Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 31 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Indigenous Naval Platforms: शत्रूराष्ट्राला फुटणार घाम! INS दुनागरी, शोधन, अग्रय अन्…; भारतीय नौदलाची ताकद वाढली

नव्याने दाखल झालेल्या या युद्धनौकांमुळे किनारीपट्टीचे संरक्षण, सागरी गस्त आणि विविध लष्करी मोहीमा अधिक प्रभावीपणे पार पाडणे शक्य होणार आहे. भारताची जवळपास 11 हजार किलोमीटरपेक्षा अधिक लांबीची किनारुपट्टी आहे.

  • By Riddhi Vanne
Updated On: Jul 14, 2026 | 05:10 PM
Indigenous Naval Platforms: शत्रूराष्ट्राला फुटणार घाम! INS दुनागरी, शोधन, अग्रय अन्…; भारतीय नौदलाची ताकद वाढली
Follow Us
Follow Us:

भारतीय नौदलाच्या ताफ्यात गेल्या काही आठवड्यांत चार नव्या युद्धनौकांची भर पडली असून, देशाच्या सागरी सुरक्षेसाठी हा मोठा टप्पा मानला जात आहे. समुद्रातील वाढती आव्हाने लक्षात घेता भारत सातत्याने आपली नौदल क्षमता मजबूत करत आहेत. नव्याने दाखल झालेल्या या युद्धनौकांमुळे किनारीपट्टीचे संरक्षण, सागरी गस्त आणि विविध लष्करी मोहीमा अधिक प्रभावीपणे पार पाडणे शक्य होणार आहे. भारताची जवळपास 11 हजार किलोमीटरपेक्षा अधिक लांबीची किनारुपट्टी आहे. याशिवाय देशाचा मोठा व्यापार समुद्रमार्गे होत असल्याने समुद्रातील सुरक्षा कायम ठेवणे अत्यंत गरजेचे ठरते. याच उद्देशाने भारतीय नौदलात आधुनिक तंत्रज्ञानाने सज्ज नव्या युद्धनौकांचा समावेश करण्यात आला आहे. या जहाजांमध्ये आयएनएस दुनागिरी, आयएनएस संधायक, आयएनएस अग्रय आणि आयएनएस महेंद्रगिरी यांचा समावेश आहे.

या सर्व युद्धनौका वेगवेगळ्या प्रकारच्या जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी तयार करण्यात आल्या आहेत. काही जहाजे शत्रूच्या पाणबुड्यांवर लक्ष ठेवण्यास सक्षम आहेत, तर काही समुद्रातील सर्वेक्षण आणि महत्त्वाची माहिती गोळा करण्याचे काम करतात. यामुळे भारतीय नौदलाला समुद्रातील प्रत्येक हालचालीवर अधिक प्रभावीपणे नजर ठेवता येणार आहे.

FDA Action on Blood Banks: राज्यातील ३८ ब्लड बँकांवर एफडीएची मोठी कारवाई! ३४ चे परवाने निलंबित, ४ रक्तपेढ्यांचे परवाने कायमचे रद्द

विशेष म्हणजे या युद्धनौकांची निर्मिती स्वदेशी तंत्रज्ञानाच्या बळावर करण्यात आली आहे. त्यामुळे संरक्षण क्षेत्रात भारताची आत्मनिर्भरतेकडे वाटचाल अधिक वेगाने सुरू असल्याचे दिसून येते. अत्याधुनिक शस्त्रसज्जता, आधुनिक रडार प्रणाली, क्षेपणास्त्रांची क्षमता आणि हेलिकॉप्टर संचालनाची सुविधा या जहाजांमध्ये उपलब्ध आहे. त्यामुळे कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत जलद आणि प्रभावी कारवाई करणे शक्य होईल.

याशिवाय सर्वेक्षण करणारी जहाजे समुद्रतळाचा अभ्यास, सुरक्षित नौकानयनासाठी नकाशे तयार करणे आणि सागरी माहिती संकलित करण्याचे महत्त्वाचे काम करतात. या माहितीचा फायदा केवळ संरक्षण क्षेत्रालाच नाही, तर सागरी व्यापार, मत्स्यव्यवसाय आणि ब्लू इकॉनॉमीसारख्या क्षेत्रांनाही होतो. भविष्यात समुद्राशी संबंधित अनेक विकासकामांसाठी ही माहिती उपयुक्त ठरणार आहे.

आझाद मैदानावर पान व्यावसायिकांचा ऐतिहासिक मोर्चा; IPC 328 आणि MCOCA च्या कथित गैरवापराविरोधात लाखोंचा आवाज

भारतीय नौदलाची वाढती ताकद ही केवळ देशाच्या सुरक्षेसाठीच नाही, तर आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची विश्वासार्हता वाढवणारी बाब मानली जात आहे. हिंद महासागर परिसरात भारताची भूमिका अधिक प्रभावी होत असून, मित्र राष्ट्रांसोबतचे संरक्षण सहकार्यही अधिक मजबूत होत आहे. आधुनिक युद्धनौकांच्या या नव्या ताफ्यामुळे भारत समुद्रातील कोणत्याही आव्हानाला सक्षमपणे सामोरे जाण्यास तयार असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे.

Web Title: Indias naval strength grows with 4 new indigenous warships

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 14, 2026 | 04:58 PM

Topics:  

  • Indian Navy
  • Navy

संबंधित बातम्या

Indian Navy: आयएनएस सुदर्शनीचा लिस्बन दौरा संपला; पोर्तुगालहून पुढील थांब्याकडे कूच, जाणून घ्या ‘Lokayan 26’ मोहिमेचे महत्त्व
1

Indian Navy: आयएनएस सुदर्शनीचा लिस्बन दौरा संपला; पोर्तुगालहून पुढील थांब्याकडे कूच, जाणून घ्या ‘Lokayan 26’ मोहिमेचे महत्त्व

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.