Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Baramati Assembly bypoll Elections 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

हिंगोली शहर वाहतूक कोंडीत गुदमरतेय; प्रशासनाला नेमकी कधी जाग येणार ? नियोजनशून्य कारभार

हिगोली शहरातील प्रमुख रस्त्यांवर वाहनांची गर्दी, बेशिस्त पार्किंग आणि नियोजनशून्य कारभार यामुळे नागरिकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Feb 09, 2026 | 04:24 PM
Traffic congestion haphazard parking and lack of planning on main roads of Hingoli city

Traffic congestion haphazard parking and lack of planning on main roads of Hingoli city

Follow Us
Close
Follow Us:
  • हिंगोलीच्या प्रमुख शहरांमध्ये प्रचंड  वाहतूक कोंडी
  • बेशिस्त पार्किंगमुळे उडाला सावळा गोंधळ
  • प्रशासनाकड़ून परिस्थितीकडे कानाडोळा
 

मकरंद बांगर : हिंगोली : हिंगोली शहर सध्या अक्षरशः वाहतूक कोंडीच्या विळख्यात सापडले आहे. यामुळे सामान्य नागरिक, विद्यार्थी आणि जेष्ठांना रस्त्यावर चालताना आणि रस्ता ओलांडताना देखील मोठा त्रास सहन करावा लागतो आहे. (Hingoli News) शहरातील प्रमुख रस्त्यांवर वाहनांची गर्दी, बेशिस्त पार्किंग आणि नियोजनशून्य कारभार यामुळे नागरिकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले आहे. प्रश्न असा आहे की, हे सर्व रोज दिसत असताना प्रशासनाला नेमके कधी जाग येणार? असा प्रश्न निर्माण होत आहे. (Traffic News)

गांधी चौक – बाजारपेठ की पार्किंग झोन ?

गांधी चौक ही शहराची मध्यवर्ती बाजारपेठ असताना येथे पादचाऱ्यांना चालण्यासाठी जागा उरलेली नाही. भाजी मंडी, फळविक्रेते, दुकाने, लॉज आणि रुग्णालये याच ठिकाणी असल्याने नागरिकांची गर्दी वाढते. मात्र पार्किंगची कोणतीही ठोस व्यवस्था नसताना वाहने रस्त्याच्या मधोमध लावली जातात. ही परिस्थिती पाहून गांधी चौक बाजारपेठ आहे की पार्किंग झोन, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

हे देखील वाचा : “आमच्यावर प्रेम करणा-या कोणत्याही व्यक्तीने..! खासदार उदयनराजे भोसले यांचा वाढदिवस न साजरा करण्याचा निर्णय

मंडईतील अराजकता
भाजी मंडी परिसरात दररोज तासनतास वाहतूक ठप्प होते. फळविक्रेते रस्त्याच्या मधोमध गाड्या लावतात, वाहनचालक मनमानी पार्किंग करतात आणि यावर नियंत्रण ठेवणारी यंत्रणा कुठेच दिसत नाही.

संकट डोळ्यासमोर

अकोला बायपासकडे जाणारा रेल्वे उड्डाणपूल आणि नरसी फाट्याकडे जाणारा कयाधू नदीवरील पूल यांची मुदत संपत आली आहे. आजच नियोजन झाले नाही. तर उद्या मोठा प्रश्न निर्माण होणार हे स्पष्ट आहे नागरिक त्रस्त दररोज होणारी कोंडी, वेळेचा अपव्यय, वाढते अपघात आणि मानसिक त्रास-याची जबाबदारी कोण घेणार? प्रशासन, वाहतूक पोलीस, नगरपालिका आणि संबंधित विभाग यांनी एकमेकांकडे बोट दाखवण्याऐवजी ठोस निर्णय घ्यावे, अशी तीव्र मागणी नागरिकांकडून होत आहे.

हे देखील वाचा : Political News : प्रशासक की ‘सत्तेचा हस्तक’? नायगाव तालुक्यात लोकशाहीला ब्रेक

वाहतूक नियंत्रण नाही

या संपूर्ण परिसरात पोलिसांचा तळ असतानाही वाहतूक शाखेचा कर्मचारी क्वचितच दिसतो. नियम मोडणा-यांवर कारवाई का होत नाही? की नियम फक्त कागदावरच आहेत? असा संतप्त सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.

सिग्नल व्यवस्था बसवली, पण कधीच चालू नाही !

जिल्हा निर्मितीनंतर सिग्नल व्यवस्था सुरू होणे अपेक्षित होते. सिग्नल बसवले गेले, निधी खर्च झाला; मात्र आजपर्यंत एकही सिग्नल प्रभावीपणे सुरू झालेला नाही. निधी पोलिसांनी द्यायचा की नगरपालिकेने या वादात वर्षे गेली, पण शहराची वाहतूक मात्र अडचणीतच राहिली.

Web Title: Traffic congestion haphazard parking and lack of planning on main roads of hingoli city

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 09, 2026 | 04:24 PM

Topics:  

  • Hingoli News
  • nanded news
  • Traffic News

संबंधित बातम्या

Nanded News : ४७ अंशात चिमुकल्यांच्या जीवाशी खेळ; पत्र्याच्या खोल्यांत स्कॉलरशिप परीक्षा
1

Nanded News : ४७ अंशात चिमुकल्यांच्या जीवाशी खेळ; पत्र्याच्या खोल्यांत स्कॉलरशिप परीक्षा

जनगणनेसाठी तयारी झाली पूर्ण…! ९४ गावांत २०३ गटांची रचना, २५८ कर्मचाऱ्यांची नियुक्ती
2

जनगणनेसाठी तयारी झाली पूर्ण…! ९४ गावांत २०३ गटांची रचना, २५८ कर्मचाऱ्यांची नियुक्ती

Maharashtra Politics : वादाची ठिणगी, संघर्षाचा ज्वालामुखी; नांदेड – परभणी भाजपमध्ये उफाळला असंतोष
3

Maharashtra Politics : वादाची ठिणगी, संघर्षाचा ज्वालामुखी; नांदेड – परभणी भाजपमध्ये उफाळला असंतोष

Maharashtra Politics : ‘प्रमोशन टू डिमोशन’ चा भाजपत मोठा खेळ सुरू; राजकीय चर्चाना आले उधाण
4

Maharashtra Politics : ‘प्रमोशन टू डिमोशन’ चा भाजपत मोठा खेळ सुरू; राजकीय चर्चाना आले उधाण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.