वडगाव मावळ : वाहनांच्या काचा फोडून त्यातील मौल्यवान वस्तू व बॅगांची चोरी करणारा एक हायप्रोफाइल व इनोव्हावा सारखी अलिशान कार वापरणाऱ्या सराईत चोरट्याला लोणावळा ग्रामीण पोलिसांनी ३ तासांच्या आत गजाआड केले.
आरोपीकडून तब्बल ६ मोबाईल, ५ पर्स,२ बॅगा,२ पाॅवर बॅंक, २ घडयाळे २२९०० रोख व चारचाकी इनोव्हावा कार, असा एकूण १२ लाख ११ हजार १०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. अखिल सलीम व्होरा (वय ३२, रा. नुतन नगर अमिना मंजील जवळ, आनंद, गुजरात) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे शाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लोणावळा परिसरात जुने पुणे- मुंबई हायवे रोडवरील मनशक्ती केंद्र वरसोली परिसरामध्ये पर्यटनासाठी येणाऱ्या पर्यटकांच्या चारचाकी वाहनांच्या काचा फोडून गाडीतील मौल्यवान बॅग मधील रोख रक्कम, मोबाईल इतर मौल्यवान वस्तु अज्ञात चोरटा चोरून नेल्याची घटना शनिवार (दि.१९) रोजी घडली. त्या घटनेची तातडीने दखल घेत पोलिसांनी घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज तपासले, त्या फुटेजमध्ये इनोव्हा सदृष्य कारमधील ३० ते ३५ वयाचा अंगात चॉकलेटी रंगाचा टी शर्ट घातलेला इसम हा चारचाकी गाडीची काच फोडून चोरी करताना आढळून आले.
अधीक्षक सत्यसाई कार्तिक यांच्या पथकांची कामगिरी
या सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी आरोपीचा शोध घेण्यास सुरुवात केली. दरम्यान पोलिसांना भाजे व लोहगड परिसरात काळ्या काचा असणारी टोयोटा कंपनीची इनोव्हा कार नं. जी जे ०६ एफ सी ३८०६ ही मौजे भाजे धबधबा नं. २ परिसरात संशयीत रित्या फिरत असल्याचे निदर्शनास आले. पोलीसांनी कार चालकाकडे विचारपूस केली. सदर कारची झडती घेतली कार चालकाकडे इनोव्हा गाडीमध्ये सीमकार्ड नसलेले एकुण ६ मोबाईल, तसेच ५ पर्स, २ बॅगा, २ पॉवर बँक, २ घड्याळे, २२ हजार,९००/- रोख रक्कम व इनोव्हा कार असा एकुण १२, लाख ११, हजार १०० रुपये असा मुदेमाल मिळुन आला.
सदरची कारवाई पुणे ग्रामीण पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक अंकीत गोयल, अपर पोलीस अधीक्षक मितेश गट्टे, सहाय्यक पोलीस अधिक्षक सत्यसाई कार्तीक, वरीष्ठ पोलीस निरीक्षक लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशन किशोर धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक निलेश माने, पोलीस उपनिरीक्षक भारत भोसले, फौजदार युवराज बनसोडे, पोलीस हवालदार नितेश कवडे, पोलीस नाईक गणेश होळकर, पोलीस हवालदार बाळकृष्ण भोईर, पोलीस हवालदार विजय मुंढे यांच्या पथकाने केली. या गुन्ह्यांचा पुढील तपास लोणावळा ग्रामीण पोलीस करीत आहेत.