Hindu and administration Dispute over immersion of Ganesha in Panchganga river Kolhapur News
कोल्हापूर : लवकरच संपूर्ण देशामध्ये गणेशोत्सव मोठ्या उत्साहामध्ये साजरा केला जाणार आहे. मात्र कोल्हापूरमध्ये विसर्जनावरुन वाद निर्माण झाला आहे. पंचगंगेमध्ये गणेश मूर्ती विसर्ज करण्यास प्रशासनाकडून विरोध करण्यात आला आहे. मात्र नदीमध्ये विसर्जन करणे हा हिंदूंचा हक्क आहे अशी भूमिका हिंदूत्ववादी लोकांनी घेतली आहे. पंचगंगेमध्ये विसर्जन न करण्याबाबत प्रशासनाकडून बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बैठकी संदर्भात महापालिका प्रशासनाने हिंदु जनजागृती समितीला लेखी पत्र दिले होते. त्यानंतर ही बैठक आयोजित करण्यात आली होती.
गणेशविसर्जनाच्या संदर्भात प्रशासन जरी विविध शासन आदेश, तसेच न्यायालयाचे आदेश पुढे करत असले, तरी भाविकांनी विसर्जन करू नये यांसाठी पंचगंगा नदीवर ‘बॅरिकेटस्’ घालावे असा आदेश कुठेही दिलेला नाही. प्रशासन वर्षभर विविध मार्गांनी होणाऱ्या प्रदुषणाकडे डोळेझाक करते आणि केवळ गणेशोत्सवातच जागे होते. नदीत विसर्जन हा हिंदूंचा धार्मिक अधिकार असल्याने श्री गणेशमूर्तीचे विसर्जन पंचगंगा नदीतच करण्याच्या मागणीवर हिंदुत्वनिष्ठ ठाम आहेत, अशी भूमिका हिंदुत्वनिष्ठांनी प्रशासनासमवेत बोलावलेल्या बैठकीत मांडली.
यावेळी उपायुक्त शिल्पा दरेकर, तसेच प्रदूषण मंडळाचे अधिकारी, दीपक देसाई , सुशील भांदिगरे, उदय भोसले, किशोर घाटगे, संभाजी साळोखे, दीपक देसाई, सुशील भांदिगरे, राजेंद्र तोरस्कर आणि विकास जाधव, शरद माळी, आशिष लोखंडे, योगेश केरकर, निरंजन शिंदे, शिवानंद स्वामी आणि आदित्य शास्त्री उपस्थित होते.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
वर्षभर विविध मार्गाने होतंय प्रदूषण
या बैठकीमध्ये उदय भोसले म्हणाले, वर्षभर नाले, साखर कारखाने यांसह अनेक मार्गाने प्रदूषण होत असतांना महापालिका प्रशासन आणि प्रदूषण मंडळ कुठे असते? महापालिका प्रशासन प्रशासनानेच नेहमी ‘आमचे प्रयत्न चालू आहेत’, असे ठोकळेबाज उत्तर असते. वर्षभर नदी प्रदषित होत असतांना पुरोगामी कुठे असतात? गणेशक्त, नागरिक नदीत विसर्जन करण्यास ठाम आहेत.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
गणेशमूर्तींचा अनादर केला जातो
संभाजी साळुंखे म्हणाले, “श्रीगणेशमूर्ती विसर्जनामुळे प्रदूषण वाढते असा कुठला अहवाल प्रशासनाकडे आहे का? वर्षातून एकदा येणार्या गणेशविसर्जनाच्या वेळीच प्रशासन का आडकाठी निर्माण करते? गेली दोन वर्षे जनता भाविक पंचगंगा नदीतच विसर्जन करत असून ते यंदाही नदीतच विसर्जन करतील. महापालिका प्रशासनाकडून कृत्रिम हौदात विसर्जन केलेल्या श्री गणेशमूर्तींचा अनादर केला जातो. या मूर्ती पाय देऊन उचलल्या जातात. तरी त्यांची कोणत्याही परिस्थितीत हेळसांड होऊ नये म्हणून योग्य ती दक्षता घ्यावी. बैठक झाल्यावर महापालिकेत शिवसेनेचे आमदार आणि राज्य नियोजन महामंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांची हिंदुत्वनिष्ठांशी भेट झाली असता त्यांनी यंदाही भाविक आणि गणेशभक्त श्री गणेशमूर्तीचे पंचगंगा नदीतच विसर्जन करतील,” असे सर्वांना आश्वस्त केले.