Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 8 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मनसेच्या सभेत मला भाषण करू दिले नाही; वसंत मोरेंनी व्यक्त केली खदखद

राज ठाकरे यांच्या २२ मे रोजी झालेल्या सभेत मोरेंनी स्वतंत्र बाईक रॅली काढत जोरदार शक्तिप्रदर्शन केले होते. त्याचदिवशी त्यांनी पक्षातील काही नेत्यांवर झारीतले शुक्राचार्य कोण आहेत? अशा शब्दात अप्रत्यक्ष टोला लगावला होता. आता मात्र वसंत मोरे यांनी मनसेचे नेते बाबू वागस्कर यांच्यावर थेट नाव घेऊन आपली उघड नाराजी व्यक्त केली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: May 29, 2022 | 10:43 PM
मनसेच्या सभेत मला भाषण करू दिले नाही; वसंत मोरेंनी व्यक्त केली खदखद
Follow Us
Follow Us:

पुणे : गेल्या अनेक दिवसांपासून मनसे नेते वसंत मोरे पक्षावर नाराज असल्याचे बोलले जात होते. वसंत मोरेंनी अनेकदा ही नाराजी बोलून दाखवली. परंतु त्यांनी कधी पक्षांतर्गत नेत्यांची नावे घेतली नव्हती. प्रत्यक्ष कोणाचेही नाव घेऊन टीका केली नव्हती. मात्र वेळ आल्यावर आपण नावं उघड करू, असं वसंत मोरे यांनी या पूर्वीच म्हटले होते.

दरम्यान राज ठाकरे यांच्या २२ मे रोजी झालेल्या सभेत मोरेंनी स्वतंत्र बाईक रॅली काढत जोरदार शक्तिप्रदर्शन केले होते. त्याचदिवशी त्यांनी पक्षातील काही नेत्यांवर झारीतले शुक्राचार्य कोण आहेत? अशा शब्दात अप्रत्यक्ष टोला लगावला होता. आता मात्र वसंत मोरे यांनी मनसेचे नेते बाबू वागस्कर यांच्यावर थेट नाव घेऊन आपली उघड नाराजी व्यक्त केली आहे.

वसंत मोरे नेमकं काय म्हणाले? 

बाबू वागस्कर यांनी मोरेंचे निकटवर्तीय निलेश माझिरे यांना मनसे माथाडी कामगार शहराध्यक्ष पदावरून काढून टाकल्याने मोरेंनी आपली खदखद व्यक्त केली आहे. मोरे म्हणाले, प्रत्येक वेळी वसंत मोरेंनीच का माघार घ्यायची? प्रत्येक वेळी मीच पावले मागे घ्यायची? आणि यांनी फक्त घेतल्यासारखं दाखवायचं,असं आता होणार नाही. माझा बांध फुटणार आहे. पण मी पक्ष सोडणार नाही, असेही वसंत मोरे म्हणाले आहेत.

[read_also content=”सुप्रसिद्ध सिनेलेखक संजित नार्वेकर यांना डॉ. व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्कार प्रदान https://www.navarashtra.com/maharashtra/well-known-film-writer-sanjit-narvekar-to-dr-v-awarded-the-shantaram-lifetime-achievement-award-nrdm-286307.html”]

२२ मे रोजी गणेश कला क्रिडा संकुल येथे झालेल्या मनसेच्या सभेत आपल्याला जाणीवपूर्वक बोलू दिले नाही, असा गंभीर आरोप वसंत मोरे यांनी केला आहे. आपल्याला भाषणाची संधी दिली गेली नाही. मंचावर जे नेते बोलत होते, त्यापैकी अनेकांपेक्षा मी नक्कीच वरिष्ठ होतो, माझ्या भाषणाची स्क्रिप्ट सुद्धा तयार होती. स्क्रिप्ट अजूनही गाडीत पडून आहे. माझा आता नक्कीच बांध फुटेल. पण आता तरी पक्ष सोडण्याचा माझा विचार नाही, अशी खदखद वसंत मोरे यांनी व्यक्त केली आहे.

Web Title: I was not allowed to speak at the mns meeting expressed by vasant more nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 29, 2022 | 10:43 PM

Topics:  

  • MNSRaj Thackeray
  • NAVARASHTRA
  • Vasant more

संबंधित बातम्या

Raigad News: अलिबाग-रोहा मार्ग पुन्हा फोडून काँक्रीटीकरण सुरू! वर्षभरातच रस्ता झाला खराब, नागरिक त्रस्त
1

Raigad News: अलिबाग-रोहा मार्ग पुन्हा फोडून काँक्रीटीकरण सुरू! वर्षभरातच रस्ता झाला खराब, नागरिक त्रस्त

Chandrapur News: कापूस उत्पादकांवर दुष्काळाचे संकट; उत्पादनात 35-50% घट होण्याची शक्यता, पंचनामे आणि सर्वेक्षणाला सुरुवात
2

Chandrapur News: कापूस उत्पादकांवर दुष्काळाचे संकट; उत्पादनात 35-50% घट होण्याची शक्यता, पंचनामे आणि सर्वेक्षणाला सुरुवात

Vasai-Virar News: वसई-विरार नाट्यगृहाला ‘मजेटीया’ नाव देण्यास विरोध; ‘या’ नावाची मागणी, आंदोलनाचा इशारा
3

Vasai-Virar News: वसई-विरार नाट्यगृहाला ‘मजेटीया’ नाव देण्यास विरोध; ‘या’ नावाची मागणी, आंदोलनाचा इशारा

वसई-विरार महापालिकेविरोधात मनसेचे ‘भीक मांगो’ आंदोलन;स्मशानभूमी कंत्राटातील कथित गैरव्यवहाराचा आरोप
4

वसई-विरार महापालिकेविरोधात मनसेचे ‘भीक मांगो’ आंदोलन;स्मशानभूमी कंत्राटातील कथित गैरव्यवहाराचा आरोप

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.