मुंबई : अंधेरी पूर्व मतदारसंघाचे (Andheri East Assembly) शिवसेनेचे आमदार रमेश लटके (Ramesh Latke) यांचे निधन झाल्यानंतर पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. या निवडणुकीमुळे शिवसेनेतील ठाकरे गट आणि शिंदे गट व भाजपा मैदानात उतरले आहेत. ठाकरे गटाकडून रमेश लटके यांच्या पत्नी ऋतूजा लटके (Rutuja Latke) यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. अनेक समस्यांना सामोरी जात तसेच न्यायालयीन लढाई जिंकल्यानंतर आज लटके यांचा नोकरीचा राजीनामा (Resign) पालिकेनं मंजूर केला आहे. त्यानंतर त्यांनी मविआच्या नेत्यांसोबत अर्ज दाखल केला. तर भाजप-महायुतीचा उमेदवार मुरजी पटेल (Murji Patel) यांनी देखील आज उमेदवार अर्ज दाखल केला.
[read_also content=”‘डीपीडीसी’तून मिळणार मत्स्यव्यवसाय विकासाकरिता निधी, मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा महत्वपूर्ण निर्णय https://www.navarashtra.com/maharashtra/give-funds-for-fisheries-development-from-dpdc-minister-sudhir-mungantiwar-decision-336105.html”]
दरम्यान, दोन्ही उमेदवारांनी अर्ज दाखल केल्यानंतर त्यांच्या प्रतिक्रिया समोर आल्या आहेत. मला विजयाची शंभर टक्के खात्री असून, माझा विजय पक्का आहे, विजयाचा मला आत्मविश्वास आहे. असं भाजप-महायुतीचा उमेदवार मुरजी पटेल (Murji Patel) यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर प्रतिक्रिया दिली आहे. तर ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतूजा लटके (Rutuja Latke) यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची मशाल आता संपूर्ण महाराष्ट्रभर जाणार आहे, आणि त्याची सुरुवात माझ्या विजयाने होणार असं लटके यांनी म्हटलं आहे.