Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

मतदान केंद्रावर बोगस मतदान झाले असेल तर…; उमेश पाटलांचा रोहित पवारांवर निशाणा

लोकसभा मतदारसंघात बोगस मतदान झाल्याचा आरोप झालाय. शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी व्हिडीओ ट्वीट करून केंद्रीय निवडणूक आयोगाला सवाल केले आहेत. तसेच शरद पवार यांनीही पत्रकार परिषदेतून निशाणा साधला होता, यावरुन आता राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे (अजित पवार गट) नेते उमेश पाटील यांनी प्रतिक्रीया दिली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: May 25, 2024 | 05:16 PM
मतदान केंद्रावर बोगस मतदान झाले असेल तर…; उमेश पाटलांचा रोहित पवारांवर निशाणा
Follow Us
Close
Follow Us:
बीड : लोकसभा मतदारसंघात बोगस मतदान झाल्याचा आरोप झालाय. शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी व्हिडीओ ट्वीट करून केंद्रीय निवडणूक आयोगाला सवाल केले आहेत. तसेच शरद पवार यांनीही पत्रकार परिषदेतून निशाणा साधला होता, यावरुन आता राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे (अजित पवार गट) नेते उमेश पाटील यांनी प्रतिक्रीया दिली आहे.
उमेश पाटील म्हणाले, बीड लोकसभा मतदारसंघातील मतदान 13 मे रोजी संपन्न झाले. मात्र 13 मेला तब्बल दोन आठवडे उलटून गेल्यानंतर तुतारी गटाला राहून राहून बीड जिल्ह्यात व विशेष करून परळी मतदारसंघात बोगस मतदान झाल्याचे साक्षात्कार घडत आहेत, हे अत्यंत हास्यास्पद आहे. बाल मित्र मंडळाचे अध्यक्ष रोहित पवार यांनी याबाबत काही व्हिडीओ पोस्ट केले होते. त्यावरून सोशल मिडियावर त्यांची चांगलीच पंचाईत सुद्धा झाली. मात्र तरीही रडून पडून माझंच खरं असं ते म्हणायचा केविलवाणा प्रयत्न करताना दिसले. असं पाटील म्हणाले.
पुढे बोलताना उमेश पाटील म्हणाले, मुळात कुठल्याही मतदान केंद्रावर जर मतदान बोगस झाले किंवा बूथ ताब्यात घेण्याचा प्रयत्न झाला, किंवा मतदान प्रक्रियेत कोणत्याही प्रकारचा गोंधळ झाला तर त्याची तक्रार करायची विशिष्ट कार्यपद्धती असते, हे बाल मित्र मंडळाच्या अध्यक्षाला माहीत नसेल असे समजू मात्र आता खुद्द शरद पवार सोशल मीडियाच्या आधारे बीड जिल्ह्यात बोगस मतदान झाल्याचे आरोप करत आहेत, हे ऐकून जरा आश्चर्यच वाटले. असंही ते यावेळी म्हणाले.
शरद पवार यांनी हजारावर निवडणुका पाहिल्यात आजवर, त्यांनी असे आरोप आणि तेही निवडणूक झाल्यावर दोन आठवड्यांनी करणे, हे मनाला न पटणारे आहे. बर याचीच दुसरी बाजू पहायची म्हटलं तर, रोहित पवारांनी जे व्हिडिओ व्हायरल केले आहेत, ते परळी मधील आहेत असे समजु, त्यात काय दिसते? एक मोठ्या दाढीवाला शरद पवार पक्षाचा एक तथाकथित नेता बूथ मध्ये घुसून मतदान प्रक्रिया बंद पाडून शासकीय अधिकारी-कर्मचारी यांना शिवीगाळ व दमदाटी करत आहे. काही महिला कर्मचारी देखील तिथं उपस्थित दिसतात, तरीही तो इन कॅमेरा शिव्या देतोय, धमक्या देतोय. मतदान केंद्रावर असा प्रवेश? व्हिडिओ रेकॉर्डिंग? शिवीगाळ? दमदाटी? धमक्या? हे सगळं कोणत्या अधिकाराने व कोणत्या नियमाने होत असेल, याचेही उत्तर शरद पवार देतील का? असा सवाल पाटील यांनी केला.
दुसऱ्या एका व्हीडिओ मध्ये तर कहर आहे, शरद पवारांच्या पक्षाचा तथाकथित बूथ एजंट म्हणून नियुक्त असलेला गवळी नामक व्यक्ती, तोच स्वतः मतदान केंद्रावर फेसबुक लाईव्ह करतो आणि मतदान सुरू असताना गोंधळ घालून ते बंद पाडण्याचा प्रयत्न करतो तो व्हिडिओ अजूनही रोहित पवार यांच्या ट्विटरवर आणि त्या गवळी नामक व्यक्तीच्या फेसबुक वर जसेच्या तसे उपलब्ध आहे. बूथ एजंटने बूथ मध्ये घुसून फेसबुक लाईव्ह करणे कोणत्या कायद्यात बसते? यावर काही कारवाई होणार का? शरद पवार यांनी यावर कारवाईची मागणी का केली नसावी? असा साधा प्रश्न माझ्यासारख्या कार्यकर्त्याला पडतो. असं यावेळी उमेश पाटील म्हणाले.

Web Title: If there is bogus voting at the polling station umesh patil targets rohit pawar nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 25, 2024 | 05:15 PM

Topics:  

  • Nationalist Congress Party
  • rohit pawar
  • Umesh Patil

संबंधित बातम्या

Ahilyanagar : अजित पवारांचे गोरक्षकांविरोधी विधान, सागर बेगांचा संतप्त सवाल
1

Ahilyanagar : अजित पवारांचे गोरक्षकांविरोधी विधान, सागर बेगांचा संतप्त सवाल

मराठ्यांविरोधात इंग्रजांना मदत करणाऱ्या कुटुंबाच्या घशात कोट्यवधींची जमीन? रोहित पवारांच्या रडारवर शिंदे गटाचा बडा नेता
2

मराठ्यांविरोधात इंग्रजांना मदत करणाऱ्या कुटुंबाच्या घशात कोट्यवधींची जमीन? रोहित पवारांच्या रडारवर शिंदे गटाचा बडा नेता

Wardha : मतचोरीविरोधात १९ ऑगस्टला महाविकास आघाडीचा आक्रोश मोर्चा
3

Wardha : मतचोरीविरोधात १९ ऑगस्टला महाविकास आघाडीचा आक्रोश मोर्चा

Navi Mumbai : भाजपवर मतचोरीचा आरोप, काँग्रेसची अनोखी दहीहंडी फोडून निषेध
4

Navi Mumbai : भाजपवर मतचोरीचा आरोप, काँग्रेसची अनोखी दहीहंडी फोडून निषेध

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.