Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 22 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharastra Politics |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Climate Summit : एकमत नाहीच; जीवाश्म इंधनावरून झाला वाद, संयुक्त राष्ट्रांची हवामान परिषद का फिस्कटली ?

Climate Summit : जीवाश्म इंधनांचा वापर कमी करण्याच्या मुद्द्यावर देशांमध्ये एकमत न झाल्याने तुर्कीतील COP31 हवामान परिषद कोणत्याही अंतिम राजकीय कराराविना संपली. हवामान निधी आणि ऊर्जा धोरणांवरील मतभेदही कायम राहिले.

  • By Chaitanya Pisal
Updated On: Nov 22, 2026 | 08:49 PM
फोटो सौजन्य सोशल मीडिया

फोटो सौजन्य सोशल मीडिया

Follow Us
Follow Us:
  • जीवाश्म इंधनाच्या मुद्द्यावरून संघर्ष
  • तेल उत्पादक देशांचा विरोध
  • हवामान निधीवरही मतभेद
Climate Summit : तुर्कीतल्या अंताल्या येथे पार पडलेली संयुक्त राष्ट्रांची वार्षिक हवामान परिषद ( COP ३१ ) अखेर कोणत्याही महत्वपूर्ण सामूहिक कराराविना संपली आहे . जीवाश्म इंधनाचा वापर टप्प्याटप्याने कमी करण्याच्या मुद्द्यावर जगातील देशांमध्ये एकमत होऊ शकले नाही . दोन आठवडे आणि त्याहून जास्त काळ सुरु असलेल्या परिषदेतील चर्चेनंतरही अंतिम राजकीय करारावर सहमती न झाल्याने जागतिक हवामान बदलाच्या लढ्याला मोठा धक्का बसला आहे .

जगभरात वाढते तापमान ,अनियमित पाऊस , जंगलांना लागणारे मोठ मोठे वणवे आणि नैसर्गिक आपत्तीचे वाढते प्रमाण यामुळे हवामान बदलाचा प्रश्न दिवसेंदिवस अजूनच गंभीर आणि भीतीदायक बनत आहे . या संकटावर नियंत्रण मिळवण्यासाठी जगातील देशांनी एकत्र येऊन जीवाश्म इंधनाचा वापर कमी करणे आणि स्वच्छ ऊर्जेकडे वळणे अपेक्षित होते .

मात्र आर्थिक हितसंबंध , ऊर्जा सुरक्षेची चिंता आणि विकसित व विकसनशील देशांमधील मतभेद यामुळे चर्चेला अपेक्षित दिशा मिळाली नाही. परिणामी अनेक दिवसांच्या चर्चेनंतरही ठोस निर्णय घेण्यात आले असून , जागतिक हवामान कृतीच्या भवितव्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे .

Breaking News : AI चिटिंग प्रकरणाचा दक्षिण कोरियाला मोठा धक्का; शिक्षणमंत्र्याचा राजीनामा,देशभर खळबळ

जीवाश्म इंधनाच्या मुद्द्यावरून संघर्ष

या परिषदेत कोळसा , तेल आणि नैसर्गिक वायूंचा वापर कमी करण्यासाठी ठोस कालमर्यादा ठरवण्याची मागणी अनेक देशांनी केली होती . पण अंतिम कराराच्या मसुद्यातून जीवाश्म इंधनाचा स्पष्ट उल्लेखच वगळण्यात आला . यामुळे युरोपियन युनियन , ब्रिटन आणि अनेक विकसनशील देशांनी मसुद्याला विरोध केला . फ्रान्स आणि पनामासह काही देशांनी आधीक ठोस आश्वासनांची मागणी केली होती .

World News : दुर्मिळ काळ्या बिबट्याच्या शोधात मासाई छायाचित्रकाराचा जंगलात प्रवास; समुदायाकडून पारंपरिक निरोप

तेल उत्पादक देशांचा विरोध

सौदी अरेबिया आणि रशियासह काही तेल उत्पादक देशांनी जीवाश्म इंधनाबाबत कठोर भूमिका घेण्यास विरोध केल्याचे समोर आले . ऊर्जा पुरवठ्यावर निर्बंध आल्यास इंधनांच्या किमती वाढू शकतात आणि गरीब देशांवर आर्थिक भार पडू शकतो . असा त्यांचा युक्तिवाद होता . तर दुसरीकडे हवामान बदलांचा सामना करण्यासाठी कोळसा , तेल आणि वायूवरील अवलंबित्व कमी करणे आवश्यक असल्याचे पर्यावरणवादी संघटनांनी स्पष्ट केले .

हवामान निधीवरही मतभेद

जीवाश्म इंधनबरोबरच विकसनशील देशांना हवामान बदलाच्या परिणामांशी सामना करण्यासाठी आर्थिक मदत देण्याच्या मुद्यावरही मतभेद कायम राहिले . पूर , दुष्काळ , उष्णतेच्या लाटा आणि समुद्राच्या पातळीत होणारी वाढ यांचा सर्वाधिक फटका गरीब देशांना बसत आहे .

त्यामुळे श्रीमंत देशांनी आर्थिक मदतीबाबत स्पष्ट हमी द्यावी , अशी मागणी करण्यात आली . मात्र अंतिम मसुद्यात निधीच्या तरतुदीबाबत पुरेशी स्पष्टता नसल्याने अनेक देशांनी नाराजी व्यक्त केली . अखेर परिषदेत मुख्य राजकीय करार मंजूर होऊ शकला नाही . यामुळे २००९ मधील कोपेनहेग परिषदेनंतर प्रथमच अशा प्रकारे महत्वपूर्ण कराराविना हवामान परिषद संपली आहे . पण हे मात्र काही चांगले झालेले नाही .

Web Title: Climate summit cop31 fossil fuel disagreement no final agreement cp

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 22, 2026 | 08:49 PM

Topics:  

  • Climate Change
  • global warming effect
  • Marathi News
  • United Nations Security Council

संबंधित बातम्या

Breaking News : AI चिटिंग प्रकरणाचा दक्षिण कोरियाला मोठा धक्का; शिक्षणमंत्र्याचा राजीनामा,देशभर खळबळ
1

Breaking News : AI चिटिंग प्रकरणाचा दक्षिण कोरियाला मोठा धक्का; शिक्षणमंत्र्याचा राजीनामा,देशभर खळबळ

World News : म्यानमारच्या दुर्मिळ खनिज खाणकामाला थायलंडचा मोठा धक्का; रसायनांच्या निर्यातीवर बंदी घालण्याची तयारी
2

World News : म्यानमारच्या दुर्मिळ खनिज खाणकामाला थायलंडचा मोठा धक्का; रसायनांच्या निर्यातीवर बंदी घालण्याची तयारी

Amit Deshmukh: ‘विलासराव देशमुखांची प्रतिमा मलिन करण्याचा भाजपचा डाव’
3

Amit Deshmukh: ‘विलासराव देशमुखांची प्रतिमा मलिन करण्याचा भाजपचा डाव’

World News : दुर्मिळ काळ्या बिबट्याच्या शोधात मासाई छायाचित्रकाराचा जंगलात प्रवास; समुदायाकडून पारंपरिक निरोप
4

World News : दुर्मिळ काळ्या बिबट्याच्या शोधात मासाई छायाचित्रकाराचा जंगलात प्रवास; समुदायाकडून पारंपरिक निरोप

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.