आधीच महागाईची झळ सोसत असलेल्या मध्यमवर्गीय मुंबईकरांच्या खिशाला आता पुन्हा फटका फडणार आहे. कारण स्कूल बस असोसिएशनने स्कूल बस शुल्कासंदर्भात मोठा निर्णय घेतला आहे. शालेय बसच्या शुल्कात १५ ते २० टक्क्यांनी वाढ करण्यात येणार असून १ एप्रिलपासून या निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे.
[read_also content=”धनबाद विमानतळावरून टेकऑफ होताच कोसळलं ग्लायडर; २ जण जखमी https://www.navarashtra.com/india/glider-crashes-on-take-off-from-dhanbad-airport-2-people-injured-nrps-378161.html”]
गेल्या वर्षी असोसिएशनने शालेय बसच्या शुल्कात ३० टक्के वाढ केली होती. करोना कालावधीत भाडेवाढ करण्यात आली नाही, असे कारण देऊन थेट ३० टक्के शुल्क वाढवण्यात आले होते. यंदा पुन्हा २० टक्क्यांपर्यंत शुल्कवाढ करण्याचा निर्णय असोसिएशनने घेतला आहे.
गेल्याच वर्षी ३० टक्के शुल्कवाढ केल्यानंतर यंदा पुन्हा मुंबईतील शालेय बसचे शुल्क वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र यामागे, दरवाढ, बसचे महागलेलं साहित्य हे कारण असल्याचं सांगण्यात येत आहे. दरवाढमुळे बसचा खर्चही महागल्याचं ‘स्कूल बस असोसिएशन’ने’ म्हटलं आहे.
पंधरा वर्षांपेक्षा जुनी वाहने भंगारात काढण्याचे केंद्र शासनाचे धोरण आहे. अशा परिस्थितीत आता नवीन बसचे दरही वाढले आहेत, असे संघटनेचे म्हणणे आहे. आता नवीन बसची किंमत २८ लाख रुपये, तर मिनी बसची किंमत २१ लाख रुपये झाली आहे. तसेच सुट्टे भाग, बॅटरीचे दर १२ ते १८ टक्यांपर्यत वाढले आहेत. बस चालक व इतर कर्मचाऱ्यांच्या वेतनात वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे येत्या १ एप्रिलपासून शालेय बसची १५ ते २० टक्के भाडेवाढ करण्याचा निर्णय घेण्यात आलाय.