Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mangal Prabhat Lodha : विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाचे तंत्रज्ञान शिकण्याची संधी मिळणार, मंगलप्रभात लोढा यांचे आश्वासन

महाराष्ट्रातील आयटीआय संस्थेत इलेक्ट्रॉनिक्स अभ्यासक्रमांसाठी अद्ययावत प्रयोगशाळा स्थापन करणार येणार आहे. रुणांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी कंपनीला सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन मंत्री लोढा यांनी यावेळी दिले.

  • By श्वेता झगडे
Updated On: Dec 17, 2025 | 06:18 PM
विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाचे तंत्रज्ञान शिकण्याची संधी मिळणार, मंगलप्रभात लोढा यांचे आश्वासन

विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाचे तंत्रज्ञान शिकण्याची संधी मिळणार, मंगलप्रभात लोढा यांचे आश्वासन

Follow Us
Close
Follow Us:
  • सर्वतोपरी सहकार्याचे कौशल्य विकास मंत्री
  • महाराष्ट्रातील आयटीआय संस्थेत
  • महाराष्ट्रातील तरुणांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी प्रयत्न
मुंबई : अमेरिकास्थित बहुराष्ट्रीय जबील कंपनीने महाराष्ट्रातील काही निवडक आयटीआयमध्ये अत्याधुनिक इलेक्ट्रॉनिक्स प्रशिक्षणासाठी पुढाकार घेतला आहे. इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रातील जबील (Jabil) कंपनीच्या शिष्टमंडळाने आज कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांची त्यांच्या मंत्रालयातील दालनात भेट घेतली. यावेळी कंपनीने महाराष्ट्रातील आयटीआय संस्थेत इलेक्ट्रॉनिक्स अभ्यासक्रमांसाठी अद्ययावत प्रयोगशाळा स्थापन करणार असल्याचे सांगितले. महाराष्ट्रातील तरुणांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी कंपनीला सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन मंत्री लोढा यांनी यावेळी दिले.

तरुणांना रोजगाराभिमुख आणि स्वयंरोजगारासाठी प्रेरित करण्यासाठी आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनात कौशल्य विभाग विविध उपक्रम राबवत असल्याचे मंत्री लोढा यांनी स्पष्ट केले आहे. याच अनुषंगाने जगभरातील नवे नवे तंत्रज्ञान आयटीआयच्या विद्यार्थ्यांना देण्याचा प्रयत्न असल्याचेही मंत्री लोढा म्हणाले. जबील कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक बी. एन. शुक्ला तसेच कंपनीच्या मनुष्यबळ विभागाचे प्रमुख गुंडूराव पाटील यांच्या सोबत झालेल्या चर्चेत निवडक आयटीआय संस्थांमध्ये इलेक्ट्रॉनिक्स अभ्यासक्रमांसाठी अद्ययावत प्रयोगशाळा स्थापन करणे, प्रशिक्षकांचे प्रशिक्षण, विद्यार्थ्यांना औद्योगिक क्षेत्रासाठी Industry Ready संकल्पनेनुसार कौशल्य प्रशिक्षण देणे तसेच समकक्ष रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे या मुद्द्यांवर यावेळी सविस्तर चर्चा करण्यात आली.

शासनाचे काम करताना शासनानेच कापला शिक्षकांचा पगार! अखेर पुरोगामी शिक्षक संघटनेच्या लढ्याला यश

महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य विकास विभागाकडून जबील कंपनीला आवश्यक ते सहकार्य करण्यात येईल. तसेच राज्यभरात व्यापक प्रमाणावर रोजगाराभिमुख प्रशिक्षण देण्यासाठी अन्य कंपन्यांचा ही सहभाग वाढवण्यासाठी विभाग प्रयत्न करेल असेही मंत्री लोढा यांनी यावेळी स्पष्ट केले. या उपक्रमामुळे महाराष्ट्रातील प्रशिक्षणार्थींना अत्याधुनिक तंत्रज्ञानाधारित प्रशिक्षण मिळणार असून त्याचा भविष्यात मोठा लाभ होणार आहे. या बैठकीत व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाच्या संचालक माधवी सरदेशमुख यांनी आयटीआय मध्ये सध्या सुरु असलेल्या विविध अभ्यासक्रमांची माहितीही जबील कंपनीच्या शिष्टमंडळाला दिली.

दरम्यान, जेबिल (Jabil) ही एक मोठी जागतिक इलेक्ट्रॉनिक्स उत्पादन (Electronics Manufacturing Services – EMS) कंपनी आहे, जी विविध उद्योगांसाठी, जसे की ऑटोमोटिव्ह, दूरसंचार, आरोग्यसेवा, आणि ग्राहक इलेक्ट्रॉनिक्ससाठी, सर्किट बोर्ड्स (PCBs), ऑप्टिकल उत्पादने आणि इतर इलेक्ट्रॉनिक घटक डिझाइन, इंजिनिअरिंग आणि बनवते; भारत, विशेषतः गुजरात आणि तामिळनाडूमध्ये, त्यांचे मोठे गुंतवणूक प्रकल्प सुरू आहेत, ज्यामुळे देशातील इलेक्ट्रॉनिक उत्पादन वाढण्यास मदत होत आहे.

 

राज्यात शिक्षकांसाठी ‘प्रश्न-मंजुषा’! YB सेंटरच्या या उपक्रमात ६००५ शिक्षकांची हजेरी

Web Title: Students will get the opportunity to learn world class technology assures mangalprabhat lodha

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 17, 2025 | 06:18 PM

Topics:  

  • maharashtra
  • Mangal Prabhat Lodha
  • Mumbai

संबंधित बातम्या

MUMBAI : काँग्रेस पाकिस्तानची भाषा बोलणार पक्ष आहे – नितेश राणे
1

MUMBAI : काँग्रेस पाकिस्तानची भाषा बोलणार पक्ष आहे – नितेश राणे

Maharashtra Billionaire: देशात सर्वाधिक श्रीमंत ठरले ‘हे’ राज्य; कोट्यधीश कुटुंबांचा आकडा ऐकुन बसेल धक्का!
2

Maharashtra Billionaire: देशात सर्वाधिक श्रीमंत ठरले ‘हे’ राज्य; कोट्यधीश कुटुंबांचा आकडा ऐकुन बसेल धक्का!

Mumbai-Nashik Highway: प्रवाशांनो लक्ष द्या! ठाण्यातील ‘या’ मार्गांवरील वाहतूक चार महिन्यांसाठी बंद, जाणून घ्या पर्यायी मार्ग
3

Mumbai-Nashik Highway: प्रवाशांनो लक्ष द्या! ठाण्यातील ‘या’ मार्गांवरील वाहतूक चार महिन्यांसाठी बंद, जाणून घ्या पर्यायी मार्ग

राज्याचे क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटे यांना २ वर्षांची शिक्षा! कुठल्याही क्षणी अटक होणार? काय आहे नेमकं प्रकरण?
4

राज्याचे क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटे यांना २ वर्षांची शिक्षा! कुठल्याही क्षणी अटक होणार? काय आहे नेमकं प्रकरण?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.