Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 11 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पुण्यात पावसाने घेतली विश्रांती; गुरुवारपासून गायब झालेला पाऊस आता कधी येणार?

हवामानशास्त्र विभागाने अंदाज वर्तवला होता. त्यात शनिवारी (ता.११) शहरातील किमान तापमानात किंचित वाढ होण्याची शक्यता आहे. कमाल तापमान ३० अंश सेल्सिअसच्या आसपास स्थिर राहण्याचा अंदाज आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Jul 11, 2026 | 02:56 PM
पुण्यात पावसाने विश्रांती घेताच उकाड्यात झाली वाढ

पुण्यात पावसाने विश्रांती घेताच उकाड्यात झाली वाढ

Follow Us
Follow Us:

पुणे : संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याच्या मुक्कामादरम्यान दरवर्षी पावसाची हजेरी लागते. मात्र, यंदा पालखी पुण्यात मुक्कामी असताना पावसाने विश्रांती घेतली आहे. गुरुवारपासून गायब झालेला पाऊस शुक्रवारीही (ता.१०) पडला नाही. दुपारच्या सुमारास आकाश ढगाळ झाल्याने पावसाची शक्यता निर्माण झाली होती. मात्र, पावसाने हजेरी न लावल्याने पालखी दर्शनासाठी आलेले नागरिक आणि मुक्कामी असलेले वारकरी सुखावले. शनिवारीही साधारणत: अशीच परिस्थिती पाहिला मिळाली.

पुण्यात शनिवारी पावसाने दडी मारल्याचे दिसून आले. वातावरणात बदल पाहिला मिळाला असून, उकाड्यात वाढ झाली. पुणे शहर आणि परिसरात शुक्रवारी कमाल आणि किमान तापमानात वाढ नोंदविण्यात आली. शहराचे कमाल तापमान ३० अंश सेल्सिअस, तर किमान तापमान २३.९ अंश सेल्सिअस नोंदवले गेले. आकाशात ढगाळ वातावरण असतानाही उन्हाचा चटका जाणवत असल्याने नागरिकांना उकाड्याचा सामना करावा लागला.

Mumbai News : प्रदूषणमुक्तीची ‘मिठी’ फक्त कागदावरच! मुंबईकरांना सांडपाण्याचा त्रास, तर महानगरपालिकेच्या तिजोरीला २१ कोटींचा भुर्दंड

हवामानशास्त्र विभागाने अंदाज वर्तवला होता. त्यात शनिवारी (ता.११) शहरातील किमान तापमानात किंचित वाढ होण्याची शक्यता आहे. कमाल तापमान ३० अंश सेल्सिअसच्या आसपास स्थिर राहण्याचा अंदाज असून, किमान तापमान २४ अंश सेल्सिअसपर्यंत जाण्याची शक्यता आहे.

आकाश सामान्यतः ढगाळ राहून हलक्या ते अतिहलक्या स्वरूपाच्या पावसाच्या सरी पडण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. पण, दुपारपर्यंत पावसाची चिन्हे दिसून आली नाहीत. दरम्यान, रविवारनंतर पुणे शहरातील तापमानात हळूहळू वाढ होण्याची शक्यता असून, काही ठिकाणी अतिहलक्या पावसाच्या सरी पडण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

वर्ध्यात नदीकाठच्या २९३ गावांवर पुराचे सावट

दुसरीकडे, मान्सूनच्या तोंडावर वर्धा जिल्हा प्रशासन अलर्ट मोडवर आले आहे. जिल्ह्यातील २९३ गावे नदीकाठावर असून त्यापैकी २७ गावांचा पावसाळ्यात संपर्क तुटण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. संभाव्य पूरस्थितीचा सामना करण्यासाठी बचाव पथके, बोटी, जीवनरक्षक साहित्य तसेच नियंत्रण कक्ष सज्ज ठेवण्यात आले आहेत. नागरिकांनी सतर्क राहून प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

Web Title: Humidity levels rose in pune as soon as the rain took a break

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 11, 2026 | 02:56 PM

Topics:  

  • Climate Change
  • Rain News
  • Weather Update

संबंधित बातम्या

Rain Update : 9 दिवसांतच पावसाचा हाहा:कार; जुलैच्या पावसाने भरली जूनमधील तूट
1

Rain Update : 9 दिवसांतच पावसाचा हाहा:कार; जुलैच्या पावसाने भरली जूनमधील तूट

Pune News: माऊलींसाठी ‘वरुणराजा’ची विश्रांती! वारकऱ्यांना मिळाला मोठा दिलासा; उद्यापासून तापमानात…
2

Pune News: माऊलींसाठी ‘वरुणराजा’ची विश्रांती! वारकऱ्यांना मिळाला मोठा दिलासा; उद्यापासून तापमानात…

देशातील अनेक राज्यांत मुसळधार पाऊस; हवामान विभागाकडून ‘रेड अलर्ट’ जारी
3

देशातील अनेक राज्यांत मुसळधार पाऊस; हवामान विभागाकडून ‘रेड अलर्ट’ जारी

Maharashtra Rain Alert: घाटमाथ्यावर पावसाचे ‘रौद्ररूप’; तर पुणे शहरात…, हवामान विभागाचा अलर्ट काय?
4

Maharashtra Rain Alert: घाटमाथ्यावर पावसाचे ‘रौद्ररूप’; तर पुणे शहरात…, हवामान विभागाचा अलर्ट काय?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.