Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Weather Update : सांगलीत गारपीट; तासगाव, वाळवा तालुक्यात वादळी वाऱ्यासह पावसाची दमदार हजेरी

कराड, कोल्हापूरमध्ये सलग दुसऱ्या दिवशी अवकाळी सरी बरसल्या. त्यामुळे वाळवणासाठी ठेवलेली ज्वारी, हरभरा भरण्यासाठी शेतकऱ्यांची धांदल उडाली. अनपेक्षित पावसामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली.

  • By कृपादान आवळे
Updated On: Apr 03, 2025 | 07:52 AM
पावसाबाबत महत्त्वाची बातमी; अंदमानात 13 मे रोजी मान्सून होणार दाखल

पावसाबाबत महत्त्वाची बातमी; अंदमानात 13 मे रोजी मान्सून होणार दाखल

Follow Us
Close
Follow Us:

सांगली : अंगाची लाहीलाही करणाऱ्या तीव्र उकाड्यानंतर तासगाव, वाळवा तालुक्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने दमदार हजेरी लावली. तासगाव तालुक्यातील मणेराजुरी परिसरात गारपीटीसह झालेल्या पावसाने अंतिम टप्प्यात असणाऱ्या द्राक्ष हंगामावर संकट उभे ठाकले आहे.

सांगलीत बुधवारी सकाळपासून ढगाळ हवामान होते. यामुळे तापमान 36 अंश सेल्सिअस असताना 40 अंश भासत होते. हवेतील आर्द्रता 40 टक्के असताना सायंकाळी ढगांची आकाशात गर्दी होऊन पूर्वेकडील वाऱ्यासोबत पावसाचे आगमन झाले. तासगाव तालुक्यातील मणेराजुरी परिसरात गारपीटसह पाऊस झाला. तर खानापूर भागांत पाऊस झाला. तालुक्यातील काही भागांत वाळवा तालुक्यात सलग दुसऱ्या दिवशी पावसाच्या सरी कोसळल्या. वादळी वाऱ्यासह विजेच्या गडगडाटासह पावसाच्या सरी बरसल्या.

वादळी वाऱ्यामुळे भाजीपाल्याचेही नुकसान झाले. तासगाव तालुक्यातील द्राक्ष हंगाम आता अंतिम टप्प्यात असून, काही बागांमध्ये तयार द्राक्षे आहेत. मणेराजुरी परिसरात गारपीट झाल्याने तयार मालातील मणी तडकण्याची भीती व्यक्त होत आहे.

मळणीदरम्यान उडाली शेतकऱ्यांची धांदल

बुधवारी दिवसभर उन्हाचा चांगला कडाका बसत होता. उकाडा तीव्रतेने जाणवत होता. वाळवा तालुक्यातील वारणा पट्ट्यात सायंकाळी सलग दुसऱ्या दिवशी अवकाळी पावसाच्या सरी बरसल्याने ग्रामीण भागातील जनतेला उकाड्यापासून दिलासा मिळाला. तर दुसरीकडे गहू, हरभरा, शाळू याची मळणी चालू आहे. यामुळे शेतकरी वर्गाची या अवकाळी पावसामुळे एकच धांदल उडाली.

कराड, कोल्हापूरमध्ये सलग दोन दिवस अवकाळी

कराड, कोल्हापूरमध्ये सलग दुसऱ्या दिवशी अवकाळी सरी बरसल्या. त्यामुळे वाळवणासाठी ठेवलेली ज्वारी, हरभरा भरण्यासाठी शेतकऱ्यांची धांदल उडाली. अनपेक्षित पावसामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली. वाशिम जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशीही वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस पडला. या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला असून, नागरिकांना उकाड्यापासून काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे.

शेतकऱ्यांची वाढली चिंता

या अनपेक्षित पावसामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली असून अवकाळी पावसाचा फटका काढणीस आलेल्या पिकांना बसला आहे. बीजवाई कांदा, हळद, ज्वारी यांसह आंबा बागांना मोठे नुकसान झाले आहे. शेतकऱ्याच्या हातातोंडाशी आलेला घास या अवकाळी पावसामुळे हिरावल्या गेल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत.

Web Title: Heavy rain with strong winds in tasgaon and walwa taluka nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 03, 2025 | 07:52 AM

Topics:  

  • Climate Change
  • maharashtra weather update
  • Sangli Rain

संबंधित बातम्या

Weather Update : खराब हवामानामुळे यंदाच्या पावसात व्यत्यय; कमी पावसाच्या अंदाजामुळे दुष्काळाचे सावट
1

Weather Update : खराब हवामानामुळे यंदाच्या पावसात व्यत्यय; कमी पावसाच्या अंदाजामुळे दुष्काळाचे सावट

Weather Update : हवामानात होतोय मोठा बदल; येत्या 10 एप्रिलपर्यंत मेघगर्जनेसह पाऊस होणार…
2

Weather Update : हवामानात होतोय मोठा बदल; येत्या 10 एप्रिलपर्यंत मेघगर्जनेसह पाऊस होणार…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.