Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 12 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पुणेकरांना मिळकत करात सवलत देण्यासंदर्भात महत्त्वाची बातमी; पुढील आठवड्यात…

पुणे महानगरपालिकेमार्फत (Pune Corporation) स्वतःच्या मालकीच्या घरात राहत असल्यास घरपट्टीमध्ये ४० टक्के सवलत मिळत होती. ही सवलत पुन्हा सुरू करण्याबाबत पुणेकर नागरिकांची असलेली मागणी लक्षात घेता पुढील आठवड्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या उपस्थितीत बैठक होणार आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Mar 08, 2023 | 10:01 PM
Pune Municipal Corporation

Pune Municipal Corporation

Follow Us
Follow Us:

मुंबई : पुणे महानगरपालिकेमार्फत (Pune Corporation) स्वतःच्या मालकीच्या घरात राहत असल्यास घरपट्टीमध्ये ४० टक्के सवलत मिळत होती. ही सवलत पुन्हा सुरू करण्याबाबत पुणेकर नागरिकांची असलेली मागणी लक्षात घेता पुढील आठवड्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या उपस्थितीत बैठक होणार असून, याबाबत राज्य शासन सकारात्मक आहे, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Dy CM Devendra Fadnavis) यांनी सांगितले.

विधानमंडळात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासमवेत शिष्टमंडळाने निवेदन दिले. यावेळी आमदार माधुरी मिसाळ, आमदार भीमराव तापकीर, आमदार सिद्धार्थ शिरोळे, पुणे महानगरपालिकेचे माजी महापौर मुरलीधर मोहोळ उपस्थित होते.

राज्य शासनाने सन २०१९ मध्ये महानगरपालिकेचा ठराव विखंडन करुन घरपट्टीमध्ये देत असलेली ४० टक्के सवलत रद्द करण्याबाबत निर्देश दिलेले आहेत. सदर निर्देश रद्द करून पुणे महापालिका हद्दीत मिळकत करात पुणेकरांना यापूर्वी देण्यात येणारी ४० टक्के सवलत पुन्हा सुरू करण्यात यावी, अशी पुणेकर नागरिकांची मागणी आहे. याबाबत उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी सकारात्मकता दर्शवली असून पुढील आठवड्यात बैठक घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.

पुणेकर नागरिकांचा हा प्रश्न सोडविण्याबाबत राज्य शासन सकारात्मक असून हा निर्णय अंतिम झाल्यानंतर पुणेकरांना मोठा दिलासा मिळेल, असे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी यावेळी सांगितले.

Web Title: Important news regarding income tax relief for pune residents nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 08, 2023 | 10:01 PM

Topics:  

  • Cm Eknath Shinde
  • Dy CM Devendra Fadnavis
  • maharashtra
  • Pune
  • Pune Corporation

संबंधित बातम्या

Pune Crime News: पत्नीशी वादानंतर पतीने घर पेटवलं; पत्नी वाचली मात्र तीन पाळीव मांजरांचा होरपळून मृत्यू
1

Pune Crime News: पत्नीशी वादानंतर पतीने घर पेटवलं; पत्नी वाचली मात्र तीन पाळीव मांजरांचा होरपळून मृत्यू

देवेंद्र फडणवीसांनी दिल्लीत जावं, राज्याची धुरा एकनाथ शिंदेंकडे सोपवा; बच्चू कडूंचं वक्तव्य
2

देवेंद्र फडणवीसांनी दिल्लीत जावं, राज्याची धुरा एकनाथ शिंदेंकडे सोपवा; बच्चू कडूंचं वक्तव्य

मुंबईत साकारणार जगातील सर्वात मोठा ‘Water Metro’ प्रोजेक्ट! 6066 कोटी खर्चून बदलणार मुंबईचं रूप, कसा असेल रुट?
3

मुंबईत साकारणार जगातील सर्वात मोठा ‘Water Metro’ प्रोजेक्ट! 6066 कोटी खर्चून बदलणार मुंबईचं रूप, कसा असेल रुट?

मुसळधार पावसाने शाळेला धोका! दरड कोसळल्यानंतर संरक्षणासाठी 15 लाखांचा निधी मंजूर
4

मुसळधार पावसाने शाळेला धोका! दरड कोसळल्यानंतर संरक्षणासाठी 15 लाखांचा निधी मंजूर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.