'मोदी, शहा व फडणवीस मुंबई गिळण्याचे काम करतील'; खासदार संजय राऊत यांची टीका
मुंबई : “ईडीने माझ्या नातेवाईकांवर आणि मित्रांवर छापे टाकले. मी राजकारणी आहे, मी सहन करेल, पण माझ्यामुळे मित्रांना त्रास झाला, धमक्या दिल्या गेल्या, याचं वाईट वाटतं.”अशा भावना खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केल्या. खासदार संजय राऊत यांच्या ‘नरकातला स्वर्ग’ या पुस्तकाचे प्रकाशन आज पार पडत आहे. या पुस्तकाला येणाऱ्या प्रतिसादाबद्दल ते माध्यमांशी बोलत होते. या पुस्तकाला देशभरातून उत्तम प्रतिसाद मिळत असून, अनेक ठिकाणांहून त्यांना फोन येत असल्याची माहिती त्यांनी दिली. याचवेळी त्यांनी केंद्र सरकार आणि त्यांच्यावर झालेल्या ईडी कारवाईवरही भाष्य केलं.
ईडीच्या कारवायांवर टीका करताना राऊत म्हणाले, “जसं यमदूत उचलून नेतात, तसं ईडी अधिकारीही लोकांना उचलून नेतात. जणू काही डॉन आहेत ते! असा बकवास तपास कोणी करतं का?” ईडी कारवाईदरम्यान त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना रात्री ११ वाजता कॉल केला होता. “त्यावेळी ते कामात होते, पण ४ मिनिटांनी त्यांनी परत फोन केला. मी त्यांना विचारलं की माझ्या मित्रावर रेड पडतेय, हे तुमच्या मंजुरीने होतंय का? जर मला अटक करायची असेल, तर मी दिल्लीतच आहे, हे नाटक बंद करा. ते म्हणाले, मला माहितीच नाही. पण केंद्रीय गृहमंत्री असूनही माहिती नाही हे पटत नाही,” असा सवालही राऊत यांनी उपस्थित केला.
या कारवायांमागे संजय मिश्रा हे पंतप्रधान नरेंद्र मोदींना ब्रिफ करत होते आणि देशातील सर्वात मोठा घोटाळा असल्याचं चित्र निर्माण केलं जात होतं. अटकेपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा फोन आल्याचेही राऊत यांनी यावेळी सांगितलं. “शिंदे म्हणाले की, मी वरती बोलू का? अमित शाह यांना सांगू का? मी त्यांना स्पष्ट सांगितलं, काही गरज नाही. मी तुमच्या पक्षात येणार नाही,” असं राऊत म्हणाले.
कार्यकर्त्यांना ताकद देऊन पक्ष संघटना मजबूत करणार…; भाजपचे नवीन जिल्हाध्यक्ष अतुल भोसले यांची ग्वाही
“शिवसेना-भाजप यांच्यातील कटुतेला अमित शाह जबाबदार आहेत. नरेंद्र मोदींसोबत आमचे संबंध चांगले होते, पण अमित शाह दिल्लीत सक्रिय झाल्यानंतर भाजपसोबतचं नातं बिघडलं.” अशा शब्दांत संजय राऊत यांनी अमित शाहांवर थेट आरोपही केला. तसेच, काही भाजप नेत्यांनीही अमित शाह यांना सल्ला दिला होता की, शिवसेनेशी संबंध बिघडवू नका.असही त्यांनी नमुद केलं. दरम्यान प्रियंका चतुर्वेदी यांच्या नावाचा शिष्टमंडळात समावेश झाल्याच्या प्रश्नावर राऊत म्हणाले, “माझ्याकडे याची माहिती नाही. परस्पर नाव गेलं असेल, तर मला माहीत नाही. यावर पक्ष निर्णय घेईल.”
शरद पवार-अजित पवार एकत्र येणार का? राष्ट्रवादी काँग्रेसच्या ‘या’ बड्या नेत्यानं केलं मोठं विधान