मुंबई: महाराष्ट्र निवडणुकीचा टप्पा तयार झाला आहे. उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख मंगळवारी संपली. दोन्ही प्रमुख आघाड्यांच्या उमेदवारांनी अर्ज दाखल केले. पण, अजूनही किमान 15 जागांवर महायुतीतील भागीदारांनी एकमेकांविरोधात उमेदवार उभे केले आहेत. विशेष म्हणजे, अजित पवार गटाचे नेते नवाब मलिक यांच्या उमेदवारीची सर्वात मोठी चर्चा आहे. भाजपचा तीव्र विरोध असतानाही अजित पवारांनीत्यांना आणि त्यांच्या मुलीला तिकीट दिले आहे. अशा परिस्थितीत महायुतीसोबत असतानाही अजित पवार एकत्र असूनही भाजपशी पंगा का घेत आहेत, असा सवाल उपस्थित केला जात आहे. नवाब मलिक यांचा प्रचार करणार नसल्याचे भाजपने मंगळवारी पुन्हा एकदा स्पष्ट केले. दाऊद इब्राहिमशी संबंध असलेल्या कोणाचाही प्रचार करण्याचा पक्ष विचार करू शकत नाही, असेही भाजपकडून स्पष्टपणे सांगण्यात आले आहे.
पण अजित पवार मात्र भाजपशी पंगा का घेत आहेत? याची अनेक कारणे आहेत. अजित पवार ज्या उद्देशाने महायुतीसोबत आले होते, तो उद्देश कुठेतरी अपूर्णच राहिला, असे राजकीय जाणकार सांगतात. त्यांनी अजित पवारांनी महाविकास आघाडीतूव बाहेर पडत ‘राष्ट्रवादी काँग्रेस’ पक्ष आणि पक्षचिन्हही मिळवलं. महायुतीने त्यांना एकनाथ शिंदे यांच्याइतकीच ताकद घेऊन ते महायुतीत सामील झाले, पण शिंदे गटाच्या बरोबरीने ते कधीच दिसले नाहीत.
हेही वाचा: भाजप सना व नवाब मलिक यांचा प्रचार करणार का? आशिष शेलार यांनी स्पष्टचं सांगितलं
महाआघाडीत शिंदे गट आणि राष्ट्रवादीचे अंदाजे 40-40 आमदार आहेत. पण, युतीतील या दोन्ही पक्षांच्या स्थितीत बरीच तफावतही दिसून येते. लोकसभा निवडणुकीत आणि आता विधानसभा निवडणुकीतही हा फरक स्पष्टपणे दिसून येत आहे. लोकसभेत राष्ट्रवादीला केवळ चार जागा मिळाल्या होत्या. मात्र, या चौघांमध्ये त्याची कामगिरी अत्यंत वाईट राहिली आणि केवळ एकच जागा जिंकली. दुसरीकडे शिवसेनेच्या शिंदे गटाने 15 जागांवर निवडणूक लढवली आणि सात जागा जिंकल्या.
फक्त 40 आमदारांच्या संख्याबळावर एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्रीपदही मिळवले. त्यानंतर विधानसभा निवडणुकीतही शिंदे गटाने आपले वर्चस्व दाखवत जवळपास 85 जागा मिळवल्या. तर भाजप जवळपास 148 जागांवर निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे. पण दुसरीकडे अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला केवळ 51 जागांच मिळाल्या आहेत. अशा पद्धतीने त्यांना अनेक ठिकाणी तडजोड करावी लागत आहे.
हेही वाचा: स्ट्रोकच्या रुग्णांसाठी आधुनिक उपचारांचे वरदान, कोणते आहेत पर्याय
अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला अनेक जागांवर तडजोड करावी लागत आहे. तर दुसरीकडे आपण भाजपसमोर जास्तच नमते घेत आहोत, अशी राष्ट्रवादीतील एक गट मानू लागला आहे. महायुतीत त्यांना योग्य स्थान मिळत नसल्याचा दावाही अनेक नेत्यांकडू केला जातआहे.
त्यातच, महायुतीतल पक्षश्रेष्ठींचा दबाव असतानाही अजित पवार यांनी शेवटच्या क्षणी नवाब मलिक यांना तिकीट दिल. दोन वर्षांपूर्वी नवाब मलिक आणि भाजपमध्ये झालेले आरोप प्रत्यारोपामुळे राजकारण चांगलेच तापले होते. त्यामुळे नवाब मलिकांना तिकीट देण्यास महायुतीच्या पक्ष श्रेष्ठींचा विरोध होता. तरीही शेवटच्या क्षणी तिकीट देण्यात आले. भाजपच्या दबावाखाली नवाब मलिक यांना बाजूला केल्यास अल्पसंख्याक समाजात चुकीचा संदेश जाईल, असे अजित पवार आणि पक्षाच्या रणनीतीकारांचे मत आहे. ते पक्षापासून दूर जातील आणि त्याचे परिणाम विधानसभा निवडणुकीत दिसून येतील, त्यामुळेच अजित पवारांनी महायुतीचा विरोध डावलून नवाब मलिकांना तिकीट दिल्याचे दिसत आहे.
हेही वाचा: चिंचनेर वंदन गावाचे होतंय सर्वत्र कौतुक; गावकऱ्यांनी घेतला फटाकेमुक्त दिवाळी साजरी