गौतम अदानी यांच्या फोटोंना मारले जोडे ; महावितरण प्रशासनाविरोधात महाविकास आघाडी आक्रमक
महावितरण प्रशासनाविरोधात आज बदलापुरात महाविकास आघाडीने आंदोलन केलं. शहरात महावितरणकडून कोणतीही परवानगी न घेता डिजिटल मीटर लावले जात आहेत, या डिजिटल मीटरमुळे अव्वाचे सव्वा बिल नागरिकांना येत आहेत .या डिजिटल मीटरची सक्ती महावितरणने शहरात करू नये .यासाठी बदलापूर पूर्वेच्या महावितरण कार्यालयावर महाविकास आघाडीने धडक मोर्चा काढला .यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्योगपती गौतम अदानी यांच्या फोटोचे तोरण बनवून ते महावितरणच्या कार्यालयाला लावले. शिवाय गौतम आदानी यांच्या फोटोला महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी जोडे मारत आपला रोष देखील व्यक्त केला.
यावेळी महावितरणचे कार्यकारी अभियंता उपस्थित नसल्याने महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांचा राग अनावर झाला, त्यांनी गौतम अदानीचा फोटो अभियंत्यांच्या खुर्चीला चिटकवला आणि ती खुर्ची कार्यालयाबाहेर आणली. यावेळी महा विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी राज्य सरकारच्या विरोधात तीव्र घोषणाबाजी केली. बदलापूर शहरात महावितरणकडून डिजिटल मीटरसाठी सक्ती करण्यात आली तर डिजिटल मीटर लावायला येणाऱ्यांना चोप दिला जाईल आणि ते मीटर फोडले जातील असा इशारा महाविकास आघाडीने दिलाय. तर ग्राहकांची परवानगी घेतल्याशिवाय डिजिटल मीटर लावले जाणार नाहीत अशी प्रतिक्रिया महावितरणच्या कार्यकारी अभियंत्याने दिली.
महावितरण प्रशासनाचा या आधी देखील असाच भोंगळ कारभार पाहायला मिळाला आहे. काही दिवसांपूर्वी कर्जत तालुक्यातील आदिवासी पाड्यात तब्बल 10 दिवस वीज पुरवठा खंडित करण्यात आला होता. तुंगी गावात राहणारे ग्रामस्थ 10 दिवस अंधारात होते.वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसामध्ये तुंगी गावाला विक पुरवठा करणाऱ्या विजेच्या खांबांवर झाडे कोसळल्याने येथील वीज पुरवठा खंडित झाला होता.दरम्यान,महावितरण कडून दोन दिवसात तुंगी गावाचा वीज पुरवठा सुरळीत होईल असे स्पष्ट करण्यात आले होते.
अखेर गावकऱ्यांच्या आक्रमक भूमिकेमुळे महावितरण कडून 11 दिवसांनी तुंगी गावाचा वीज पुरवठा सुरळीत झाला.आठवडाभरापेक्षा जास्त काळ या गावातील नागरिकांनी वीजेअभावी अनेक समस्य़ांना तोंड दिलं. मात्र आता 11 व्य़ा दिवशी या नागरिकांना दिलासा मिळाला आहे. महावितरण कडून 11 दिवसांनी तुंगी गावाचा वीज पुरवठा सुरळीत झाला आहे. वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसामध्ये तुंगी गावाला विज पुरवठा करणाऱ्या विजेच्या खांबांवर झाडे कोसळल्याने येथील वीज पुरवठा खंडित आहे.दरम्यान,महावितरणकडून आता वीज पुरवठा केला. आधी कर्ज आणि बदलापूर, महावितरण प्रशासनाला सामान्य नागरिकांची काळजी नाही का असा सवाल देखील संतप्त नागरिक करत आहेत. शिवाय महावितरणाची अशी मनमानी सर्वसामान्य सहन करणार अशा प्रखर शब्दात खडसावत महाविकास आघाडीने आंदोलन केलं आहे.