Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

IT Engineer Protest: लाखो रुपये टॅक्स घेता मग….? महापालिका, ‘PMRDA’ विरुद्ध हजारो इंजिनिअर्स रस्त्यावर

तेवीसहून अधिक गृहनिर्माण सोसायट्यांतील  हजारहून अधिक रहिवासी हवा प्रदूषण विरोधी मुकमोर्चात प्रशासनाचा निषेधार्थ तोंडाला काळे मास्क व हाताला लाल रिबन बांधून सहभागी झाले होते.

  • By तेजस भागवत
Updated On: Mar 08, 2025 | 04:22 PM
शिवरायांच्या पुतळ्याची राहुरीत विटंबना

शिवरायांच्या पुतळ्याची राहुरीत विटंबना

Follow Us
Close
Follow Us:

पिंपरी: भर लोकवस्तीतील आरएमसी प्लांटमुळे श्वास घेणे अवघड झालय, शुद्ध हवा नाहीसी झाली, श्वसन आणि त्वचा विकार जडताहेत, अवजड वाहनांच्या वर्दळीमुळे अपघातात वाढले यावर ठोस उपाय करावते म्हणून वारंवार महापालिका, पीएमआरडीए आणि प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे पाठपुरावा करूनही कोणीच दखल न घेतल्याने अखेर लाखो रुपये टॅक्स देणाऱ्या हजारो आयटी अभियंत्यांनी शनिवारी (ता. ८) रस्त्यावर उतरत मू मुकमोर्चा काढून प्रशासनाचा निषेध केला.

तेवीसहून अधिक गृहनिर्माण सोसायट्यांतील  हजारहून अधिक रहिवासी हवा प्रदूषण विरोधी मुकमोर्चात प्रशासनाचा निषेधार्थ तोंडाला काळे मास्क व हाताला लाल रिबन बांधून सहभागी झाले होते. सिमेंट मिक्स धुळ आणि बांधकामाच्या धुळीमुळे वाढलेल्या प्रदूषणाच्या विरोधात आवाज उठवत स्वच्छ, निरोगी पर्यावरणाची मागणी करण्यात आली. वाकड-ताथवडे हौसिंग सोसायटीज फोरम यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा कोहिनूर कोर्टयार्ड वन सोसायटीपासून इंदिरा स्कूल मार्गे वाकडकर चौकात
सांगता झाली. महिला दिनाच्या दिवशी सकाळी साडे आठ वाजता ताथवडे-मारुंजी रस्त्यावरून निघालेल्या या मूकमोर्चात शेकडो महिलांसह ज्येष्ठ नागरिक, लहान मुलेही मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

नको धूळ शुद्ध हवा आमचा अधिकार, प्रशासन झोपले-नागरिक त्रासले,प्रशासनाने हवेतील विष कमी करावे, प्रशासन सुस्त-नागरिक त्रस्त, पीएमआरडीए, महापालिका व प्रदूषण नियंत्रण मंडळ जागे व्हा!, आमच्या जीवाशी खेळू नका, आम्ही कर भरतो, धूळ खाण्यासाठी नाही. अशा आशयाचे विविध फलक हातात धरून रहिवाशी मोर्चात सहभागी झाले होते. अत्यंत शांततेत निघालेल्या या मुकमोर्चात वाहतुकीला आणि विद्यार्थ्यांना त्रास होऊ नये म्हणून स्वयंसेवकांनी सर्वतोपरी काळजी घेतली होती. अनुचित प्रकार घडून नये म्हणून पोलिसांचाही बंदोबस्त तैनात होता

प्रमुख मागण्या

पिंपरी-चिंचवड महापालिका, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ पीएमआरडीए, स्थानिक लोकप्रतिनिधींकडे अनेक वेळा तक्रारी करूनही ठोस कारवाई नाही.

नैसर्गिक जीवनमानावर परिणाम: सिमेंटच्या धुळीचा थर रस्त्यांवर, गाड्यांवर आणि घरांवर साचत असून नागरिकांचे जीवनमान ढासळत आहे.

सिमेंट मिक्स धूळ त्वरित बंद व्हावी.

वाढत्या प्रदूषणावर नियंत्रण ठेवण्यासाठी कडक नियम आणि उपाययोजना कराव्यात.

वायू प्रदूषण पातळीची नियमित तपासणी करून अहवाल सार्वजनिक करावा.

रस्त्यांची नियमित २ वेळा साफसफाई करून धुळीचे प्रमाण कमी करावे.

नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनावर कठोर कारवाई व्हावी

रस्त्यांवरील धूळ कमी करण्यासाठी टँकर, एअर गनद्वारे नियमितपणे पाण्याचा फवारा केला जावा

प्रदूषणामुळे नागरिकांच्या आरोग्यावर होणाऱ्या परिणामांचा अभ्यास करून आवश्यक ती आरोग्यसेवा पुरवावी.

रस्त्यांवरील झाडांची देखभाल करुन नियमित पाणी द्यावे

PCMC News: पिंपरीत पोलिसाचा प्रताप: 12 च्या ठोक्याला पोलिस स्टेशनसमोर केले सेलिब्रेशन; पोलिस आयुक्तांनी थेट…

वाकड-ताथवडे हौसिंग सोसायटीज फोरमच्या नियोजनाखाली आंदोलनाच्या माध्यमातून नागरिकांनी स्वच्छ आणि निरोगी पर्यावरणासाठी लढा सुरूच ठेवण्याचा निर्धार केला आहे. जर तातडीने उपाययोजना केल्या नाहीत, तर हे आंदोलन आणखी तीव्र केले जाईल. स्वच्छ हवा आपला हक्क आहे  आणि तो मिळेपर्यंत आम्ही लढत राहू!
– अशोक साळुंखे
रहिवासी, इलाईट होम्स सोसायटी

हवा प्रदूषणाचा वाढता स्तर धोकादायक आहे. सिमेंट मिक्स धूळ आणि रस्त्यावरील अवजड वाहनांमुळे होणाऱ्या प्रदूषणामुळे परिसरातील हवेची गुणवत्ता अत्यंत खालावली असून श्वसनाचे आजार वाढत आहेत. आरोग्यावर गंभीर परिणाम होत असून परिसरातील लहान मुले, वृद्ध आणि गरोदर महिलांमध्ये दम्याचे, अॅलर्जीचे आणि श्वसनासंबंधी आजारांचे प्रमाण वाढत आहे.
– दिप्ती मिश्रा
रहिवासी, ईशा झेनेथ सोसायटी

या  सोसायट्यांचा सहभाग

ईलाईट होम्स, डीएनव्ही एलविरा, स्वप्नलोक, आय ट्रेंड लाईफ, व्हिजन यस, एथोस, कुमार पिक्काडिल्ली, बेलेझा, कोहिनूर कोर्टयार्ड, बोनह्युर, फॉर्च्यून १०८, पनाशे, सुंदरम रिसीडेन्सी, श्री रॉयल, ट्रिनिटी ग्रीन्स, सेरा बेल्ला, अकॉर्न पार्क, ईशा फुटप्रिंट, साई लुक्सुरिआ ऐस ऑलमाइटी, टुलीप, ब्लू मॉन्ट, साई मिरॅकल

Web Title: It engineer protest against rmc plant air pollution pcmc corporation pmrda pollution control board news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 08, 2025 | 04:18 PM

Topics:  

  • Air Pollution
  • PCMC News
  • Protester

संबंधित बातम्या

Dussehra: विजयादशमीच्या मुहूर्तावर सोन्याला झळाळी…; सराफ बाजारात मोठ्या प्रमाणावर ग्राहकांची गर्दी
1

Dussehra: विजयादशमीच्या मुहूर्तावर सोन्याला झळाळी…; सराफ बाजारात मोठ्या प्रमाणावर ग्राहकांची गर्दी

आमदार शंकर जगताप ‘ॲक्शन मोडवर, भुजबळ चौक ते भूमकर चौकातील कामं करणार ‘फास्ट ट्रॅक’वर
2

आमदार शंकर जगताप ‘ॲक्शन मोडवर, भुजबळ चौक ते भूमकर चौकातील कामं करणार ‘फास्ट ट्रॅक’वर

PoK protests : इस्लामाबाद हादरले! पाकव्याप्त काश्मीरमध्ये निदर्शने नियंत्रणाबाहेर; 38 कलमी मागण्यांसह हजारो लोक उतरले रस्त्यावर
3

PoK protests : इस्लामाबाद हादरले! पाकव्याप्त काश्मीरमध्ये निदर्शने नियंत्रणाबाहेर; 38 कलमी मागण्यांसह हजारो लोक उतरले रस्त्यावर

PoK Shutdown : फोन बंद, रस्ते ओसाड आणि 3,000 सैनिक तैनात; पाकिस्तानच्या पीओकेमध्ये काही अघटित घडण्याचे संकेत
4

PoK Shutdown : फोन बंद, रस्ते ओसाड आणि 3,000 सैनिक तैनात; पाकिस्तानच्या पीओकेमध्ये काही अघटित घडण्याचे संकेत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.