Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 9 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ajit Pawar Accident Case : अजितदादांच्या अपघाताबाबत 90 टक्के लोकांना घातपाताचा संशय? 15 नोव्हेंबरला रोहित पवार मोठा खुलासा करणार!

Ajit Pawar Accident Case : अजित पवार यांच्या अपघाताबाबत अनेक शंका असून तपास योग्य दिशेने होत नसल्याचा आरोप आमदार रोहित पवार यांनी केला आहे. 15 नोव्हेंबरला महत्त्वाचं प्रेझेंटेशन सादर करणार असल्याचं त्यांनी सांगितलं.

  • By विवेक
Updated On: Nov 09, 2026 | 10:00 PM
Rohit Pawar

Rohit Pawar

Follow Us
Follow Us:
  • अजितदादांच्या अपघाताच्या तपासावर रोहित पवारांचे प्रश्न
  • 15 नोव्हेंबरला रोहित पवार खुलासे करणार
  • सुनील तटकरेंच नाव चर्चेत आल्याने खळबळ
 

मुंबई : दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाताचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. या प्रकरणाचा तपास संथ गतीने सुरू असून तपास योग्य दिशेने होत नसल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी केला आहे. एवढंच नाही, तर या प्रकरणासंदर्भात 15 नोव्हेंबरला महत्त्वाचं प्रेझेंटेशन करणार असल्याची माहितीही त्यांनी दिली. त्यामुळे या प्रेझेंटेशनमध्ये नेमकं काय समोर येणार, याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे. (Ajit Pawar Accident Case)

रोहित पवार म्हणाले की, अजितदादांच्या अपघाताबाबत आमच्या मनात अनेक शंका आहेत. ज्या पद्धतीने तपास व्हायला हवा होता, तसा तो होताना दिसत नाही. साधी एफआयआरदेखील दाखल होत नसल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली.

महाराष्ट्रातील 90 टक्क्यांहून अधिक लोकांना हा अपघात नसून घातपात असावा, असं वाटत असल्याचा दावाही त्यांनी केला.

अजित पवारांच्या अपघातात सुनील तटकरेंचा हात? रामदास कदमांच्या आरोपांनी राजकारणात मोठी खळबळ

15 नोव्हेंबरला रोहित पवार काय सांगणार?

या प्रकरणात काही महत्त्वाच्या बाबी जनतेसमोर आणण्यासाठी 15 नोव्हेंबरला प्रेझेंटेशन करणार असल्याचं रोहित पवार यांनी सांगितलं. या माध्यमातून अजितदादांना न्याय मिळवून देण्याच्या प्रयत्नांना मदत होईल, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. सुनील तटकरे यांचं नाव या प्रकरणाशी जोडण्यावर बोलताना त्यांनी सत्ताधाऱ्यांना पुरावे समोर आणण्याचं आवाहन केलं.

गोकुळच्या सत्तासंघर्षावरून फडणवीसांवर निशाणा

दरम्यान, कोल्हापूरच्या गोकुळ दूध संघातील राजकीय संघर्षावरही रोहित पवारांनी भाष्य केलं. सतेज पाटील यांच्या पॅनेलला बहुमत मिळालं असतानाही शासननियुक्त संचालकांच्या माध्यमातून सत्तेचं गणित बदलण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप त्यांनी केला.

या संपूर्ण प्रकरणामागे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भूमिका महत्त्वाची असल्याचा दावा करत त्यांनी टीका केली. मुख्यमंत्र्यांच्या पाठिंब्याशिवाय चार संचालकांना मतदानाचा अधिकार देण्याचा निर्णय शक्य नसल्याचंही ते म्हणाले.

गोकुळचा लढा म्हणजे संविधान वाचवण्याची लढाई?

गोकुळमधील संघर्ष केवळ दूध संघाच्या अध्यक्षपदापुरता मर्यादित नसून महाराष्ट्रातील संविधान वाचवण्याची लढाई असल्याचं रोहित पवार यांनी म्हटलं.

एकीकडे अजितदादांच्या अपघाताच्या तपासावरून प्रश्न उपस्थित होत आहेत, तर दुसरीकडे गोकुळच्या राजकारणावरून सत्ताधाऱ्यांवर टीका सुरू आहे. आता 15 नोव्हेंबरच्या प्रेझेंटेशनमध्ये रोहित पवार कोणते मुद्दे मांडतात, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

‘तटकरेंना अजितदादांची जागा घ्यायची होती’; रोहित पवारांचा सुनील तटकरेंवर गंभीर आरोप

💡

Frequently Asked Questions

  • Que: अजित पवारांच्या अपघाताबाबत रोहित पवारांनी काय आरोप केला?

    Ans: अजित पवारांच्या अपघाताचा तपास संथ गतीने सुरू असून तो योग्य दिशेने होत नसल्याचा संशय रोहित पवार यांनी व्यक्त केला. या प्रकरणात एफआयआर दाखल होत नसल्याबद्दलही त्यांनी नाराजी व्यक्त केली.

  • Que: रोहित पवार अजित पवारांच्या अपघाताबाबत प्रेझेंटेशन कधी करणार आहेत?

    Ans: रोहित पवार यांनी 15 नोव्हेंबरला या प्रकरणासंदर्भात महत्त्वाचं प्रेझेंटेशन करणार असल्याचं सांगितलं आहे.

  • Que: गोकुळच्या सत्तासंघर्षावर रोहित पवारांनी कोणावर टीका केली?

    Ans: गोकुळ दूध संघातील शासननियुक्त संचालकांच्या मतदानाच्या अधिकारावरून रोहित पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली. या निर्णयामागे मुख्यमंत्र्यांची भूमिका महत्त्वाची असल्याचा आरोप त्यांनी केला.

Web Title: Rohit pawar ajit pawar accident investigation presentation november 15 vg

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 09, 2026 | 10:00 PM

Topics:  

  • ajit pawar
  • rohit pawar
  • sunil tatkare

संबंधित बातम्या

Rohit Pawar : ‘तटकरेंना अजितदादांची जागा घ्यायची होती’; रोहित पवारांचा सुनील तटकरेंवर गंभीर आरोप
1

Rohit Pawar : ‘तटकरेंना अजितदादांची जागा घ्यायची होती’; रोहित पवारांचा सुनील तटकरेंवर गंभीर आरोप

Pandharpur: आषाढीप्रमाणे कार्तिकी यात्राही गाजणार! पालकमंत्री जयकुमार गोरे अ‍ॅक्शन मोडमध्ये; खड्डे, प्रदक्षिणा मार्ग अन् स्वच्छतेस
2

Pandharpur: आषाढीप्रमाणे कार्तिकी यात्राही गाजणार! पालकमंत्री जयकुमार गोरे अ‍ॅक्शन मोडमध्ये; खड्डे, प्रदक्षिणा मार्ग अन् स्वच्छतेस

Rohit Pawar vs Jaykumar Gore : ‘माझा इतिहास तुमच्या फॅमिलीला माहिती आहे’, रोहित पवारांच्या ‘त्या’ वक्तव्याने जयकुमार गोरे संतापले
3

Rohit Pawar vs Jaykumar Gore : ‘माझा इतिहास तुमच्या फॅमिलीला माहिती आहे’, रोहित पवारांच्या ‘त्या’ वक्तव्याने जयकुमार गोरे संतापले

Baramati News: अजितदादांच्या स्मृतिस्थळी पेटणार कृतज्ञतेचे हजारो दिवे! पाडव्यानिमित्त बारामतीकरांचा अनोखा उपक्रम
4

Baramati News: अजितदादांच्या स्मृतिस्थळी पेटणार कृतज्ञतेचे हजारो दिवे! पाडव्यानिमित्त बारामतीकरांचा अनोखा उपक्रम

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.