Pimpri-Chinchwad: पिंपरी-चिंचवड हादरले! २२ वर्षीय तरुणीने गर्भपाताच्या गोळ्या घेतल्या अन्…
या अवकाळी पावसामुळे गहू, ज्वारी यांसारख्या पिकांच्या काढणीवर परिणाम झाला. अनेक शेतकऱ्यांनी गहू काढणीस सुरुवात केली होती, मात्र अचानक आलेल्या पावसामुळे कापलेले गहू भिजून गेले. तसेच ज्वारी काढणीची कामेही विस्कळीत झाली. शेतात साठवून ठेवलेला कडबाही पावसामुळे ओला झाला आहे. संध्याकाळी अचानक सुरू झालेल्या सुसाट वाऱ्यांसह विजांचा कडकडाट आणि मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांची मोठी धावपळ उडाली. हाता-तोंडाशी आलेला घास हिरावला गेल्याने शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
वाई तालुक्याच्या पश्चिम भागात गव्हाचे ज्वारीचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन घेतले जाते. यंदा काढणीच्या हंगामातच अवकाळी पावसाने धडक दिल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी गहू ज्वारी कडबा पिके आडवी झाली असून गुणवत्ता कमी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभूमीवर बाधित शेतकऱ्यांना तात्काळ मदत देण्याची मागणी होत आहे.
महाबळेश्वर/मेढा: मार्च महिन्याचा शेवटचा आठवडा सुरू असतानाच महाबळेश्वर आणि जावळी तालुक्यात निसर्गाचा कोप पाहायला मिळत आहे. सलग दुसऱ्या दिवशी या परिसरात अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावत जनजीवन विस्कळीत केले. सोसाट्याचा वारा, विजांचा कडकडाट आणि ढगांच्या प्रचंड गडगडाटासह झालेल्या या पावसामुळे अनेक भागांत भीतीचे वातावरण निर्माण झाले असून मालमत्तेचेही नुकसान झाले आहे.
दिल्ली मेट्रोत पुन्हा ‘हायव्होल्टेज ड्रामा’! सीटवरुन महिला आणि सरदारजी भिडले; पाहा काय घडलं?
गेल्या दोन दिवसांपासून दिवसा कडाक्याचे ऊन पडत असतानाच, सायंकाळच्या सुमारास अचानक हवामानात मोठा बदल होत आहे. महाबळेश्वरसह जावळी तालुक्यातील कुडाळ, मेढा, करहर, पाचगणी, रुईघर, म्हसवे, सरताळे, सर्जापूर, बेलावडे, सोनगाव आणि आलेवाडी या परिसरात मुसळधार पावसाने हजेरी लावली. विजांचा कडकडाट इतका तीव्र होता की नागरिकांनी घरातच राहणे पसंत केले.
पावसासोबतच सुटलेल्या सोसाट्याच्या वाऱ्याने काही गावांमध्ये घरांच्या पत्र्यांना मोठा फटका बसला आहे. जोराच्या वाऱ्यामुळे अनेक घरांचे पत्रे उडून गेल्याच्या घटना समोर आल्या आहेत. सुदैवाने, या नैसर्गिक आपत्तीत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे प्राथमिक वृत्त आहे, मात्र शेतकरी आणि ग्रामस्थांमध्ये दहशतीचे वातावरण आहे.






