Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

पाचवी आणि आठवीची शिष्यवृत्ती परीक्षा ढकलली पुढे; आता 22 फेब्रुवारीला घेतली जाणार परीक्षा

वेळापत्रक सातत्याने बदलण्याची मागणी होत होती. असे असताना आता या पार्श्वभूमीवर परीक्षा परिषदेने शिष्यवृत्ती परीक्षेची तारीख पुढे ढकलत 22 फेब्रुवारी 2025 अशी जाहीर केली आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Nov 25, 2025 | 12:35 PM
पाचवी आणि आठवीची शिष्यवृत्ती परीक्षा ढकलली पुढे; आता 22 फेब्रुवारीला घेतली जाणार परीक्षा

पाचवी आणि आठवीची शिष्यवृत्ती परीक्षा ढकलली पुढे; आता 22 फेब्रुवारीला घेतली जाणार परीक्षा

Follow Us
Close
Follow Us:

पुणे : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने इयत्ता पाचवी व आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेची तारीख बदलण्याचा निर्णय घेतला आहे. यावर्षी शिष्यवृत्ती परीक्षा 8 फेब्रुवारीला आयोजित केली जाणार होती; मात्र, त्याच दिवशी केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाची केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा (सीटीईटी) होणार असल्याने दोन्ही परीक्षांमध्ये संघर्ष निर्माण झाला. त्यामुळे अनेकांकडून वेळापत्रक बदलण्याची मागणी होत होती.

वेळापत्रक सातत्याने बदलण्याची मागणी होत होती. असे असताना आता या पार्श्वभूमीवर परीक्षा परिषदेने शिष्यवृत्ती परीक्षेची तारीख पुढे ढकलत 22 फेब्रुवारी 2025 अशी जाहीर केली आहे. परीक्षा परिषदेच्या आयुक्त अनुराधा ओक यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे ही माहिती दिली. यावर्षी शिष्यवृत्ती परीक्षा पूर्वीप्रमाणे इयत्ता चौथी व सातवीसाठी घेण्याचा निर्णय घेण्यात आला असला, तरी विशेष बाब म्हणून चौथी, पाचवी, सातवी आणि आठवी अशा चारही वर्गांसाठी ही परीक्षा आयोजित केली जाणार आहे.

दरम्यान, राज्यभरातील सर्व परीक्षा केंद्रांवर एका दिवशी ही परीक्षा घेतली जाईल. नवीन वेळापत्रकानुसार परीक्षेची तयारी आणि नियोजन करण्याचे आवाहन परीक्षा परिषदेने शाळांना, विद्यार्थ्यांना आणि पालकांना केले आहे.

विद्यार्थ्यांना मिळतो आर्थिक आधार

राज्यातील हजारो विद्यार्थी आर्थिक दुर्बल घटकांत मोडतात आणि त्यांच्यासाठी ही शिष्यवृत्ती योजना शिक्षणासाठी मोठा आधार ठरते. आर्थिक अडचणीमुळे गळती होत असलेल्या विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेण्यासाठी सकारात्मक चालना देणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांनी या परीक्षेसाठी नोंदणी केली आहे. शाळांच्या माध्यमातून आणि पालकांच्या मार्गदर्शनातून विद्यार्थ्यांनी तयारी सुरू केली असताना तारखेत झालेल्या बदलामुळे त्यांना अधिक अभ्यासासाठी वेळ मिळणार आहे, ही विद्यार्थ्यांसाठी सकारात्मक बाब आहे.

हेदेखील वाचा : 2027 पर्यंत TET उत्तीर्ण करणे बंधनकारक! राज्यभरातील शिक्षकांची धाकधूक वाढली, आज परीक्षेचा दिवस

Web Title: Scholarship exam for 5th and 8th standard on february 22

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 25, 2025 | 12:35 PM

Topics:  

  • pune news
  • Scholarship Exam

संबंधित बातम्या

Pune शहरात कमर्शियल गॅसचा पुरवठा बंद; केवळ रूग्णालये अन्…; कोणाला होणार पुरवठा?
1

Pune शहरात कमर्शियल गॅसचा पुरवठा बंद; केवळ रूग्णालये अन्…; कोणाला होणार पुरवठा?

Pune RTO साठी ई-लिलाव ठरला फायदेशीर; प्राप्त झाला तब्बल 1 कोटींचा महसूल
2

Pune RTO साठी ई-लिलाव ठरला फायदेशीर; प्राप्त झाला तब्बल 1 कोटींचा महसूल

Cooking Gas Supply: घरातील गॅस पुरवठा राहणार सुरळीत; केंद्राच्या आदेशानंतर MNGL ॲक्शन मोडमध्ये
3

Cooking Gas Supply: घरातील गॅस पुरवठा राहणार सुरळीत; केंद्राच्या आदेशानंतर MNGL ॲक्शन मोडमध्ये

चाकणमध्ये भारत गॅस एजन्सीमोर गोंधळ; सिलिंडरचे दर वाढल्यामुळे नागरिक संतापले
4

चाकणमध्ये भारत गॅस एजन्सीमोर गोंधळ; सिलिंडरचे दर वाढल्यामुळे नागरिक संतापले

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.