मुंबई: मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे यांच्याकडून वेळोवेळी उपोषण-आंदोलन केले जात आहे. त्यानंतर आता त्यांनी आझाद मैदानावर उपोषण सुरु केले आहे. मनोज जरांगे यांच्या उपोषणाचा हा आजचा तिसरा दिवस आहे. आज त्यांनी घेतललेल्या पत्रकार परिषदमध्ये म्हणाले मागण्या पूर्ण न झाल्यास आणखी कडक उपोषण करणार असल्याचा इशारा आज त्यांनी दिला आहे. उद्यापासून पाणी देखील पाणीही घेणार नसल्याचे जरांगेंनी म्हटले आहे.
आज त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना, त्यांनी म्हटले आहे की, उद्यापासून उपोषण आणखी कडक करणार. काल आणि आज मी पाणी प्यायलो पण उद्यापासून मी पाणी पण पिणार नाही. पाणी बंदच करणार. सरकार ऐकत नाही, त्यासाठी उपोषण आणखी कडक करणार आहे. “महाराष्ट्रातील मराठा बांधवांनी कोणालाही पैसे देऊ नये. स्वार्थी लोक या आंदोलनात असू नयेत,” असंही आवाहन त्यांनी केलं.
उपोषणाच्या स्वरूपातही मोठा बदल जाहीर करत त्यांनी सांगितलं की, “उद्यापासून मी पाणी पिणं बंद करणार आहे. उपोषण अधिक कडकपणे सुरू होईल. कोणत्याही परिस्थितीत आता मागे हटणार नाही.”
यासोबतच मराठ्यांना आवाहन करताना ते म्हणाले, मराठा तरुणांनी मान खाली घालावी लागेल असं पाऊल उचलू नये. सर्वांनी शांत राहायचं आहे. यांनी कितीही अन्याय अत्याचार करू द्या. मी आरक्षण घेतल्याशिवाय मुंबई सोडणार नाही, असा अल्टिमेटमच जरांगेंनी सरकारला दिला आहे. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्य सरकार आता काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, मध्यरात्रीपासून जरांगे पाटलांची प्रकृती खालावली आहे. त्यामुळे त्यांची डॉक्टरांकडून तपासणी करण्यात आली. गेल्या दोन दिवसांपासून पोटात अन्नाचा आणि पाण्याचा थेंबही न गेल्याने आता मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावण्यास सुरुवात झाली आहे. याठिकाणी तातडीने डॉक्टरांना पाचारण करण्यात आले. डॉक्टरांनी त्यांची तपासणी केली असून, आणखी काही काळ मनोज जरांगे यांचे उपोषण सुरु राहिल्यास त्यांची प्रकृती वेगाने ढासळू शकते, असे सांगण्यात येत आहे.
दरम्यान, शनिवारी मराठा आरक्षणासंबंधित समितीने मनोज जरांगे यांची भेट घेतली. मात्र, जरांगेंसोबत त्यांची चर्चा यशस्वी ठरली नाही. सरकार फक्त वेळकाढूपणा करत आहे आणि समितीला खरे अधिकार दिलेले नाहीत. निवृत्त न्यायाधीश संदीप शिंदे यांचे काम शासन अध्यादेश (जीआर) जारी करणे नाही., असेही जरांगे पाटील यांनी म्हटले होते.