File photo ; Number Plate
मुंबई : वाहनांच्या सुरक्षेच्या दृष्टीने आता नंबर प्लेट अर्थात उच्च सुरक्षा पाटी बंधनकारक करण्यात आली आहे. सध्या केवळ 2019 मध्ये उत्पादित व त्यानंतरच्या वाहनांनाच हाय सिक्युरिटी नंबर प्लेट बंधनकारक होती. आता सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर राज्य परिवहन विभागाने ते सर्वांसाठी बंधनकारक केली आहे.
हेदेखील वाचा : दिल्लीच्या निवडणुकांमध्ये रिक्षा चालकांना इतकं महत्त्व का? यावेळीही ठरणार का गेमचेंजर? वाचा सविस्तर
आता सर्वच प्रकारच्या जुन्या वाहनांचा समावेश केला आहे. यासाठी परिवहन विभागाने तीन झोन तयार केले असून त्याची जबाबदारी तीन कंपन्यांनावर सोपवली आहे. येत्या 15 दिवसांत पोर्टल तयार करून त्यावर नंबर प्लेटसाठी नोंदणी करावी लागणार आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर कारवाई करता यावी, याकरिता ही नंबर प्लेट सक्तीची केली आहे.
ट्राफिक सिग्नल तोडला तर कॅमेऱ्यात ही नंबर प्लेट लगेच रिजिस्टर्ड होते. हाय सिक्युरिटी नंबर प्लेट वाहनाला लावल्यानंतर पुन्हा काढता येत नाही. अत्याधुनिक तंत्रज्ञानाने नंबर प्लेट बनविलेली असते. त्यामुळे क्रमांकात छेडछाड करता येत नाही व चोरीचे वाहन पकडणेही शक्य होते.
नंबर प्लेटसाठी केंद्र उघडणार
सर्वोच्च न्यायालयाने राज्यातील सर्वच वाहनांना उच्च सुरक्षा क्रमांक पाटी अनिवार्य करण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार परिवहन विभागाने 31 मार्च 2025पर्यंत जुन्या वाहनांची नोंदणी करणे आणि त्यानंतरच्या तीन महिन्यांत नंबर प्लेट बसविणे अनिवार्य केले आहे.
दरम्यान, हायसिक्युरिटी नंबर प्लेट बसविण्यासाठी संबंधित कंपनी वाहनाच्या संख्येनुसार शहरात व जिल्ह्यात केंद्र स्थापन करणार आहे. पुणे- मुंबईसारख्या शहरांत केंद्रांची संख्या अधिक असेल. मात्र, अन्य जिल्ह्यांत सरासरी आठ ते दहा केंद्र स्थापन केले जातील. शिवाय ही नंबर प्लेट बसविण्यापूर्वी ऑनलाइन पोर्टलवर अगोदर नोंदणी करून वेळदेखील घ्यावी लागणार आहे. दिलेल्या वेळेतच वाहनांना पाट्या बसविल्या जातील.
हेदेखील वाचा : Rajya Sabha: उपाध्यक्ष जगदीप धनखर यांना हटवण्यासाठी विरोधकांनी अविश्वास प्रस्ताव का आणला? जयराम रमेश यांनी सांगितलं कारण






