
Mumbai policeman accompanied a lone woman on a late night train video goes viral
Mumbai Viral Video : गेल्या काही काळात महिलांवरील अत्याच्याराच्या, लैंगिक शोषणाच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. अनेक ठिकाणी दिवसा-ढवळ्या देखील महिलांसोबत, मुलींसोबत गैरवर्तनाचे प्रकार घडत आहेत. काही दिवसांपूर्वीच कर्नाटकमध्ये बसमध्ये एका तरुणीसोबत छेडछाड करण्याचा प्रयत्न केला होता. तर याच्या दोनदिवसानंतर चेन्नईमधून देखील महिला सफाई कर्मचारीसोबत गैरप्रकार घडल्याची घटना समोर आली होती.
या घटनांमुळे जगभरातील अनेक मुलींना आनंदाने जगता येणे कठीण जाते. अनेकदा मुलींचे शिक्षण, जॉबमध्ये या घटनांमुळे अडथळा येतो. अगदी मग अशा वेळी सामान्यांचे रक्षण करणाऱ्या पोलिस अधिकाऱ्यांवर बोट उचलले जाते. पोलिस कर्मचारी जबाबदारीने काम करत नाहीत असा आरोप केला जातो. पण सध्या सोशल मिडिया एक मनाला भिडणारा प्रसंग समोर येत आहे. हा व्हिडिओ मुंबईचा असून एक पोलिस कर्माचारी महिलेच्या सुरक्षेसाठी आपले कर्तव्य निभावत राहिला आहे.
रात्री उशिराच्या लोकला एक महिला एकटीच प्रवास करत होती. जवळपास संपूर्ण कोच रिकामा होता. अशा परिस्थिती असुरक्षितात वाटणे साहजिक आहे. पण त्या रात्री मुंबई पोलिसचा एका कर्मचाऱ्या महिलेच्या सुरक्षेसाठी कोचमध्ये बसून प्रवास केला. तिला कोणता प्रश्न विचारला नाही, तिची चौकशी केली. केवळ एका बाजूला जाऊन शांतपणे महिलेला त्रास न देता बसवा.मुंबई पोलिसाची ही उपस्थितीच त्या महिलेसाठी सुरक्षेचा एक अनुभव होती. विशेष करुन मुंबईसारख्या शहरामध्ये जिथे महिलेच्या सुरक्षेचा प्रश्न जास्त चर्चेचा ठरतो.
व्हायरल व्हिडिओ
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया
हा व्हिडिओ लोकांच्या मनाला भिडला असून अनेकांनी पोलिस कर्मचाऱ्यांचे कौतुक केले आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. यावर प्रतिक्रिया देताना एकाने म्हटले आहे की, मुंबई पोलिस अधिकाऱ्याचे हे कृत्य खरंच हृदयस्पर्शी आहे, तर दुसऱ्या एकाने कोणताही ढोंग नाही, कोणताही दबाव नाही, फक्त कर्तव्य आणि माणुसकी असे म्हटले आहे. अनेकांनी कर्मचाऱ्याचे हे कृत्य कौतुकास्पद असल्याचे म्हटले आहे.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.