Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maharashtra Rain Alert: ‘आला गं बाई आला’! पुण्यासह घाटमाथ्यावर पावसाचा जोर वाढणार, २४ तासांत…

गेल्या २४ तासांतील पावसाच्या नोंदीनुसार, लोणावळा येथे १६० मिमी, डोंगरवाडी येथे १५८ मिमी, तर ताम्हिणी, पोफळी आणि वळवण येथे प्रत्येकी १२५ मिमी पाऊस झाला. खोपोली येथे ७५ मिमी, धारावी येथे ८१ मिमी पावसाची नोंद झाली.

  • By तेजस भागवत
Updated On: Jun 29, 2026 | 07:37 PM
Maharashtra Rain Alert: ‘आला गं बाई आला’! पुण्यासह घाटमाथ्यावर पावसाचा जोर वाढणार, २४ तासांत…
Follow Us
Follow Us:
  • राज्याच्या घाटमाथ्यावर नैऋत्य मॉन्सूनची दमदार हजेरी
  • पुणे शहर आणि मैदानी भागात पावसाचा जोर कमी 
  • कडकडाटासह हलका पाऊस पडण्याची शक्यता
पुणे: पुणे जिल्ह्यासह राज्याच्या घाटमाथ्यावर नैऋत्य मॉन्सूनने दमदार हजेरी लावली असून, गेल्या २४ तासांत रायगड जिल्ह्यातील भिरा येथे तब्बल ४०७ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. घाटमाथ्यावर मुसळधार पाऊस सुरू असताना पुणे शहर आणि मैदानी भागात मात्र पावसाचा जोर तुलनेने कमी राहिला.

भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या माहितीनुसार, महाराष्ट्र किनारपट्टीलगत पूर्व-मध्य अरबी समुद्रात तसेच तेलंगणाच्या उत्तरेकडे चक्राकार वाऱ्यांची स्थिती कायम आहे. या पोषक हवामानामुळे राज्यातील घाट परिसरात पावसाचा जोर वाढला असून, पुढील दोन दिवस नैऋत्य मॉन्सूनच्या पुढील प्रगतीसाठी अनुकूल वातावरण राहण्याचा अंदाज आहे. याशिवाय २ जुलैपासून वायव्य भारतावर नव्या पश्चिमी विक्षोभाचा प्रभाव पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

गेल्या २४ तासांतील पावसाच्या नोंदीनुसार, लोणावळा येथे १६० मिमी, डोंगरवाडी येथे १५८ मिमी, तर ताम्हिणी, पोफळी आणि वळवण येथे प्रत्येकी १२५ मिमी पाऊस झाला. खोपोली येथे ७५ मिमी, धारावी येथे ८१ मिमी पावसाची नोंद झाली. दरम्यान, पुणे शहरात सोमवारी दिवसभर ढगाळ वातावरण राहिले. सायंकाळी काही भागांत हलक्या सरी कोसळल्या. शहराचे कमाल तापमान ३२ अंश सेल्सिअस, तर किमान तापमान २३.६ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले. मंगळवारी आकाश ढगाळ राहून दुपारनंतर मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासह हलका पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.

Maharashtra Weather: वेळीच सावध व्हा! महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता, २५ जिल्ह्यांना यलो अलर्ट, कुठे किती बरसणार?

भिरातील पाऊस ढगफुटी नव्हे!

भिरा येथे २४ तासांत ४०७ मिमी पावसाची नोंद झाल्यानंतर हा प्रकार ढगफुटीचा असल्याची चर्चा सुरू झाली होती. मात्र, हा पाऊस ढगफुटी नसून सक्रिय मॉन्सून आणि घाट परिसराच्या भौगोलिक रचनेचा परिणाम असल्याचे भारतीय हवामानशास्त्र विभागाचे पुण्याचे माजी प्रमुख कृष्णानंद होसाळीकर यांनी स्पष्ट केले. एका तासात १०० मिमी किंवा त्यापेक्षा अधिक पाऊस पडल्यास त्याला तांत्रिकदृष्ट्या ढगफुटी म्हणतात. भिरातील पाऊस मात्र २४ तासांत टप्प्याटप्प्याने झाल्याने तो ढगफुटीच्या निकषात बसत नसल्याचे त्यांनी सांगितले.

‘अरबी समुद्रातून येणारे दमट मॉन्सूनी वारे सह्याद्रीच्या डोंगररांगांना धडकत असल्याने हवेची ऊर्ध्वगामी हालचाल होते आणि घाटमाथ्यावर मुसळधार पाऊस पडतो. त्यामुळे कोयना, ताम्हिणी किंवा रायगडच्या घाट परिसरात सक्रिय मॉन्सूनच्या काळात २४ तासांत २५० ते ३०० मिमी पाऊस पडणे ही सामान्य बाब आहे.’
— कृष्णानंद होसाळीकर, माजी प्रमुख, भारतीय हवामानशास्त्र विभाग, पुणे

बिहारमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाचा हाहा: कार; 12 जणांचा मृत्यू, 24 जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी

गेल्या २४ तासांतील प्रमुख पावसाची नोंद (मिमीमध्ये)
भिरा – ४०७
लोणावळा – १६०
डोंगरवाडी – १५८
ताम्हिणी – १२५
पोफळी – १२५
वळवण – १२५
धारावी – ८१
खोपोली – ७५

Web Title: Imd gave heavy rainfall alert to pune and ghatmatha bhira latest weather updates

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 29, 2026 | 07:33 PM

Topics:  

  • Heavy Rain
  • IMD alert of maharashtra
  • Pune Rain News
  • Weather Update

संबंधित बातम्या

राज्यात पावसाचा मुक्काम आणखी वाढणार; पुढील काही दिवस वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता
1

राज्यात पावसाचा मुक्काम आणखी वाढणार; पुढील काही दिवस वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता

अकोल्यात सप्टेंबरमध्येच ‘ऑक्टोबर हीट’ची झळ; तापमान 33 अंशांच्या आसपास, पातूरमध्ये तर…
2

अकोल्यात सप्टेंबरमध्येच ‘ऑक्टोबर हीट’ची झळ; तापमान 33 अंशांच्या आसपास, पातूरमध्ये तर…

Weather Update : देशातील 9 राज्यांमध्ये मेघगर्जनेसह मुसळधार पावसाचा अंदाज; तापमानातही झाली घट
3

Weather Update : देशातील 9 राज्यांमध्ये मेघगर्जनेसह मुसळधार पावसाचा अंदाज; तापमानातही झाली घट

Pune Rain Alert: काळ्या ढगांची दाटी अन् पुण्यात अक्षरश: ‘कोसळ’धार; उद्याचा अलर्ट काय?
4

Pune Rain Alert: काळ्या ढगांची दाटी अन् पुण्यात अक्षरश: ‘कोसळ’धार; उद्याचा अलर्ट काय?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.