Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

राज्यातील अनेक भागांत वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा अंदाज; 2 एप्रिलपर्यंत…

महाराष्ट्राला आता अवकाळी पावसाचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे. बंगालच्या उपसागरावरून येणाऱ्या बाष्पयुक्त वाऱ्यांमुळे राज्यात हवामान वेगाने बदलत आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Mar 31, 2026 | 03:09 PM
राज्यातील अनेक भागांत वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा अंदाज; 2 एप्रिलपर्यंत...

राज्यातील अनेक भागांत वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा अंदाज; 2 एप्रिलपर्यंत...

Follow Us
Follow Us:

मुंबई : मार्च महिन्यातील कडक उन्हामुळे हैराण झालेल्या महाराष्ट्राला आता अवकाळी पावसाचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे. बंगालच्या उपसागरावरून येणाऱ्या बाष्पयुक्त वाऱ्यांमुळे राज्यात हवामान वेगाने बदलत असून, ३० मार्च ते २ एप्रिल या कालावधीत राज्यातील बहुतांश भागांत मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा भारतीय हवामानशास्त्र विभागाने दिला आहे. या पार्श्वभूमीवर राज्याच्या विविध भागांत ‘यलो अलर्ट’ जारी करण्यात आला आहे.

गेल्या काही दिवसांत विदर्भात तापमान ४१ अंशांच्या पुढे गेले असताना, या संभाव्य पावसामुळे तापमानात २ ते ३ अंशांनी घट होऊन उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळू शकेल, पण काढणीला आलेल्या पिकांसाठी हा पाऊस धोका ठरू शकतो. हवामान विभागाने दिलेल्या जिल्हानिहाय अंदाजानुसार, पुढील चार दिवसांत काही जिल्ह्यांना ‘यलो अलर्ट’ (विजांच्या कडकडाटासह मुसळधार सदृश पाऊस) देण्यात आला आहे. हवामानशास्त्र खात्याने मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाचा इशारा देत ‘यलो अलर्ट’ दिला आहे.

राज्यात कुठे ‘यलो अलर्ट’?

– मध्य महाराष्ट्र नाशिक, पुणे, अहिल्यानगर (अहमदनगर), सोलापूर आणि सातारा.
– मराठवाडा : छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), जालना, बीड, परभणी, धाराशिव (उस्मानाबाद) आणि लातूर.

कोकण किनारपट्टी

कोरड्या राहणाऱ्या दक्षिण कोकणात (सिंधुदुर्ग व रत्नागिरी) ३१ मार्च आणि १ एप्रिल रोजी काही अंशी ढगाळ वातावरण राहून हलक्या सरींची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

मेघगर्जनेसह अवकाळी पावसाची हजेरी

दुसरीकडे, वाई तालुक्याच्या पश्चिम भागात गुरुवारी (दि.26) संध्याकाळच्या सुमारास अचानक अवकाळी पावसाने हजेरी लावत जोरदार वाऱ्यासह मेघगर्जना झाली. या अनपेक्षित हवामान बदलामुळे परिसरातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून शेतकरी वर्ग हवालदिल झाला आहे.

महाबळेश्वरलाही अवकाळी पावसाने झोडपलं

मार्च महिन्याचा शेवटचा आठवडा सुरू असतानाच महाबळेश्वर आणि जावळी तालुक्यात निसर्गाचा कोप पाहायला मिळत आहे. सलग दुसऱ्या दिवशी या परिसरात अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावत जनजीवन विस्कळीत केले. सोसाट्याचा वारा, विजांचा कडकडाट आणि ढगांच्या प्रचंड गडगडाटासह झालेल्या या पावसामुळे अनेक भागांत भीतीचे वातावरण निर्माण झाले असून मालमत्तेचेही नुकसान झाले आहे.

Wai Unseasonal Rain : शेतकऱ्यांच्या हाता-तोंडाशी आलेला घास हिरावला! अवकाळी पावसाने वाईतील पिकांचे मोठे नुकसान

Web Title: Heavy rainfall accompanied by gusty winds forecast for several parts of maharashtra

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 31, 2026 | 03:09 PM

Topics:  

  • Climate Change
  • Heavy Rainfall
  • Weather Update

संबंधित बातम्या

राज्यात पावसाचा मुक्काम आणखी वाढणार; पुढील काही दिवस वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता
1

राज्यात पावसाचा मुक्काम आणखी वाढणार; पुढील काही दिवस वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता

अकोल्यात सप्टेंबरमध्येच ‘ऑक्टोबर हीट’ची झळ; तापमान 33 अंशांच्या आसपास, पातूरमध्ये तर…
2

अकोल्यात सप्टेंबरमध्येच ‘ऑक्टोबर हीट’ची झळ; तापमान 33 अंशांच्या आसपास, पातूरमध्ये तर…

Weather Update : देशातील 9 राज्यांमध्ये मेघगर्जनेसह मुसळधार पावसाचा अंदाज; तापमानातही झाली घट
3

Weather Update : देशातील 9 राज्यांमध्ये मेघगर्जनेसह मुसळधार पावसाचा अंदाज; तापमानातही झाली घट

Sahara Snowfall : तापमानाचा पारा -3 अंशांपर्यंत घसरल्याने सोनेरी वाळूवर पसरली पांढरी चादर; जाणून घ्या यामागील वैज्ञानिक कारण
4

Sahara Snowfall : तापमानाचा पारा -3 अंशांपर्यंत घसरल्याने सोनेरी वाळूवर पसरली पांढरी चादर; जाणून घ्या यामागील वैज्ञानिक कारण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.