Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

स्वयंपाक करायचा तरी कसा? ‘हा’ पदार्थ महागल्याने गृहिणींचे बजेट कोलमडले; कारण काय?

अवघ्या महिनाभरापूर्वी ११० ते १२० रुपये किलो दराने उपलब्ध असलेला पदार्थ सध्या उच्चांकी पातळीवर पोहोचल्याने ग्राहकांच्या खिशाला मोठा फटका बसत आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Feb 06, 2026 | 04:52 PM
स्वयंपाक करायचा तरी कसा? 'हा' पदार्थ महागल्याने गृहिणींचे बजेट कोलमडले; कारण काय?

स्वयंपाक करायचा तरी कसा? 'हा' पदार्थ महागल्याने गृहिणींचे बजेट कोलमडले; कारण काय?

Follow Us
Follow Us:

शेंगदाण्याच्या दरात लक्षणीय वाढ
शेंगदाणा प्रतिकिलो १५० ते तब्बल १८० रूपये
गृहिणींचे बजेट कोलमडले

मंचर: गेल्या महिनाभरात शेंगदाण्याच्या दरात लक्षणीय वाढ झाली असून किरकोळ बाजारात शेंगदाणा प्रतिकिलो १५० ते तब्बल १८० रुपयांपर्यंत विक्री होत आहे. अवघ्या महिनाभरापूर्वी ११० ते १२० रुपये किलो दराने उपलब्ध असलेला शेंगदाणा सध्या उच्चांकी पातळीवर पोहोचल्याने ग्राहकांच्या खिशाला मोठा फटका बसत आहे. विशेषतः गृहिणींचे मासिक घरगुती बजेट कोलमडल्याच्या प्रतिक्रिया उमटत आहेत. त्यामुळे शेंगदाण्याचे दर कमी कधी होणार असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

 दरवाढीचा थेट परिणाम स्वयंपाकघरावर

शेंगदाणा हा महाराष्ट्रातील स्वयंपाकाचा अविभाज्य घटक मानला जातो. चटण्या, भाजी, आमटी, कूट, फराळाचे पदार्थ तसेच शेंगदाणा तेलासाठी मोठ्या प्रमाणावर याचा वापर होतो. त्यामुळे दरवाढीचा थेट परिणाम घरगुती खर्चावर होत आहे. सध्या बाजारात घुंगरू प्रकारचा शेंगदाणा सुमारे १५० रुपये किलो दराने विकला जात आहे, तर स्पॅनिश प्रकारचा शेंगदाणा १७० ते १८० रुपये किलो दराने उपलब्ध आहे. काही ठिकाणी दर्जानुसार दर आणखी वाढल्याचेही दिसून येते.

भारतीय माशांपासून बनवलेले ‘हे’ पदार्थ पाहिल्यानंतर तोंडाला सुटेल पाणी, प्रत्येक मांसाहारी व्यक्तीने खायलाच हवे

दरवाढीमागील कारणांचा वेध

किरकोळ विक्रेत्यांच्या माहितीनुसार, सध्या बाजारात शेंगदाण्याची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे; मात्र तुलनेने पुरवठा कमी असल्याने दरात उसळी आली आहे. उत्पादन क्षेत्रातून बाजारात येणारी आवक अपेक्षेपेक्षा घटल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. याशिवाय साठेबाजी, वाढता वाहतूक खर्च, डिझेल दरातील चढ-उतार आणि घाऊक बाजारातील अस्थिरता ही देखील दरवाढीची प्रमुख कारणे असल्याचे सांगितले जात आहे. काही व्यापाऱ्यांनी घाऊक बाजारातील अनिश्चिततेमुळे किरकोळ विक्रेत्यांना वाढीव दराने माल खरेदी करावा लागत असल्याचे स्पष्ट केले.

गणपती बाप्पाच्या नैवेद्यासाठी कोकणातील पारंपरिक पद्धतीने बनवा वालाची आमटी, ओल्या वाटणामुळे वाढेल पदार्थाची चव

पुढील स्थिती काय?

मंचर येथील व्यापारी प्रवीण शिंदे पाटील यांनी सांगितले की, पुढील काही दिवसांत बाजारात आवक वाढल्यास दरात काही प्रमाणात स्थिरता येण्याची शक्यता आहे. मात्र सध्यातरी दर उच्चांकी पातळीवरच कायम आहेत.दरवाढीमुळे अनेक कुटुंबांनी शेंगदाण्याचा वापर कमी करण्याचा पर्याय स्वीकारला असून काहींनी पर्यायी पदार्थांकडे वळण्यास सुरुवात केली आहे. एकूणच, शेंगदाण्याच्या वाढत्या दरामुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये चिंता व्यक्त होत असून बाजारातील परिस्थितीवर प्रशासनाने लक्ष ठेवण्याची गरज व्यक्त केली जात आहे.

Web Title: Increase peanut prices has disrupted the monthly household budget of homemakers

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 06, 2026 | 04:45 PM

Topics:  

  • food news update
  • Market
  • Women

संबंधित बातम्या

Speciality Restaurants New CEO : अवीक चॅटर्जी स्पेशलिटी रेस्टॉरंट्सचे नवे सीईओ; मेनलँड चायनासह अनेक ब्रँड्सची सांभाळणार धुरा
1

Speciality Restaurants New CEO : अवीक चॅटर्जी स्पेशलिटी रेस्टॉरंट्सचे नवे सीईओ; मेनलँड चायनासह अनेक ब्रँड्सची सांभाळणार धुरा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.