पुणे : पुण्यातील औंध मधील सिंध सोसायटी परिसरात आढळून आलेला बिबट्या हा पुन्हा जंगल आणि नदी परिसरात निघून गेल्याच वन विभागाने सांगितले आहे. बिबट्या आढळून आल्याने नागरिकांनी खबरदारी घ्यावी. सर्च ऑपरेशन सध्या सुरू नाही मात्र वनविभागाकडून काळजी घेतली जात असल्याची माहिती सहायक वनसंरक्षक मंगेश ताटे यांनी दिली आहे एअरपोर्ट प्रशासनाने तक्रार केल्यानंतर आज वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी विमानतळ परिसरात जाऊन पाहणी केली. मे महिन्यात आढळून आलेला बिबट्या तो पुन्हा एकदा दिसून आला. १९ नोव्हेंबर रोजी बिबट्या रन वे वर दिसून आला अशी माहिती आम्हाला विमानतळ प्रशासनाने दिली होती मात्र त्यात कोणतीही अनुचित घटना घडली नाही मात्र धोका असल्याचं स्पष्टीकरण वन विभागाकडून देण्यात आलं आहे. त्याला पकडण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू असून ज्या ठिकाणी एक पिंजरा उभारण्यात आला होता तो पिंजरा त्याच परिसरात थोड्या दुसऱ्या ठिकाणी लावण्यात आला आहे.