोकांकडून प्रयत्न सुरू झाल्याची चर्चा महापालिका वर्तुळात होती. या घडामोडींमुळे सर्वसाधारण सभेतील कामकाजही काही काळ प्रभावित झाले. सुमारे वीस मिनिटे सभागृहात कोणतीही चर्चा झाली नाही. या काळात संबंधित अधिकाऱ्यांना महापालिकेतील वरिष्ठ पदाधिकाऱ्यांचे दूरध्वनी येऊ लागल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर लक्ष्मी रस्त्यावरील कारवाई अर्धवट थांबविण्यात आली.
पार्किंग, साईड मार्जिनमधील दुकानांना अभय का?
लक्ष्मी रस्त्यावरील कारवाईदरम्यान काही ठिकाणी पार्किंगच्या जागांवरील अतिक्रमणांवर कारवाई करण्यात आली. मात्र, अनेक ठिकाणी पार्किंगच्या जागांमध्ये सुरू असलेल्या दुकानांबाबत ठोस कारवाई झाल्याचे दिसून आले नाही. त्यामुळे या अतिक्रमणांकडे प्रशासनाने दुर्लक्ष का केले, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
Ans: इमारतींच्या फ्रंट मार्जिन, साईड मार्जिन आणि पार्किंगच्या जागांमध्ये झालेली अनधिकृत बांधकामे व अतिक्रमणे हटविण्याच्या आदेशानुसार ही कारवाई सुरू करण्यात आली.
Ans: व्यापाऱ्यांनी कारवाईला विरोध केला. तसेच कारवाई थांबविण्यासाठी राजकीय स्तरावर प्रयत्न झाल्याची चर्चा महापालिका वर्तुळात होती. त्यानंतर कारवाई अर्धवट थांबविण्यात आली.
Ans: पार्किंगच्या जागा, फ्रंट मार्जिन आणि साईड मार्जिनमध्ये उभारलेली दुकाने व कायमस्वरूपी बांधकामे याबाबत प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत.