Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 6 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Weather Update: राज्यात धो-धो पाऊस बरसणार! ‘या’ तारखा कॅलेंडरमध्ये आत्ताच मार्क करा

Weather Update: ऑगस्ट महिन्यात पावसाने दडी मारल्याने महाराष्ट्रातील शेतकरी चिंतेत आहेत. खरीप पिकांना पाण्याची गरज असताना पावसाची प्रतीक्षा कायम आहे. मात्र हवामान तज्ज्ञ पंजाबराव डख यांच्या अंदाजानुसार, गणेशोत्सवाच्या काळात राज्यात पावसाचे पुनरागमन होण्याची शक्यता आहे.

  • By Riddhi Vanne
Updated On: Sep 06, 2026 | 05:27 PM
Weather Update: राज्यात धो-धो पाऊस बरसणार! (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Weather Update: राज्यात धो-धो पाऊस बरसणार! (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Follow Us
Follow Us:
  • 13 ते 18 सप्टेंबरदरम्यान राज्यात जोरदार पावसाचा अंदाज.
  • विदर्भ आणि कोकणात पावसाचा जोर अधिक राहण्याची शक्यता.
  • खरीप पिकांना पावसामुळे मोठा दिलासा मिळण्याची अपेक्षा.
 

महाराष्ट्रात गेल्या महिनाभरापासून पावसानं पूर्णपणे पाठ फिरवली आहे. पूर्ण ऑगस्ट महिना कोरडाच गेला. एक थेंब पण नीट पडला नाही. त्यामुळे शेतकरी पुरता काळजीत पडला आहे. खरीप पिकं माना टाकू लागली आहेत. शेतकऱ्यांचे डोळे रोज आभाळाकडे लागलेले असतात, पण पाऊस काही येत नाही.पण आता टेन्शन घेऊ नका, कारण शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. हवामान तज्ज्ञ पंजाबराव डख यांनी पावसाबद्दल नवीन अंदाज दिला आहे. त्यांच्या मते गणपती बाप्पाच्या आगमनासोबतच पावसाचं पण जोरदार आगमन होणार आहे. Weather Update:

13 ते 18 सप्टेंबरला मुसळधार पाऊस

पंजाबराव डख यांनी सांगितलं आहे की, 13 सप्टेंबर ते 18 सप्टेंबर या पाच दिवसात राज्यात दमदार पाऊस पडणार आहे. इतका पाऊस पडेल की शेतातून पाणी बाहेर निघेल, अशी परिस्थिती असेल. गणेशोत्सवाच्या काळात राज्यभर चांगला पाऊस होईल.फक्त या पाच दिवसातच नाही, तर त्याच्या आधी पण राज्यात काही ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस पडू शकतो.

सप्टेंबर महिना शेतकऱ्यांसाठी चांगला जाणार आहे. ऑगस्टने जो हिरमोड केला, तो सप्टेंबर भरून काढेल असं दिसतंय.विदर्भ आणि कोकणात पावसाचा जोर जास्त असणार आहे. पण उर्वरित महाराष्ट्रात पण चांगला पाऊस होईल. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांच्या पिकांना पाण्याची गरज आहे, त्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

देशभरात 22 राज्यांना अलर्ट

दुसरीकडे भारतीय हवामान विभागाने पण मोठा इशारा दिला आहे. उद्या 7 सप्टेंबर सोमवारपासून देशातल्या तब्बल 22 राज्यांमध्ये अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. हवामान खात्याने लोकांना सतर्क राहायला सांगितलं आहे.

या 22 राज्यांमध्ये उत्तर प्रदेश, दिल्ली, बिहार, हरियाणा, राजस्थान, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, पंजाब, जम्मू-काश्मीर, झारखंड, मध्य प्रदेश, छत्तीसगड, पश्चिम बंगाल, ओडिशा, आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक, तामिळनाडू, केरळ, गुजरात, महाराष्ट्र, आसाम, त्रिपुरा आणि मेघालय या राज्यांचा समावेश आहे.या काळात वाऱ्याचा वेग पण जास्त असणार आहे. ताशी 50 ते 60 किलोमीटर वेगाने वारे वाहतील असा अंदाज आहे.

डीजेच्या कर्णकर्कश आवाजाने मुक्या जीवांची घुसमट; प्राण्यांमध्ये कानाच्या विकारांत ३० ते ४० टक्क्यांनी वाढ

हवामान विभागाने इशारा

त्यामुळे मच्छीमार बांधवांनी समुद्रात जाऊ नये, असा इशारा हवामान विभागाने दिला आहे. समुद्र खवळलेला असणार आहे. एकंदरीत काय तर ऑगस्ट महिना जरी कोरडा गेला असला तरी सप्टेंबरमध्ये पाऊस चांगला होणार आहे.

पालिका शिक्षकांवर कामाचा ताण; बीएलओ, एसआयआरनंतर आता प्रशिक्षणाचा नवा बोजा

पंजाबराव डख यांचा अंदाज आतापर्यंत बराच खरा ठरला आहे, त्यामुळे शेतकऱ्यांनी आता थोडं निश्चिंत व्हायला हरकत नाही. गणपती बाप्पा येताना पावसाला पण सोबत घेऊन येणार आहे, त्यामुळे बळीराजाच्या चेहऱ्यावर पुन्हा हास्य येईल.

 

Web Title: Heavy rain expected from september 13 to 18 says panjabrao dakh

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 06, 2026 | 05:27 PM

Topics:  

  • Maharashtra Weather
  • maharashtra weather alert
  • Mumbai Rain

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.