
Rohit Pawar on Sunil Tatkare
बारामती, प्रतिनिधी : खासदार सुनील तटकरे यांना दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादांच्या निधनानंतर त्यांची जागा घ्यायची होती, तसा त्यांनी प्रयत्न देखील केला होता, त्यामुळेच त्यांचे पूर्वीच्या व आत्ताच्या वक्तव्यामध्ये तफावत आहे,आरोप आमदार रोहित पवार यांनी पत्रकारांशी बोलताना केला. (Rohit Pawar)
आमदार रोहित पवार यांनी विद्या प्रतिष्ठान येथील अजितदादांच्या स्मृतीस्थळावर सहकुटुंब येऊन अभिवादन केले. यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
विलीनीकरणाच्या चर्चेवरून सुनील तटकरे यांच्या भूमिकेमध्ये विरोधाभास होत असल्याच्या प्रश्नाबाबत विचारणा केली असता, आमदार रोहित पवार म्हणाले, काही व्यक्तींना अजितदादा गेल्यानंतर त्यांची जागा घ्यायची होती, पक्षाचा कंट्रोल स्वतःकडे ठेवायचा होता, या पार्श्वभूमीवर दुनियेला दाखवण्यासाठी अजितदादांनी विलीनीकरणाची कोणतीच चर्चा आमच्याबरोबर केली नव्हती, असे माध्यमांना सांगितले होते. मात्र आमदार आपल्या सोबत येणार नसल्याची जाणीव त्यांना झाल्याने त्यांची चलबिचल झाली असावी, आणि नऊ महिन्यानंतर त्यांनी अजितदादा असते, तर विलीनीकरण झालं असतं, असे वक्तव्य त्यांनी केले. बऱ्याच वेळा काही गोष्टी मनासारख्या झाल्या नाहीत, त्यावेळी मनाचा समतोल सुटतो, त्यावेळी वेगळं व आत्ता वेगळं तीच अवस्था सुनील तटकरे यांची झाली असावी, असा टोला आमदार रोहित पवार यांनी यावेळी मारला.
राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाबाबत विचारलेल्या प्रश्नावर आमदार रोहित पवार यांनी भाजप हा भांडवलदारांचा पक्ष असून, जाती धर्मात भांडणे लावणारा व कुटुंब फोडणारा पक्ष आहे, त्यामुळे अशा पक्षाबरोबर आम्ही कधीही जाणार नाही, असे सांगत ही आपली वैयक्तिक भूमिका असल्याचे त्यांनी सांगितले.
Ans: अजित पवार यांच्या निधनानंतर सुनील तटकरे यांना त्यांची जागा घ्यायची होती आणि पक्षाचं नियंत्रण स्वतःकडे ठेवण्याचा प्रयत्न होता, असा आरोप रोहित पवार यांनी केला.
Ans: विलीनीकरणाच्या मुद्द्यावर सुनील तटकरे यांच्या भूमिकेत विरोधाभास असल्याचं रोहित पवार म्हणाले. अजितदादा असते तर विलीनीकरण झालं असतं, या विधानाचाही त्यांनी उल्लेख केला.
Ans: रोहित पवार यांनी ही आपली वैयक्तिक भूमिका असल्याचं स्पष्ट करत भाजपसोबत जाणार नसल्याचं सांगितलं.