Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mahabaleshwar ची थंडी उडाली दूर! अवकाळी पावसामुळे पर्यटकांची तारांबळ; वादळी वारे अन्…

अचानक बदलणाऱ्या हवामानामुळे पर्यटकांच्या हालचालींवर परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. हवामानातील या अनपेक्षित बदलामुळे पुढील काही दिवसांतही पावसाची शक्यता नाकारता येत नसल्याचे स्थानिकांकडून सांगण्यात येत आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Mar 26, 2026 | 08:16 PM
Mahabaleshwar ची थंडी उडाली दूर! अवकाळी पावसामुळे पर्यटकांची तारांबळ; वादळी वारे अन्…
Follow Us
Follow Us:

महाबळेश्वर-पाचगणीत अवकाळी मुसळधार पाऊस
महाराष्ट्राला अवकाळी पावसाचा इशारा 
पर्यटकांची तारांबळ, वातावरण थंडगार

Maharashtra Rain Alert/ पाचगणी: मार्च महिन्याच्या अखेरच्या आठवड्यात वाढलेल्या प्रचंड उकाड्यानंतर पर्यटननगरी महाबळेश्वर आणि पाचगणी परिसरात सायंकाळी अचानक अवकाळी पावसाने धडाकेबाज हजेरी लावली. वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटात सुमारे एक तास कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे संपूर्ण परिसर थंडगार झाला, मात्र या अनपेक्षित पावसामुळे पर्यटकांची मोठी तारांबळ उडाल्याचे चित्र पाहायला मिळाले.

सायंकाळी सातच्या सुमारास अचानक काळे ढग दाटून आले आणि काही क्षणांतच जोरदार वादळी वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली. विजांच्या कडकडाटामुळे नागरिकांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले. पर्यटन हंगामाच्या सुरुवातीलाच मोठ्या संख्येने महाबळेश्वर आणि पाचगणीत दाखल झालेल्या पर्यटकांना या अवकाळी पावसाचा अनपेक्षित सामना करावा लागला.

अनेक पर्यटकांनी या पावसात भिजण्याचा मनमुराद आनंद घेतला, तर काहींना सुरक्षित ठिकाणी आसरा शोधण्यासाठी धावपळ करावी लागली. प्रमुख बाजारपेठा, पर्यटनस्थळे आणि रस्त्यांवर अचानक गर्दी उसळल्याने काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. रस्त्यांवर पाणी साचल्यामुळे वाहतुकीवरही परिणाम झाल्याचे दिसून आले.

Maharashtra Rain Alert: इकडे लक्ष द्या! छत्री घेऊनच निघा नाही तर…; ‘या’ भागात पावसाचा रुद्रावतार

सुमारे एक तास झालेल्या या मुसळधार पावसामुळे शहरातील जनजीवन काही काळ विस्कळीत झाले. बाजारपेठांमधील दुकानदारांनी घाईघाईने आपली दुकाने बंद करण्याची वेळ आली, तर काही ठिकाणी झाडांच्या फांद्या तुटून रस्त्यावर पडल्याच्या किरकोळ घटना घडल्याची माहिती मिळाली आहे. उकाड्याने हैराण झालेल्या स्थानिक नागरिकांना या पावसामुळे काहीसा दिलासा मिळाला असला, तरी अचानक आलेल्या वादळी वाऱ्यामुळे काही ठिकाणी वीजपुरवठ्यावरही परिणाम झाल्याचे सांगण्यात येत आहे. हवामानातील या अचानक बदलामुळे परिसरात गारवा पसरला असून, तापमानात लक्षणीय घट झाल्याचे जाणवले.

दरम्यान, उन्हाळी पर्यटन हंगामाच्या सुरुवातीलाच झालेल्या या अवकाळी पावसामुळे पर्यटन व्यवसायिकांमध्ये काही प्रमाणात चिंता व्यक्त केली जात आहे. अचानक बदलणाऱ्या हवामानामुळे पर्यटकांच्या हालचालींवर परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. हवामानातील या अनपेक्षित बदलामुळे पुढील काही दिवसांतही पावसाची शक्यता नाकारता येत नसल्याचे स्थानिकांकडून सांगण्यात येत असून, नागरिक आणि पर्यटकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

Maharashtra Rain Alert: बापरे! विजांचा कडकडाट, गारांचा मारा, इतक्या जिल्ह्यांवर पावसाचं मोठं संकट, काय आहे हवामान विभागाचा अलर्ट?

‘या’ भागात पावसाचा रुद्रावतार

सध्या राज्यातील काही भागात अंशतः आभाळी हवामान असून ही स्थिती या आठवड्यात कायम राहण्याची शक्यता आहे. राज्याच्या दक्षिण भागांमध्ये दुपारनंतर स्थानिक स्वरूपाचा वादळी पाऊस पडू शकतो. हा पाऊस प्रामुख्याने कर्नाटक व तेलंगणा सीमेलगत असलेल्या मराठवाडा, मध्य महाराष्ट्र व विदर्भातील सीमावर्ती भागांमध्ये राहण्याची शक्यता आहे.

 

 

Web Title: Heavy unseasonal rain in mahabaleshwar and pachgani latest weather update

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 26, 2026 | 08:16 PM

Topics:  

  • Heavy Rain
  • Mahabaleshwar News
  • Unseasonal Rain

संबंधित बातम्या

ऑक्टोबर सुरु होताच अनेक राज्यांत मुसळधार पावसाचा इशारा; पूर्व भारतातील भागांत गारपीटीचीही शक्यता
1

ऑक्टोबर सुरु होताच अनेक राज्यांत मुसळधार पावसाचा इशारा; पूर्व भारतातील भागांत गारपीटीचीही शक्यता

देशातील अनेक राज्यांत पुन्हा पावसाचा अलर्ट; मुसळधार पावसामुळे उत्तर प्रदेश, छत्तीसगडमध्ये जनजीवन विस्कळीत
2

देशातील अनेक राज्यांत पुन्हा पावसाचा अलर्ट; मुसळधार पावसामुळे उत्तर प्रदेश, छत्तीसगडमध्ये जनजीवन विस्कळीत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.