Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Political News |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

केडीएमसी अधिकारी अटक प्रकरणात, कल्याणच्या टीएलआर कार्यालयात पोलिसांचे सर्च ऑपरेशन सुरु

कल्याण बाजारपेठ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक अशोक कडलक यांचे पथक कल्याण टीएलआर कार्यालयात दाखल झाले. पोलिसांना पाहताच कर्मचारी आणि अधिकारी वर्गाचे धाब दाणाणले.

  • By शुभांगी मेरे
Updated On: Feb 27, 2024 | 01:43 PM
केडीएमसी अधिकारी अटक प्रकरणात, कल्याणच्या टीएलआर कार्यालयात पोलिसांचे सर्च ऑपरेशन सुरु
Follow Us
Close
Follow Us:

कल्याण – अमजद खान : बोगस कागदपत्रे तयार करुन बांधकाम परवानगी दिल्या प्रकरणी दोन अधिकाऱ्यांना अटक झालेली आहे. आता या प्रकरणी बाजारपेठ पोलिसांनी कल्याण भूमी अभिलेखा विभागात सर्च ऑपरेशन सुरु करण्यात आले आहे. सर्व कर्मचारी अधिकाऱ्यांची चाैकशी सुरु आहे. नकाशा आणि त्यासाठी लागणारे स्टॅम्प आणि इतर साहित्य वापर या कार्यालयातून झाला आहे का? याचा तपास पोलीस करीत आहेत.

कल्याण बाजारपेठ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक अशोक कडलक यांचे पथक कल्याण टीएलआर कार्यालयात दाखल झाले. पोलिसांना पाहताच कर्मचारी आणि अधिकारी वर्गाचे धाब दाणाणले. वरिष्ठ पोलीस निरिक्षक अशोक कडकल यांनी मुख्य अभिलेखा अधिकारी नितीन साळूंखे यांना कार्यालयात सर्च करण्याकरीता वॉरंट त्यांच्या हाती दिले. साळूंखे यांना आधी काही समजले नाही. नंतर त्यांना सांगितले गेले की, कागद वाचून पहा. पोलिसांनी सांगितले की, कार्यालयातील काही साहित्याची चौकशीची करणार आहोत. यानंतर कार्यालयातील पहिला आणि दुसरा मजल्यावरील दस्ताऐवजाची पडताळणी सुरु केली.

चार दिवसांपूर्वी केडीएमसीचे दोन अधिकारी राजेश बागुल आणि बाळू बहिराम यांना अटक करण्यात आली होती. केडीएमसी नगररचना विभागातील या दोन अधिकाऱ्यांनी २००९ आणि २०२१ साली दोन इमारतीच्या बांधकाम परवानगी प्रकरणी बोगस कागदपत्रे तयार केली होती. कल्याण टीएलआर कार्यालयातील दस्ताऐवज आणि शिक्क्यांचा वापर करण्यात आला होता. या प्रकरणात टीएलआर कार्यालयातील कोण सामिल आहे. स्टॅम्प आणि कागदपत्रे या अधिकाऱ्यांना कशी मिळाली, केडीएमसीचे आणखीन किती अधिकारी सामिल आहेत. याचा तपास पोलीस करीत आहेत.

Web Title: In the kdmc officer arrest case police start search operation at tlr office in kalyan thane kalyan dombivli muncipal corporation maharashtra government

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 27, 2024 | 01:43 PM

Topics:  

  • kalyan
  • kalyan dombivli muncipal corporation
  • Maharashtra Government
  • thane

संबंधित बातम्या

KDMC News : केडीएमसी निवडणूकीसाठी प्रभागांचे आरक्षण जाहिर! पण अंतर्गत सीमा रेषा स्पष्ट नसल्याने इच्छुकांमध्ये गोंधळ
1

KDMC News : केडीएमसी निवडणूकीसाठी प्रभागांचे आरक्षण जाहिर! पण अंतर्गत सीमा रेषा स्पष्ट नसल्याने इच्छुकांमध्ये गोंधळ

Kalyan Crime: मराठी न येण्याच्या कारणावरून नशेखोर तरुणांचा हल्ला; खाणावळीत तोडफोड आणि कर्मचाऱ्यांना मारहाण
2

Kalyan Crime: मराठी न येण्याच्या कारणावरून नशेखोर तरुणांचा हल्ला; खाणावळीत तोडफोड आणि कर्मचाऱ्यांना मारहाण

Elon Musk ला महाराष्ट्राची भुरळ! Starlink सोबत राज्य सरकारची पार्टनरशिप, अति दुर्गम भागातही इंटेटरनेट सेवा पोहोचणार
3

Elon Musk ला महाराष्ट्राची भुरळ! Starlink सोबत राज्य सरकारची पार्टनरशिप, अति दुर्गम भागातही इंटेटरनेट सेवा पोहोचणार

Kalyan Crime: चारित्र्याच्या संशयातून पतीने पत्नीचा गळा चिरून केली हत्या, नंतर स्वतःवरही वार करून केला आत्महत्येचा प्रयत्न
4

Kalyan Crime: चारित्र्याच्या संशयातून पतीने पत्नीचा गळा चिरून केली हत्या, नंतर स्वतःवरही वार करून केला आत्महत्येचा प्रयत्न

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.