मुंबई-गोवा मार्गावरून 'या' वाहनांना दोन दिवस बंदी; रायगड जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश
मुंबई : मुंबई-गोवा मार्गावरून दररोज शेकडो वाहनांची ये-जा होत असते. जर तुम्हीही या मार्गाने ये-जा करत असाल तर तुमच्यासाठी ही महत्त्वाची माहिती असणार आहे. या मार्गावर आता जड आणि अवजड वाहनांना बंदी घालण्यात आली आहे. ५ आणि ६ जूनदरम्यान मुंबई-गोवा महामार्गावर जड आणि अवजड वाहनांना बंदी असणार आहे. रायगड जिल्हाधिकारी यांनी वाहतूक बंदीचे आदेश जारी केले आहेत.
रायगडावर शिवराज्यभिषेक सोहळ्यासाठी राज्यभरातून शिवभक्त मोठ्या संख्येने येतात. यामुळे मुंबई-गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी हा निर्णय घेतला आहे. शिवराज्याभिषेक सोहळा सुरळीत पार पडावा, शिवराज्याभिषेक सोहळ्याला येणाऱ्या शिवभक्त आणि पर्यटकांना वाहतूक कोंडीचा त्रास सहन करावा लागू नये यासाठी रायगड जिल्हाधिकारी किसन जावळे यांनी मुंबई-गोवा महामार्गावर जड आणि अवजड वाहनांसाठी बंदी जाहीर केली आहे.
हेदेखील वाचा : धक्कादायक! नागपूर शहरातील इंग्रजकालीन सिवेज लाईनबाबत महापालिका अनभिज्ञ; घरांखालील जमीन सरकण्याचा धोका
दरम्यान, ५ आणि ६ जूनदरम्यान या महामार्गावर जड आणि अवजड वाहनांना बंदी असणार आहे. ५ जून रोजी सायंकाळी ४ वाजल्यापासून ते ६ जून रोजी रात्री १० वाजेपर्यंत या कालावधीमध्ये वाहतूक बंदीचे आदेश जारी करण्यात आले आहेत.
अनेक मार्गांवर बंदीचे आदेश
मुंबई- गोवा राष्ट्रीय महामार्गावरील वाकणफाटा, नागोठणे ते कशेडीपर्यंत तसेच माणगाव निजामपूर मार्गे पाचाड ते रायगड किल्ला, माणगाव ढालघरफाटा मार्गे पाचाड ते रायगड किल्ला, महाड नातेखिंड मार्गे पाचाड ते रायगड किल्ला या मार्गावर सर्व प्रकारच्या जड अवजड वाहनांकरिता बंदीचे आदेश लागू असणार आहेत.
हेदेखील वाचा : एखाद्या चंद्रासारखेच चमकते हिमालयातील चंद्रतालचे पाणी; इथे जाणून वेळच थांबतो, कसे जायचे ते जाणून घ्या