Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘या’ जिल्ह्यात भाजपला विधानसभेची एकही जागा नाही ! कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड नाराजी

भाजप महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणूकीमध्ये 146 जागा लढत आहे. मात्र या पक्षाला महाराष्ट्राच्या एका जिल्ह्यात विधानसभेची एकही जागा मिळाली नाही आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड नाराजी पसरली आहे.

  • By नारायण परब
Updated On: Oct 31, 2024 | 09:07 PM
Photo Credit- Social Media

Photo Credit- Social Media

Follow Us
Close
Follow Us:

जमीर खलफे/ रत्नागिरी: भारतीय जनता पार्टी महायुतीमध्ये मोठा भाऊ असल्याचे जागावाटपामध्ये सिद्ध झाले आहे. भाजप या विधानसभेत 146 जागा लढत आहे.त्यामुळे हा पक्ष केवळ महायुतीमध्येच नव्हे तर महाविकास आघाडीच्या तीनही पक्षांच्या जागांच्या तुलनेतही सर्वात जास्त जागा लढत आहे. मात्र या पक्षाला महाराष्ट्राच्या एका जिल्ह्यात विधानसभेची एकही जागा मिळाली नाही आहे. तो जिल्हा आहे रत्नागिरी.  रत्नागिरी जिल्ह्यामध्ये पक्ष एकही जागा पक्षाला मिळाली नसल्याने कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड नाराजी आहे. आणि यासंबंधी नाराजी  काही कार्यकर्त्यांकडून  व्यक्त केली जात आहे.

गुहागरची जागा भाजपला मिळेल अशी अपेक्षा करण्यात येत होती मात्र महायुतीच्या जागावाटपात गुहागरमधून शिंदे शिवसेनेचे राजेश बेंडल यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. या जागेवर माजी आमदार डॉ. नातू निवडणूक लढविण्यास इच्छुक होते आणि ही जागा भाजपलाच मिळणार, अशी दाट शक्यता होती; मात्र वाटाघाटींमध्ये ही जागा शिवसेनेच्या वाट्याला आल्यामुळे राजेश बेंडल यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला.

हे देखील वाचा-“महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये जनतेची काम करण्याची धमक आहे”; आमदार प्रशांत ठाकूर

नाराज असलेल्या डॉ. नातू यांच्याशी माध्यमांनी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी अनेक गोष्टींची स्पष्टोक्ती केली.”शिवसेनेकडे मातब्बर उमेदवार असताना दुसऱ्या पक्षातून उमेदवार घेऊन तो आपला आहे हे समजायचे आणि त्यांचा प्रचार करायचा. भाजपला मात्र उमेदवारी द्यायची नाही. अशाने जिल्ह्यातून कमळ निशाणी हद्दपार झाली असली, तरी ती भारतीय जनता पार्टीतील कार्यकर्त्यांच्या मनामध्ये आहे” असे त्यांनी सांगितले.

रत्नागिरी जिल्हा विधानसभा मतदारसंघ

रत्नागिरी जिल्ह्यात  एकूण 5 मतदारसंघ आहेत. ज्यामध्ये गुहागर, रत्नागिरी, दापोली, राजापूर आणि चिपळूण यांचा समावेश होतो. महायुतीमधील जागावाटपात गुहागर, रत्नागिरी , दापोली, राजापूर या जागा शिवसेना शिंदे गटाला गेल्या आहेत. तर चिपळूण मतदारसंघ राष्ट्रवादी अजित पवार गटाला गेला आहे. म्हणजे 5 पैकी 4 जागा शिंदे गटाला तर 1 जागा अजित पवार गटाकडे गेली आहे.

हे देखील वाचा-Vasai: “जिल्हाप्रमुख हटाव शिवसेना बचाव”; शिवसेना ठाकरे गटातील पदाधिकाऱ्यांचा संताप

गुहागर मतदारसंघातून शिवसेना शिंदे गटाकडून राजेश बेंडल हे  ठाकरे गटाचे विद्यमान आमदार भास्कर जाधव यांच्याविरुद्ध निवडणूक लढवत आहेत. रत्नागिरी मतदारसंघातून शिंदे गटाकडून मंत्री उदय सामंत निवडणूक लढवत आहेत. दापोलीमधून शिंदे गटाचे विद्यमान आमदार योगेश कदम हे निवडणूकीच्या रिंगणात आहेत. तर राजापूर मतदारसंघाकडून महायुती साठी शिंदे गटाकडून किरण सामंत निवडणूक लढत आहेत. आणि चिपळूण मतदारसंघात अजित पवार गटाचे विद्यमान आमदार शेखर निकम हे निवडणूक लढवत आहेत. मुख्यत: शिवसेनेचा प्रभाव असणाऱ्या रत्नागिरी जिल्ह्यात शिवसेना फुटीनंतर होणाऱ्या विधानसभेच्या लढती या अत्यंत चुरशीच्या होणार आहेत. त्यामुळे कोणती शिवसेना जिल्ह्यात बाजी मारते हे पाहणे औत्सुकाचे असणार आहे.

Web Title: In ratnagiri district bjp does not have a single seat in the legislative assembly there is a lot of resentment among the workers

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 31, 2024 | 09:06 PM

Topics:  

  • BJP
  • Kokan News
  • Maharashtra Assembly election 2024

संबंधित बातम्या

संजय पाटील यांच्या संवाद मेळाव्याकडे लक्ष, कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला; सोशल मीडियावर प्रचार माेहिम सुरू
1

संजय पाटील यांच्या संवाद मेळाव्याकडे लक्ष, कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला; सोशल मीडियावर प्रचार माेहिम सुरू

Bihar Election : २०२० च्या बिहार निवडणुकीत कमी-अधिक फरकाने जिंकणारे मंत्री कोण होते? हे मंत्री फक्त ४८४ मतांनी जिंकले
2

Bihar Election : २०२० च्या बिहार निवडणुकीत कमी-अधिक फरकाने जिंकणारे मंत्री कोण होते? हे मंत्री फक्त ४८४ मतांनी जिंकले

Bihar Election 2025: “बिहार निवडणुका दोन टप्प्यात घ्याव्यात,” भाजपने निवडणूक आयोगाच्या बैठकीत काय मागणी केली?
3

Bihar Election 2025: “बिहार निवडणुका दोन टप्प्यात घ्याव्यात,” भाजपने निवडणूक आयोगाच्या बैठकीत काय मागणी केली?

“भाजपा मित्र उद्योजकाला कंत्राट देण्यासाठी कुकर्म…”, मिठी नदी स्वच्छता, निविदा प्रक्रियेत घोळ
4

“भाजपा मित्र उद्योजकाला कंत्राट देण्यासाठी कुकर्म…”, मिठी नदी स्वच्छता, निविदा प्रक्रियेत घोळ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.