Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • women premier league |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

तुरुंगात सर्वच कैद्यांना खाट, गादी देणे शक्य नाही, विशेष न्यायालयाने नोंदवले निरीक्षण

आदेशानुसार, कारागृह प्रशासनाकडून विरोध कऱण्यात आला होता. कारागृह नियमावली अशी तरतूद नसल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात आले. तसेच मुख्य वैद्यकीय अधिकारी (सीएमओ) यांच्या अहवालानुसार कदम यांना खाट, गादी आणि उशीची गरज नसल्याचेही नमूद करण्यात आले होते. अहवालात पुढे सांगण्यात आले होते की, १७ सामान्य बॅरक आणि १२६ स्वतंत्र खोल्या असलेल्या कारागृहात १,१०५ क्षमतेच्या तुलनेत ४५५३ कैदी आहेत.

  • By Sunil Chavan
Updated On: Jul 23, 2022 | 10:01 PM
तुरुंगात सर्वच कैद्यांना खाट, गादी देणे शक्य नाही, विशेष न्यायालयाने नोंदवले निरीक्षण
Follow Us
Close
Follow Us:

मुंबई – राज्याभरातील सर्व कारागृहे ही कैदंयांनी भरील आहेत. त्यामुळे अपवादात्मक प्रकऱणे वगळता प्रत्येक कैद्याला खाट, गादी आणि उशी देणे शक्य नाही, असे निरीक्षण नोंदवत मुंबई सत्र न्यायालयाच्या विशेष न्यायालयाने माजी आमदार रमेश कदम यांची याचिका फेटाळून लावली.

राज्यशासित साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाशी संबंधित आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी माजी आमदार रमेश कदम २०१५ पासून ठाण्यातील कारागृहात आहेत. त्यांना २०१८ पासून पाठीचा त्रास होत आहे. वेदना असहाय्य होत असल्याचा दावा करत खाट, गादी आणि उशी देण्याची विनंती करणारी याचिका कदम यांनी विशेष न्यायालायत केली होती. विशेष न्यायाधीश आर एन रोकडे यांच्यासमोर सुनावणी पार पडली. त्या सुनावणीचा तपशीलवार आदेश शनिवारी उपलब्ध करून देण्यात आला.

आदेशानुसार, कारागृह प्रशासनाकडून विरोध कऱण्यात आला होता. कारागृह नियमावली अशी तरतूद नसल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात आले. तसेच मुख्य वैद्यकीय अधिकारी (सीएमओ) यांच्या अहवालानुसार कदम यांना खाट, गादी आणि उशीची गरज नसल्याचेही नमूद करण्यात आले होते. अहवालात पुढे सांगण्यात आले होते की, १७ सामान्य बॅरक आणि १२६ स्वतंत्र खोल्या असलेल्या कारागृहात १,१०५ क्षमतेच्या तुलनेत ४५५३ कैदी आहेत. कैद्यांच्या संख्येत वाढ झाली आहे आणि प्रत्येक कैदीच्या मागण्या पुरवल्या जाऊ शकत नाहीत, कैद्यांना झोपण्यासाठी पुरेशी जागा नाही आणि आरोपींना न्यायालयात आणि रुग्णालयात हजर करण्यासाठी पोलिस रक्षकही उपलब्ध नाहीत, असे अहवालात म्हटले आहे. तसेच कारागृहातील २२ कैदी आंदोलनावर आहेत, १४ पुरुष आणि महिला कैद्यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. उपरोक्त परिस्थितीमुळे, कैद्यांना तात्पुरत्या कालावधीसाठी कारागृहात पहिल्या मजल्यावर बाल्कनीमध्ये झोपण्याची परवानगी आहे. तसेच जर कदम यांना खाट, गादी आणि उशीची सुविधा दिली तर इतर कैद्यांनी परवानगी द्यावी लागेल किंवा ते मागणी करू शकतात, असेही अहवालात म्हटले आहे.

त्याची दखल घेत सीएमओच्या अहवालावरून कदम यांना ठाण्यातील कारागृह रुग्णालयात योग्य उपचार दिले जात आहेत. आरोपींना खाट, गादी आणि उशी देण्याचे हे प्रकरण वाटत नाही. कारागृह कैद्यांनी तुडुंब भरले आहे, यात शंका नाही. त्यामुळे अपवादात्मक प्रकरणांशिवाय प्रत्येक कैद्याला खाट, गादी आणि उशी देणे शक्य नाही, असे नमूद करत न्यायालयाने कदम यांची याचिका फेटाळून लावली.

Web Title: It is not possible to provide cots and mattresses to all the prisoners in the jail the special court observed

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 23, 2022 | 10:01 PM

Topics:  

  • Mumbai News
  • ramesh kadam

संबंधित बातम्या

Maharashtra Politics: शरद पवारांना मोठा धक्का! माजी आमदार रमेश कदम यांनी पक्षाला दिली सोडचिठ्ठी
1

Maharashtra Politics: शरद पवारांना मोठा धक्का! माजी आमदार रमेश कदम यांनी पक्षाला दिली सोडचिठ्ठी

मुंबईचा भयमुक्त महानगराचा नवा अध्याय
2

मुंबईचा भयमुक्त महानगराचा नवा अध्याय

निवडणुकीच्या आखाड्यात ‘एआय’ अन् सुपरहिरोंज; मुंबईत भाजकडून जोरदार प्रचार सुरु
3

निवडणुकीच्या आखाड्यात ‘एआय’ अन् सुपरहिरोंज; मुंबईत भाजकडून जोरदार प्रचार सुरु

भविष्यातील आव्हाने अन् शाश्वत विकास; मुंबईसाठी महायुतीचा मास्टर प्लॅन
4

भविष्यातील आव्हाने अन् शाश्वत विकास; मुंबईसाठी महायुतीचा मास्टर प्लॅन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.