जगभरातील वेगवेगळ्या देशांमध्ये विविध पद्धतीचे मासे मिळतात. त्यातील भारतीय माशांची चव वेगळी. भारतात पारंपरिक पद्धतीमध्ये बनवल्या जाणाऱ्या माशांची चव चाखण्यासाठी देश विदेशातून पर्यटक भारतात येतात. लहान मुलांपासून ते अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं मासे खायला खूप जास्त आवडतात. वेगवेगळ्या मसाल्यांमध्ये आणि विविध पद्धतींची वापर करून बनवलेले मासे चवीसोबत मनाला सुद्धा शांती देतात. मासे पाहिल्यानंतर सगळ्यांच्या तोंडाला पाणी सुटते. त्यातील भारतीय माशांपासून बनवलेले पदार्थ एकदातरी नक्कीच खायला हवेत. (फोटो सौजन्य – pinterest)
भारतीय माशांपासून बनवलेले 'हे' पदार्थ पाहिल्यानंतर तोंडाला सुटेल पाणी

कोकणात पारंपरिक पद्धतीने बनवलेली माशांची आमटी आणि भात हे कॉम्बिनेशन सगळ्यांचं खूप जास्त आवडते. ओल्या खोबऱ्याचा आणि तिरफळांचा वापर करून बनवलेले मासे पाहताच क्षणी सगळ्यांच्या तोंडाला पाणी सुटते.

केरळमध्ये केळीच्या पानात वाफवून शिजवलेले मासे प्रसिद्ध आहेत. या माशांची चव चाखण्यासाठी लांबून पर्यटक केरळमध्ये जातात. तिथे असलेल्या खाद्य संस्कृतीचा आस्वाद घेतात.

गोवन फिश करी जगभरात प्रसिद्ध आहे. ओल खोबर, कच्चा आंबा, मेथी दाणे आणि इतर वेगवेगळ्या पारंपरिक मसाल्यांचा वापर करून बनवलेली गोवन करी सगळ्यांचं खायला खूप जास्त आवडते.

भरपूर कढीपत्ता आणि लसुणचा वापर करून केलेले मासे फ्राय चवीला अतिशय सुंदर लागतात. हे कुरकुरीत मासे वरणभातासोबत आवडीने खाल्ले जातात.

मसाला लावून कोळश्यावर भाजलेले मासे जेवणात स्टार्ट म्हणून खाल्ले जातात. तंदूर मासे तुम्ही हिरव्या चटणीसोबत सुद्धा खाऊ शकता.






