Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 10 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mumbai New: मुंबई लोकलमध्ये ‘हेल्पलाईन’ ठरली जीवनरेखा! हरवलेल्या वस्तूंसह ३६ हजार तक्रारींची गेल्यावर्षी नोंद

दररोज येणाऱ्या कॉलपैकी सुमारे १०० ते १३० प्रकरणांवर प्रत्यक्ष कारवाई केली जाते. १ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०२५ या कालावधीत हेल्पलाइनवर एकूण ३६, १६६ कॉल प्राप्त झाले. यापैकी केवळ ६० प्रकरणे अधिकृत गुन्हे म्हणून नोंदवण्यात

  • By सुरुची कदम
Updated On: Apr 21, 2026 | 10:26 AM
मुंबई लोकलमध्ये 'हेल्पलाईन' ठरली जीवनरेखा! हरवलेल्या वस्तूंसह ३६ हजार तक्रारींची गेल्यावर्षी नोंद

मुंबई लोकलमध्ये 'हेल्पलाईन' ठरली जीवनरेखा! हरवलेल्या वस्तूंसह ३६ हजार तक्रारींची गेल्यावर्षी नोंद

Follow Us
Follow Us:

मुंबईची जीवनवाहिनी मानल्या जाणाऱ्या लोकल ट्रेनमधील प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी सुरू करण्यात आलेली रेल्वे पोलिसांची ‘१५१२’ हेल्पलाइन प्रभावी ठरत असून, प्रवाशांसाठी ती विश्वासार्ह सुरक्षा कवच बनली आहे. वाढत्या विश्वासाचे द्योतक म्हणजे गेल्या काही वर्षांत तक्रारींच्या संख्येत तब्बल ६५ टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. उपलब्ध आकडेवारीनुसार, २०२२ मध्ये दररोज सरासरी १०० तक्रारी येत होत्या. मात्र, २०२५ पर्यंत ही संख्या वाढून दररोज १७०० ते १८०० इतकी झाली आहे. यापैकी सुमारे २५ हजार तक्रारी प्रवासादरम्यान बॅग हरवणे किंवा विसरणे यासंदर्भातील आहेत. मुंबई रेल्वे पोलीस आयुक्तालयाच्या नियंत्रण कक्षातून ऑक्टोबर २०१७ पासून ‘१५१२ हेल्पलाइन उपनगरीय तसेच मेल-एक्सप्रेस गाड्यांतील प्रवाशांच्या मदतीसाठी सुरू करण्यात आली आहे. या हेल्पलाइनवर दररोज सरासरी १७०० ते १८०० कॉल येतात. त्यापैकी बहुतांश कॉल बॅग किंवा इतर वस्तू हरवल्याबाबत असतात. तसेच महिला, ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग आणि आजारी प्रवासीही मदतीसाठी या हेल्पलाइनचा वापर करतात.(फोटो सौजन्य – सोशल मीडिया)

Rain Alert ! मुंबईसह ठाणे, रायगडमध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता; हवामान विभागाकडून अलर्ट जारी

दररोज १०० प्रकरणांवर कारवाई

दररोज येणाऱ्या कॉलपैकी सुमारे १०० ते १३० प्रकरणांवर प्रत्यक्ष कारवाई केली जाते. १ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०२५ या कालावधीत हेल्पलाइनवर एकूण ३६, १६६ कॉल प्राप्त झाले. यापैकी केवळ ६० प्रकरणे अधिकृत गुन्हे म्हणून नोंदवण्यात आली. तर उर्वरित तक्रारी तत्काळ निकाली काढण्यात आल्या. हेल्पलाइनवर येणाऱ्या सुमारे ९९ टक्के कॉल तक्रारी स्वरूपाच्या असतात, मात्र एक टक्क्यांपेक्षाही कमी प्रकरणे गुन्हे म्हणून नोंदवली जातात.

BMC News: मुंबई महानगरपालिकेतील बदली प्रक्रियेवर गंभीर आरोप; वशिलेबाजी, नियमभंग आणि गैरव्यवहारामुळे प्रशासनावर प्रश्नचिन्ह

बॅग गहाळ झाल्याच्या सर्वाधिक तक्रारी

मोबाइल चोरीपासून ते अनधिकृतपणे ताश खेळण्यापर्यंत विविध प्रकारच्या तक्रारी या हेल्पलाइनद्वारे नोंदवल्या जातात. प्रत्येक तक्रारीची नोंद केली जाते आणि प्रकरणाच्या गांभीर्यानुसार गुन्हा दाखल केला जातो. अनेक प्रकरणे प्रथम समुपदेशनाद्वारे सोडवली जातात, तर आवश्यकतेनुसार पोलिसांना घटनास्थळी पाठवले जाते.हेल्पलाइनवर सर्वाधिक तक्रारी गहाळ बैंग, सर्वसामान्य प्रवाशांनी दिव्यांग डब्यात प्रवेश करणे, प्रवाशांमधील वाद, तसेच राखीव डब्यातील अनधिकृत प्रवास यासंदर्भात येतात. याशिवाय महिला छेडछाड, चोरी, भिकारी, फेरीवाले, नशेत प्रवास, संशयास्पद व्यक्तींचे वर्तन, साखळी चोरी, मोबाइल चोरी, भांडणे, बमची धमकी अशा एकूण ३२ प्रकारच्या तक्रारीची नोंद केली जाते.

डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.

Web Title: Helpline has become a life line in mumbai local last year 36000 complaints were registered including lost items

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 21, 2026 | 10:26 AM

Topics:  

  • Local train Mumbai
  • Local Trains
  • Mumabi

संबंधित बातम्या

Central Railway Mega Block: मुंबई लोकलचं वेळापत्रक बदलणार! मध्य रेल्वेवर मंगळवारी 12 तासांचा मेगा ब्लॉक
1

Central Railway Mega Block: मुंबई लोकलचं वेळापत्रक बदलणार! मध्य रेल्वेवर मंगळवारी 12 तासांचा मेगा ब्लॉक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.