
दिवाळीत 'लालपरी' थांबणार? एसटी कर्मचाऱ्यांचा ६ नोव्हेंबरपासून राज्यव्यापी संपाचा इशारा
एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रमुख ३ मागण्या काय आहेत ?
वाहतूक विस्कळीत होण्याची मोठी शक्यता
दिवाळीच्या काळात चाकरमानी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने आपल्या गावी परतत असतात. अशावेळी एसटी गाड्यांना सर्वाधिक गर्दी असते. जर सरकारने एसटी कर्मचाऱ्यांच्या या मागण्यांवर वेळीच तोडगा काढला नाही आणि कर्मचारी ६ नोव्हेंबरला संपावर गेले, तर संपूर्ण महाराष्ट्रातील रस्ते वाहतूक आणि एसटीची सेवा पूर्णपणे विस्कळीत होईल. यामुळे ऐन सणासुदीत सर्वसामान्यांचे प्रचंड हाल होऊ शकतात.
परिवहन मंत्र्यांनी मागणी फेटाळली
दुष्काळाच्या झळांनी होरपळणारा शेतकरी, महागाईमुळे आर्थिक ओढाताण सहन करणारा सर्वसामान्य नागरिक आणि कुटुंबाचा उदरनिर्वाह करताना होणारी दमछाक, अशा परिस्थितीत जनतेवर भाडेवाढीचा अतिरिक्त भार कशासाठी, असा सवाल उपस्थित करत परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिवाळीच्या गर्दीच्या हंगामासाठी प्रस्तावित केलेली १५ टक्के हंगामी भाडेवाढ नामंजूर केली.
दरवर्षी दिवाळीच्या गर्दीच्या काळात एसटीच्या प्रवासी भाड्यात हंगामी वाढ केली जाते. यंदाही १ ते १५ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत प्रवासी भाड्यात सरसकट १५ टक्के वाढ करण्याचा प्रस्ताव एसटी प्रशासनाने मंत्री सरनाईक यांच्याकडे सादर केला होता. मात्र, आधीच आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या जनतेवर आणखी भार टाकणे योग्य नसल्याची भूमिका घेत त्यांनी हा प्रस्ताव फेटाळून लावला.
‘आधीच संकटांनी घेरलेल्या जनतेला भाडेवाढीचा चटका देऊन त्यांच्या जखमेवर मीठ चोळणे मला मान्य नाही,’ असे स्पष्ट करत त्यांनी जनहिताला प्राधान्य दिले.
(डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.