
Jalgaon News: वाळूमाफियांचं धाबं दणाणलं! (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)
भडगाव (वा.) भडगाव तालुक्यातील वाक येथील गिरणा नदीपात्रात सुरू असलेल्या कथित अवैध वाळ उपशाविरोधात महसूल प्रशासनाने मध्यरात्री धडक कारवाई केली. तहसीलदार शीतल सोलाट यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलेल्या या कारवाईत तब्बल ७ डंपर, २ जेसीबी आणि ३ ट्रॅक्टर जप्त करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. Jalgaon News:
या कारवाईमुळे तालुक्यातील वाळू उपसा करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. गिरणा नदीपात्रात वाळू उपशाचा प्रश्न गेल्या काही काळापासून चर्चेत असून, रात्रीच्या अंधारात वाळू उत्खनन आणि वाहतूक होत असल्याच्या तक्रारी नागरिकांकडून केल्या जात आहेत.
१ ऑक्टोबर रोजी पहाटेच्या सुमारास वाक येथील गिरणा नदीपात्रात वाळू उपसा व वाहतूक सुरू असल्याची माहिती प्रशासनाला मिळाली. त्यानंतर महसूल विभागाच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. यावेळी नदीपात्रात वाळू उपसा व वाहतुकीसाठी वापरली जाणारी वाहने आढळून आली. प्रशासनाने कारवाई करत डंपर, जेसीबी आणि ट्रॅक्टर ताब्यात घेतले.
Jalgaon News: रावेर तालुक्यात नेमकं चाललंय काय? ९ महिन्यांत ९५ …
या कारवाईदरम्यान तहसीलदार शीतल सोलाट यांनी पोलीस निरीक्षक महेश टाक यांच्याशी संपर्क साधून पोलीस बंदोबस्ताची मदत घेतल्याचे वृत्त आहे. जप्त केलेली वाहने तहसील कार्यालयात जमा करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे. जप्त वाहनांचे मालक, चालक आणि त्यांच्याकडील परवान्यांची पडताळणी करून पुढील कायदेशीर कारवाई करणे आवश्यक आहे.
दरम्यान, गिरड-मांडकी परिसरातही अवैध वाळू उत्खननाविरोधात स्वतंत्र कारवाई करण्यात आल्याचे वृत्त आहे. मंडळ अधिकारी दिनेश येडे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने मांडकी येथून अवैध वाळू उत्खननासाठी वापरला जात असल्याचा संशय असलेला एक ट्रॅक्टर पकडून तहसील कार्यालयात जमा केल्याची माहिती आहे.
तिसऱ्या कारवाईत दुसऱ्या दिवशी रात्री दोन डंपर वाहनांच्या मर्यादपेक्षा जास्त लोड अवैध वाळू उपसा करून घेऊन जाणारे टाटा कंपनीचे पांढऱ्या रंगाचे दोन हायवा डंपर भङगाव तहसीलदार शितल सोलाट यांच्या नेतृत्वाखाली मध्यरात्री पकडण्यात आले. या कारवाईत सुधीर सोनवणे, राजश्री जानराव, भरत पाटील, व्ही. सी. पाटील, शितल राजपूत, प्रियंका शिंदे, लोकेश महाजन, प्रसाद दुस्कर, विशाल सूर्यवंशी, वाहन चालक स्वप्निल महाले यांचा समावेश होता.
न्यायालयात दावा दाखल केल्याने घरावर दगडफेक; केंदूरच्या शिळकवाडीतील …
गिरणा नदीपात्रातील काही भागांत वारंवार अवैध वाळू उत्खनन होत असल्याच्या तक्रारी आहेत. अशा प्रकारांमुळे नदीपात्राच्या नैसर्गिक रचनेवर, पर्यावरणावर आणि सार्वजनिक मालमतेवर परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे केवळ वाहने जप्त करून थांबण्याऐवजी अवैध उत्खननाचे मूळ शोधणे, संबंधित व्यक्तींची भूमिका तपासणे आणि पुन्हा असे प्रकार घडणार नाहीत यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करण गरजेचे आहे.