Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate |
  • bigg boss 19
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

शिवसेना भवनावरून गरमागरमी; कार्यालयात बसून टक्केवारीचे काम, राणांचा आरोप; उद्धव ठाकरे बाळासाहेबांच्या विचाराचे राहिले नाहीत तर…

येणाऱ्या काळात शिवसेना भवन एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडे आले पाहिजे. तसेच, उद्धव ठाकरे यांनाच शिंदे यांना चावी द्यावी लागणार आहे, असे राणा म्हणाले. उद्धव ठाकरे हे बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराचे राहिलेले नाहीत. ते सोनिया गांधी आणि काँग्रेसच्या विचाराचे झाले आहेत. उद्धव ठाकरे यांनी काँग्रेसचा विचार अंगीकारून बाळासाहेबांच्या विचाराची हत्या केली म्हणून एकनाथ शिंदे यांच्यासारखा खरा शिवसैनिक बाहेर आला आहे, असेही राणा यांनी सांगितले.

  • By Ganesh Mate
Updated On: Dec 29, 2022 | 02:20 PM
शिवसेना भवनावरून गरमागरमी; कार्यालयात बसून टक्केवारीचे काम, राणांचा आरोप; उद्धव ठाकरे बाळासाहेबांच्या विचाराचे राहिले नाहीत तर…
Follow Us
Close
Follow Us:

मुंबई : उद्धव ठाकरेंचे (Uddhav Thackeray) नगरसेवक महापालिकेतील शिवसेनेच्या ऑफिसात बसून टक्केवारीचे राजकारण करत होते. तसेच, शिवसेनेच्या (Shivsena) कार्यालयाचा दुरुपयोग होत असल्याचे सरकारच्या लक्षात आले. महापालिकेवर प्रशासक आहे; मात्र, नगरसेवकांचे नगरसेवकपद राहिलेले नाही. असे असतानाही कार्यालयात बसून टक्केवारीचे काम केले जात होते. त्यामुळे ते मोडून काढण्यासाठी महापालिकेतील शिवसेनेच्या कार्यालयाला सील लावण्यात आले. त्यामुळे टक्केवारीचा धंदा बंद होईल, असा दावा रवी राणा (Ravi Rana) यांनी केला.

येणाऱ्या काळात शिवसेना भवन एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या शिवसेनेकडे आले पाहिजे. तसेच, उद्धव ठाकरे (Uddav Thackeray) यांनाच शिंदे यांना चावी द्यावी लागणार आहे, असेही राणा म्हणाले. उद्धव ठाकरे हे बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराचे राहिलेले नाहीत. ते सोनिया गांधी आणि काँग्रेसच्या विचाराचे झाले आहेत. उद्धव ठाकरे यांनी काँग्रेसचा विचार अंगीकारून बाळासाहेबांच्या विचाराची हत्या केली म्हणून एकनाथ शिंदे यांच्यासारखा खरा शिवसैनिक बाहेर आला आहे, असेही राणा यांनी सांगितले.

शिवसेना भवन हे पक्षाच्या नावाने आहे. जेव्हा पक्षाचे बहुमत ज्याकडे असते त्याच्याकडे पक्षाचा ताबा मिळतो. शिंदे यांच्याकडे ८० ते ९० टक्के पक्ष आहे. ४० आमदार शिंदे गटात असून अनेक नगरसेवक आणि पदाधिकारीही शिंदे गटात आले आहेत. त्यामुळे शिंदे यांना शिवसेना भवन मिळण्यात काहीच अडचण नाही, असा दावाही त्यांनी केला. महापालिका निवडणूक जाहीर झाल्यावर अनेक नगरसेवक उद्धव ठाकरेंना सोडून येतील. ८० ते ९० टक्के माजी नगरसेवक शिंदेकडे येतील आणि शिंदेंचा झेंडा महापालिकेवर फडकेल, असेही भाकित राणा यांनी केले आहे.

शिवसेना भवनावर दावा करण्याचे विधान नाही
दादरचे शिवसेना भवन ताब्यात घेण्याचे आमच्या डोक्यात नाही. विचारात नाही आणि मनातही नाही. आम्ही कधी तो विषयही काढला नाही. आमच्या बैठकीत ठरले की दुसरे कार्यालय तयार करायचे. आमच्या बैठकीत कधी शिवसेना भवनचा विषय निघत नाही. आम्ही कधीच त्यावर ब्र शब्दही काढला नाही. आमच्या कुणाच्या तोंडून शिवसेना भवनावर दावा करण्याचे विधान निघाले असेल तर सांगा, असे आव्हानच भरत गोगावले यांनी दिले. आमच्या बापांमध्ये हिंमत होती म्हणून आम्ही तयार झालो. खऱ्या बापाचे होतो म्हणून तुम्हाला हिसका दाखवला. आमच्या नादी कुणी लागू नका. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा नाद तर कोणी करायचाच नाही, असा इशारा गोगावले यांनी दिला.

कोणत्या कायद्याने पक्ष कार्यालये सील केली; संजय राऊतांचा सवाल
मुंबई महापालिकेत शिवसेनेचे बहुमत आहे. सगळ्या पक्ष कार्यालयांना कोणत्या कायद्याने सील लावण्यात आले, असा प्रश्न संजय राऊत यांनी उपस्थित केला. शिवसेनेच्या कार्यालयात घुसखोर घुसतात, त्यानंतर पालिका प्रशासन टाळे लावते, हे सगळे कुणाच्या आदेशाने चालल आहे, असा प्रश्न राऊतांनी उपस्थित केला आहे. ठोकशाहीच्या बाबत ठाकरे गटाशी स्पर्धा करु नका, असा इशाराही राऊत यांनी दिला.

Web Title: Heat from shiv sena bhavan percentage work sitting in office ranas allegation if uddhav thackeray does not follow balasahebs thinking nrgm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 29, 2022 | 02:20 PM

Topics:  

  • Eknath Shinde
  • Ravi Rana
  • shivsena
  • Uddhav Thackeray

संबंधित बातम्या

आमचा पक्ष नेत्यांच्या नाही तर कार्यकर्त्यांच्या बळावर चालणारा, भाजप जिल्हा उपाध्यक्ष संतोष चोथे यांचे प्रतिपादन
1

आमचा पक्ष नेत्यांच्या नाही तर कार्यकर्त्यांच्या बळावर चालणारा, भाजप जिल्हा उपाध्यक्ष संतोष चोथे यांचे प्रतिपादन

Shivsena : राज ठाकरेंना मोठा झटका, दोन माजी नगरसेवकांचा शिवसेनेत प्रवेश
2

Shivsena : राज ठाकरेंना मोठा झटका, दोन माजी नगरसेवकांचा शिवसेनेत प्रवेश

Thane Politics: ठाण्यात प्रभागरचनेवरून गणेश नाईक- एकनाथ शिंदेंमध्ये वादाचा भडका; ठाकरे गटही आक्रमक
3

Thane Politics: ठाण्यात प्रभागरचनेवरून गणेश नाईक- एकनाथ शिंदेंमध्ये वादाचा भडका; ठाकरे गटही आक्रमक

Shinde-Fadnavis Dispute: शिंदे–फडणवीस यांच्यात नाराजी; नेमकं बिनसलं कुठे?
4

Shinde-Fadnavis Dispute: शिंदे–फडणवीस यांच्यात नाराजी; नेमकं बिनसलं कुठे?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.