गणपती बाप्पाच्या नैवेद्यासाठी कोकणातील पारंपरिक पद्धतीने बनवा वालाची आमटी
गणपती बाप्पाच्या स्वागताची मोठ्या जलौषात सगळीकडे तयारी सुरु आहे. कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगड इत्यादी जिल्ह्यांमध्ये मोठ्या संख्येने चाकरमानी गावी जातात. सणावाराच्या दिवसांमध्ये कोकणात प्रामुख्याने बनवला जाणारा पदार्थ म्हणजे वालाची आमटी. गरमागरम भात किंवा भाकरीसोबत वालाची आमटी अतिशय चविष्ट लागते. वालाच्या डाळीमध्ये अनेक गुणकारी घटक आढळून येतात. यामध्ये प्रथिने, फायबर, लोह आणि अँटीऑक्सिडंट्स आवश्यक प्रमाणात आढळून येतात. नैवेद्यातील पदार्थांमध्ये वालाची आमटी, मोदक, वरण इत्यादी अनेक पदार्थ बनवले जातात. आज आम्ही तुम्हाला कोकणी पद्धतीमध्ये वालाची आमटी बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. तुम्ही बनवलेली आमटी घरातील सगळ्यांचं खूप जास्त आवडेल. जाणून घ्या रेसिपी.(फोटो सौजन्य – pinterest)
गणपती बाप्पाच्या नैवेद्यासाठी कोकणातील पारंपरिक पद्धतीमध्ये बनवा वाटपाची डाळ, नोट करा रेसिपी