नाशिक : महाराष्ट्र विधान परिषदेच्या (Maharashtra Legislative Council Election) 5 जागांसाठी आज मतदान होत आहे. नाशिक पदवीधर मतदारसंघात काँग्रेसचे बंडखोर उमेदवार सत्यजित तांबे (Satyajeet Tambe) आणि महाविकास आघाडीच्या उमेदवार शुभांगी पाटील (Shubhangi Patil) यांच्यात प्रमुख लढत होत आहे. यावेळी सत्यजित तांबे यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, ‘आम्ही फक्त निवडणुकांपुरते राजकारण करतो. आम्हाला 100 पेक्षा जास्त संघटनांनी पाठिंबा दिला आहे. मी अपक्ष उमेदवार आहे आणि अपक्षच राहणार असेही त्यांनी सांगितले.
नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या जागेसाठी मतदान होत आहे. ही निवडणूक चागलीच चर्चेत आली आहे. सुधीर तांबे यांना नाशिक मतदारसंघासाठी काँग्रेसकडून उमेदवारी देण्यात आली होती. मात्र, त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला नाही. तर दुसरीकडे त्यांचे पुत्र सत्यजित तांबे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यामुळे पक्षादेश डावलल्यानं सुधीर तांबे यांच्यावर काँग्रेसनं कारवाई केली तर सत्याजित तांबे यांना पाठिंबा न देता अपक्ष उमेदवार शुभांगी पाटील यांना पाठिंबा देण्याचा निर्णय महाविकास आघाडीने घेतला. त्यानंतर सत्यजित तांबे यांना भाजपने पाठिंबा दिला आहे.
आता फक्त मताधिक्य पाहण्याची गरज
आम्ही फक्त निवडणुकांपुरते राजकारण करतो. आम्हाला 100 पेक्षा जास्त संघटनांनी पाठिंबा दिला आहे. आता फक्त मताधिक्य पाहण्याची गरज आहे. मी अपक्ष उमेदवार आहे आणि अपक्ष उमेदवारच राहणार आहे, असे सत्यजित तांबे यांनी म्हटले आहे.
सत्यजित तांबेंनी भाजपमध्ये प्रवेश करावा : राधाकृष्ण विखे-पाटील
सत्यजित तांबेंनी आता भाजपमध्ये प्रवेश करावा, असे मंत्री व भाजपचे नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटले. तसेच आमच्या सर्व कार्यकर्त्यांनी सत्यजित तांबेंना मतदान तसेच पाठिंबा देण्याची निर्णय घेतला आहे.
पाच जागांसाठी होतेय निवडणूक
महाराष्ट्र विधान परिषदेच्या 5 जागांसाठी आज मतदान होत आहे. नाशिक पदवीधर मतदारसंघात सत्यजित तांबे आणि महाविकास आघाडीच्या उमेदवार शुभांगी पाटील यांच्यात प्रमुख लढत होत आहे. तर नागपूर शिक्षक जागेवर भाजपचे नागो गाणार यांच्या विरोधात आघाडीचे सुधाकर अडागळे, अमरावती पदवीधर जागेवर भाजपचे रणजित पाटील विरूद्ध धीरज लिंगाडे, औरंगाबादमध्ये राष्ट्रवादीचे विक्रम काळे यांच्याशी किरण पाटील यांच्यात लढत आहे. कोकणात आघाडीचे बाळाराम पाटील हे भाजपचे ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्यात लढत आहेत. या निवडणुकीत एकूण ८३ जण रिंगणात आहेत.