Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 10 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

इन्फ्लुएंझाची लक्षणे दिसल्यास लगेचच उपचार करून घ्यावेत : आरोग्यमंत्री तानाजी सावंत

राज्यात इन्फ्लुएंझा आजाराबाबत सतर्क राहण्याच्या सूचना सर्व जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणांना देण्यात आलेल्या असून, राज्यस्तरावरून नियमितपणे सनियंत्रण करण्यात येत आहे. नागरिकांनी लक्षणे दिसल्यास दवाखान्यात जावून उपचार घ्यावे अंगावर काढू नये, असे आवाहन आरोग्यमंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत (Dr. Tanaji Sawant) यांनी केले.

  • By कृपादान आवळे
Updated On: Mar 15, 2023 | 08:43 PM
इन्फ्लुएंझाची लक्षणे दिसल्यास लगेचच उपचार करून घ्यावेत : आरोग्यमंत्री तानाजी सावंत
Follow Us
Follow Us:

मुंबई : राज्यात इन्फ्लुएंझा आजाराबाबत सतर्क राहण्याच्या सूचना सर्व जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणांना देण्यात आलेल्या असून, राज्यस्तरावरून नियमितपणे सनियंत्रण करण्यात येत आहे. नागरिकांनी लक्षणे दिसल्यास दवाखान्यात जावून उपचार घ्यावे अंगावर काढू नये, असे आवाहन आरोग्यमंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत (Dr. Tanaji Sawant) यांनी केले.

H3N2 फ्ल्यू सदृश्य साथरोगाबाबत आरोग्यमंत्री सावंत यांनी आज विधानसभेत निवेदन केले. मंत्री सावंत म्हणाले, H3N2 फ्ल्यू सदृश्य साथरोगाचे रुग्ण रोज वाढत आहेत. अहमदनगर आणि नागपूरमध्ये एका व्यक्तीचा H3N2 ने मृत्यू झाला आहे. इन्फ्लूएंझा ए आजार विषाणूमुळे होणारा आजार आहे. इन्फ्लूएंझा ए चे वेगवेगळे उपप्रकार आहेत. (उदा. एच१ एन १ एच३एन२ इ.) या आजाराचे सर्वसाधारण लक्षणे ताप, खोकला घशात खवखव धाप लागणे, न्यूमोनिया आढळून येतात. इन्फ्लूएंझा ए बाबत रुग्ण सर्वेक्षण मुख्यतः लक्षणाधारीत आहे. याबाबत सर्व आरोग्य केंद्रात रुग्णाची तपासणी करण्यात येते व मार्गदर्शक सूचनांनुसार उपचार करण्यात येतात. 13 मार्च 2023 अखेर एच१ एन१ बाधित ३०३ रुग्ण आणि एच३एन२ बाधित ५८ रुग्ण आढळून आले आहेत.

राज्यात इन्फ्लूएंझा आजार मुख्यत्वेकरुन पुणे, मुंबई, ठाणे, नागपूर, औरंगाबाद, सांगली, कोल्हापूर जिल्हयातील शहरी भागात दिसून येत आहे. या आजाराचे लक्षणे तसेच उपचार पध्दती याबाबत मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्यात आलेले आहेत. राज्यातील रुग्णालयात संशयीत रुग्णांना आवश्यकतेनुसार विलगीकरण कक्षात उपचार करण्यात येतात. तसेच आरोग्य संस्थेत आजारावरील उपचारासाठी लागणारी औषधे उपलब्ध असल्याचे सावंत यांनी यावेळी सांगितले.

Web Title: Influenza symptoms should be treated immediately says health minister dr tanaji sawant nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 15, 2023 | 08:43 PM

Topics:  

  • Health News
  • maharashtra
  • Mumbai
  • Tanaji Sawant

संबंधित बातम्या

Mumbai Crime: खेकडे पकडताना 14 वर्षीय मुलाला विहिरीत ढकललं; जुन्या वादातून हत्येचा आरोप
1

Mumbai Crime: खेकडे पकडताना 14 वर्षीय मुलाला विहिरीत ढकललं; जुन्या वादातून हत्येचा आरोप

Dharashiv Farmers : धाराशिवच्या ७,६२९ शेतकऱ्यांना मोठा दिलासा; ५३.१६ कोटींच्या कर्जमुक्तीचा मार्ग मोकळा
2

Dharashiv Farmers : धाराशिवच्या ७,६२९ शेतकऱ्यांना मोठा दिलासा; ५३.१६ कोटींच्या कर्जमुक्तीचा मार्ग मोकळा

UP Gangster Act : गँगस्टर विजय मिश्राला मोठा दणका; महाराष्ट्रातील १००.२५ कोटींची मालमत्ता कुर्क, उमरग्यात कारवाई
3

UP Gangster Act : गँगस्टर विजय मिश्राला मोठा दणका; महाराष्ट्रातील १००.२५ कोटींची मालमत्ता कुर्क, उमरग्यात कारवाई

Pratap Sarnaik : RTO तील भ्रष्टाचारावर सरकारचा दणका; तीन अधिकाऱ्यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्याची घोषणा
4

Pratap Sarnaik : RTO तील भ्रष्टाचारावर सरकारचा दणका; तीन अधिकाऱ्यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्याची घोषणा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.