Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Political news |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

इकडचे मतदार तिकडे, तिकडचे इकडे! पुण्यात मतदार याद्यांमध्ये घोळ

महापालिका निवडणुकीसाठी जाहीर केलेल्या मतदार याद्यांमध्ये असलेला घाेळ समाेर येत आहे. याद्या प्रभागनिहाय वेगळ्या करताना वापरलेल्या साॅफ्टवेअरमुळे अनेक प्रभागातील मतदारांची नावे ही दुसऱ्या प्रभागात गेली आहेत.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Nov 25, 2025 | 12:27 PM
इकडचे मतदार तिकडे, तिकडचे इकडे! पुण्यात मतदार याद्यांमध्ये घोळ

इकडचे मतदार तिकडे, तिकडचे इकडे! पुण्यात मतदार याद्यांमध्ये घोळ

Follow Us
Close
Follow Us:
  • पुण्यात मतदार याद्यांमध्ये घोळ
  • इकडचे मतदार तिकडे, तिकडचे इकडे
  • अनेक प्रभागातील मतदारांची नावे अन्य ठिकाणी
पुणे : मतदारांच्या प्रारुप यादीत मुंढवा प्रभागातील मतदारांची नावे ही वारजे प्रभागाच्या मतदार यादीत तर खेड शिवापुरमधील मतदारांची नावे सन सिटी प्रभागाच्या यादीत दिसत आहेत. महापालिका निवडणुकीसाठी जाहीर केलेल्या मतदार याद्यांमध्ये असलेला घाेळ समाेर येत आहे. याद्या प्रभागनिहाय वेगळ्या करताना वापरलेल्या साॅफ्टवेअरमुळे अनेक प्रभागातील मतदारांची नावे ही दुसऱ्या प्रभागात गेली आहेत.

महापािलका निवडणुुकीसाठी प्रशासकीय प्रक्रीयांचे टप्पे पार पडत आहेत. गेल्या पंधरा दिवसांपुर्वी प्रभाग निहाय आरक्षण पार पडले. गेल्या आठवड्यात प्रभाग निहाय मतदार यादी जाहीर केल्या गेल्या आहे. या मतदार याद्यांमध्ये घाेळ असल्याचे आढळून येऊ लागले आहे. गेल्या दाेन दिवसांत निवडणुक कार्यालयाकडे माेठ्या प्रमाणावर तक्रारींचे प्रमाण वाढले आहे. साेमवारी संध्याकाळ पर्यंत निवडणुक कार्यालय आणि क्षेत्रीय कार्यालयांमध्ये ४१९ हरकती, तक्रारी प्राप्त झाल्या आहेत.

महाविकास आघाडीकडून सातत्याने मतदार याद्यांबाबत टिका केली जात आहे. प्रभागाच्या सीमा लगतच्या भागातील मतदारांची नावे ही शेजारच्या प्रभागात जाणीव पुर्वक टाकल्याचा आराेप हाेत आहे. त्याचवेळी याद्या फाेडताना साॅफ्टवेअरचा वापर केल्याने गंभीर बाबी समाेर येऊ लागल्या आहेत. यादी फाेडताना झालेल्या चुकांमुळे प्रभागच नाही तर दुसऱ्याच लाेकसभा मतदारसंघात मतदारांची नावे गेल्याचे आढळून आले आहे. मुंढवा भागातील मतदारांची नावे ही वारजे येथील मतदारयादीत गेली आहेत. बारामती लाेकसभा मतदारसंघात समावेश असलेल्या खेड शिवापुर भागातील मतदारांची नावे ही सन सिटी प्रभागात, तसेच नवी पेठेतील एका साेसायटीतील मतदारांची नावे ही सनसिटी प्रभागात दाखविली गेली आहे.

याबाबत प्रशासनाकडून कबुली दिली गेली असून, याविषयी राज्य निवडणुक आयाेगाला कळविण्यात आल्याचे सांगण्यात आले. मतदार याद्यातील घाेळाविषयी महाविकास आघाडीकडून पुढे काय भुमिका घेतली जाणार हे देखील पाहणे महत्वाचे ठरणार आहे. मतदारांनी त्यांचे नाव शाेधण्यासाठी http://mahasecvoterlist.in/ObjectionOnClick/SearchName या लिंकचा वापर करावा असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

मतदार यादीवर हरकत नाेंदविण्याच्या संख्येत वाढ हाेत आहे. साेमवारी संध्याकाळपर्यंत ४१९ हकरती, तक्रारी नाेंदविल्या गेल्या आहेत. तर मतदार याद्यांची विक्री वाढली असून, एकुण १३ लाख ३० हजार रुपयाहून अधिक महसुल यातून जमा झाला आहे.

आरक्षणासंदर्भात २४ हरकती

प्रभागात टाकण्यात आलेल्या आरक्षणाविषयी हरकती नाेंदविण्यासाठी साेमवारपर्यंत मुदत हाेती. निवडणुक कार्यालयाकडे २४ हरकती प्राप्त झाल्या असुन, यामध्ये प्रभाग क्रमांक १ मध्ये सर्वांत जास्त सहा हरकती आल्या आहेत. या प्रभागातील एका गटात अनुसुचित जातीच्या महीलांसाठी आरक्षण टाकले आहे. ते आरक्षण पुरुषांसाठी बदलावे अशी हरकत नाेंदविली गेली आहे. प्रभाग क्रमांक नऊ मध्ये दाेन हरकती आल्या आहेत, या ठिकाणी अनुसुचित जाती या वर्गाची संख्या दुप्पट झाली असुन, येथे ते आरक्षण देणे आवश्यक असल्याचे हरकतीत नमूद केले आहे.

Web Title: Information has been received about errors in the voter lists in pune

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 25, 2025 | 12:27 PM

Topics:  

  • CM Devedra Fadnavis
  • Pune mahapalika
  • pune news

संबंधित बातम्या

पुरंदर तालुक्यातील रस्त्यांची दुरवस्था; वाहनचालकांना जीव मुठीत घेऊन करावा लागतो प्रवास
1

पुरंदर तालुक्यातील रस्त्यांची दुरवस्था; वाहनचालकांना जीव मुठीत घेऊन करावा लागतो प्रवास

Purandar Airport : पुरंदर विमानतळप्रकरणी मोठी अपडेट; ‘या’ महिन्यापासून शेतकऱ्यांना भूसंपादन मोबदला मिळणार
2

Purandar Airport : पुरंदर विमानतळप्रकरणी मोठी अपडेट; ‘या’ महिन्यापासून शेतकऱ्यांना भूसंपादन मोबदला मिळणार

पाचवी आणि आठवीची शिष्यवृत्ती परीक्षा ढकलली पुढे; आता 22 फेब्रुवारीला घेतली जाणार परीक्षा
3

पाचवी आणि आठवीची शिष्यवृत्ती परीक्षा ढकलली पुढे; आता 22 फेब्रुवारीला घेतली जाणार परीक्षा

Pune Aundh Leopard : औंधमध्ये दिसला बिबट्या; काय आहे वनविभागाचे स्पष्टीकरण
4

Pune Aundh Leopard : औंधमध्ये दिसला बिबट्या; काय आहे वनविभागाचे स्पष्टीकरण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.