Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 18 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

नर्सरीतील मुलांसोबत गैरवर्तन करणाऱ्या शिक्षिकेला दिलासा नाहीच, उच्च न्यायालयाने अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला

कांदिवली येथील नर्सरीत शाळेत शिकणारा दोन वर्षीय मुलगा घाबरलेल्या अवस्थेत तक्रारकर्त्या पालकांना दिसला. त्यांनी शाळेतील इतर मुलांच्या पालकांकडे विचारणा केली असता त्यांनाही पाल्यांच्या वागणूकीत बदल जाणवला. त्यामुळे त्यांनी शाळेतील सीसीटीव्ही तपासले असता त्यांच्या मुलांना दोन शिक्षिका मारताना, चिंमटे काढताना दिसल्या.

  • By Vivek Bhor
Updated On: May 01, 2023 | 10:26 PM
नर्सरीतील मुलांसोबत गैरवर्तन करणाऱ्या शिक्षिकेला दिलासा नाहीच, उच्च न्यायालयाने अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला
Follow Us
Follow Us:

मयुर फडके, मुंबई : नर्सरीतील (२ ते ४ वयोगटातील) अल्पवयीन मुलांसोबत (Minors) गैरवर्तनाबाबत उच्च न्यायालयाने (High Court) नाराजी व्यक्त करून असे कृत्य करणाऱ्या शिक्षिकेला दिलासा देण्यास न्यायालयाने नकार दिला (The court refused to grant relief to the teacher). अल्पवयीन मुलांला गैरवर्तन आणि क्रूर वागणूक दिल्यामुळे त्यांच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर वाईट परिणाम होतो (Mental and physical health are adversely affected), असे निरीक्षणही न्यायालयाने शिक्षिकेची याचिका फेटाळताना नोंदवले.

कांदिवली येथील नर्सरीत शाळेत शिकणारा दोन वर्षीय मुलगा घाबरलेल्या अवस्थेत तक्रारकर्त्या पालकांना दिसला. त्यांनी शाळेतील इतर मुलांच्या पालकांकडे विचारणा केली असता त्यांनाही पाल्यांच्या वागणूकीत बदल जाणवला. त्यामुळे त्यांनी शाळेतील सीसीटीव्ही तपासले असता त्यांच्या मुलांना दोन शिक्षिका मारताना, चिंमटे काढताना दिसल्या. तर काही मुलांच्या डोक्यात त्यांनी पुस्तके मारली तर काही मुलांना उचलून जमिनीवर फेकल्याचे दिसून आले.

[read_also content=”‘शासकीय योजनांची जत्रा’ च्या माध्यमातून जिल्ह्यातील 75 हजार लाभार्थ्यांना शासकीय योजनांचा लाभ देणार- पालकमंत्री गुलाबराव पाटील https://www.navarashtra.com/maharashtra/75-thousand-beneficiaries-of-the-district-will-be-given-the-benefits-of-government-schemes-through-government-schemes-fair-guardian-minister-gulabrao-patil-nrvb-393803.html”]

घाबरलेल्या पालकांनी दोन्ही शिक्षिकेविरोधात गुन्हा नोंदवला. पोलिसांनी शिक्षिकेवर बाल न्याय कायदा २०१५ आणि २०२० च्या कलम २३ आणि ७५ अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला. अटकेच्या भितीपोटी शिक्षिकेने उच्च न्यायालयात अटकपूर्व जामीनासाठी अर्ज दाखल केला. सह-आरोपी शिक्षिका जिनल छेडा यांच्यावरही मुलांवर क्रूरपणे हल्ला आणि वाईट वर्तन केल्याचा आरोप आहे. त्या अर्जावर नुकतीच न्या. अनुजा प्रभूदेसाई यांच्यासमोर सुनावणी पार पडली.

आपल्याला खोट्या प्रकरणात गोवण्यात आले असून मुलांशी गैरवर्तन केल्याचे पुरावे सापडलेले नाहीत. आपण तपासात सहकार्य केले असून त्यातून काहीच निष्पन्न न झाल्यामुळे कोठडीत चौकशी करण्याची आवश्यकता नसल्याचेही शिक्षिकेच्या वतीने सांगण्यात आले. शिक्षिकेच्या युक्तिवादाला पालकांच्या आणि पोलिसांच्या वतीने विरोध करण्यात आला. आरोपीविरोधातील गुन्हे गंभीर आहेत आणि त्यांच्या क्रूरतेमुळे मुलांच्या वागणूकीत लक्षणीय बदल झाले आहेत त्यामुळे त्यांना कोणताही दिलासा देऊ नये, अशी मागणी त्यांनी केली.

[read_also content=”आजचे राशीभविष्य : 1 May 2023, कसा जाईल आजचा दिवस; वाचा सविस्तर https://www.navarashtra.com/web-stories/today-daily-horoscope-1-may-2023-rashibhavishya-in-marathi-nrvb/”]

दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर वर्गातील सीसीटीव्ही फुटेजवरून शिक्षिकेवरील आरोपात प्रथदर्शनी तथ्य असल्याचे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले. शिक्षिका मुलांसोबत क्रुरपणे वागत असल्याचे दिसत असून हे कृत्य नक्कीच अयोग्य आहे. किशोर वयातील मुलांना अशी वागणूक दिल्यामुळे त्यांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे हा गुन्हा अधिकच गंभीर ठरतो, असेही स्पष्ट करून न्यायालयाने शिक्षिकेला दिलासा देण्यास नकार दिला.

Web Title: High court rejects anti arrest bail plea for nursery teacher who misbehaved with children nrvb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 01, 2023 | 10:26 PM

Topics:  

  • High court
  • rejects

संबंधित बातम्या

Visa Rejection: आयर्लंड दूतावासांनी ३,३०० भारतीय विद्यार्थ्यांचे व्हिसा फेटाळले,पण का? जाणून घ्या
1

Visa Rejection: आयर्लंड दूतावासांनी ३,३०० भारतीय विद्यार्थ्यांचे व्हिसा फेटाळले,पण का? जाणून घ्या

च्युइंग गम मिठाई नाही! गुजरात हायकोर्टाचा मोठा निर्णय, १२.५% व्हॅट आकारणीचा निर्णय कायम
2

च्युइंग गम मिठाई नाही! गुजरात हायकोर्टाचा मोठा निर्णय, १२.५% व्हॅट आकारणीचा निर्णय कायम

Gopichand Padalkar यांना मोठा धक्का! जिल्हा मध्यवर्ती बँकेसाठीचा अर्ज अवैध; उच्च न्यायालयाच्या निर्णयाने राजकीय समीकरणे बदलणार?
3

Gopichand Padalkar यांना मोठा धक्का! जिल्हा मध्यवर्ती बँकेसाठीचा अर्ज अवैध; उच्च न्यायालयाच्या निर्णयाने राजकीय समीकरणे बदलणार?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.