Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 10 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Jalgaon News: डोळ्यांदेखत फळबागा करपल्या; बोदवडच्या शेतकऱ्यांना आता मदतीची आस

Jalgaon News: बोदवड तालुक्यात गेल्या दोन महिन्यांपासून पावसाने दडी मारल्याने बहुवर्षीय फळबागा जगविण्याचे संकट फळबागायतदार शेतकऱ्यांसमोर उभे राहिले आहे. लिंबू, मोसंबी, सीताफळ आणि पेरूच्या बागांना पाणीटंचाईचा मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.

  • By Riddhi Vanne
Updated On: Oct 10, 2026 | 07:02 PM
Jalgaon (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Jalgaon (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Follow Us
Follow Us:

बोदवड (वा.) तालुक्यात पावसाने दीर्घकाळ दडी मारल्याने बहुवर्षीय फळबागा जगविण्याचे मोठे संकट शेतकऱ्यांसमोर उभे ठाकले आहे. लिंबू, मोसंबी, सीताफळ आणि पेरूच्या बागांना पाण्याअभावी मोठा फटका बसण्याची शक्यता असून, या बागा वाचविण्यासाठी जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी विशेष नियोजन करून पालकत्व स्वीकारावे, अशी मागणी फळबागायतदार शेतकऱ्यांनी केली आहे. Jalgaon News:

फळबागांना पाणी उपलब्ध

अन्यथा अनेक वर्षांच्या मेहनतीतून उभ्या राहिलेल्या फळबागा नामशेष होण्याची भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली. गुरुवारी (८ ऑक्टोबर) आमदगाव-बोदवड परिसरातील सिंचन प्रकल्पावर जिल्हाधिकारी रोहन घुगे यांची फळबागायतदार शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाने भेट घेतली. यावेळी डॉ. प्रवीण पाटील, अविनाश पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे तालुकाध्यक्ष आबा पाटील, मुन्ना पाटील, आमदगावचे सरपंच संभाजी पारधी आणि माजी सरपंच मनोज बोदडे उपस्थित होते. गेल्या दोन महिन्यांपासून पावसाने दडी मारल्यामुळे जमिनीतील ओलावा कमी होत असून, फळबागांना पाणी उपलब्ध करून देणे कठीण झाले आहे. आगामी काळातही पुरेसा पाऊस न झाल्यास पुढील अनेक महिने या बागा जगविणे हेच मोठे आव्हान ठरणार आहे.

Jalgaon News: ग्रामरोजगार सेवकांचा एल्गार! २४ महिन्यांचे थकीत …

जिल्हास्तरावर विशेष बैठक घेणार…

दुष्काळाच्या पहिल्या ट्रिगरमध्ये भुसावळ विभागाचे प्रांताधिकारी जितेंद्र पाटील, बोदवडचे तहसीलदार ज्ञानेश्वर सपकाळे आणि तालुका कृषी अधिकारी अनिल गावित यांनी केलेल्या कामाबद्दल शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले. आता जिल्हास्तरावरही फळबागांच्या संरक्षणासाठी ठोस पावले उचलण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली.

यावर जिल्हाधिकारी रोहन घुगे यानी जिल्हास्तरावर महसूल विभाग आणि जिल्हा कृषी विभागाची लवकरच नियोजन बैठक घेऊन आवश्यक उपाययोजनाबाबत निर्णय घेण्यात येतील, असे आश्वासन दिले. त्यामुळे आता या बैठकीतून फळबागायतदार शेतकऱ्यांना प्रत्यक्ष दिलासा देणाऱ्या उपाययोजना कितपत वैगाने राबवल्या जातात, याकडे तालुक्यातील शेतक-यांचे लक्ष लागले आहे..

तातडीच्या उपाययोजनेची मागणी

शासनाच्या पंचनामे आणि मदत वितरणाच्या प्रक्रियेला वेळ लागू शकतो. त्यामुळे केवळ नुकसानभरपाईच्या प्रतीक्षेत न राहता फळबागा जगविण्यासाठी तातडीने प्रत्यक्ष उपाययोजना करणे आवश्यक असल्याचे शेतकऱ्यांनी स्पष्ट केले. जमिनीतील ओलावा टिकवून ठेवण्यासाठी बागांमध्ये वीड मॅट व मल्चिंगचा वापर, झाडांच्या खोडांना बोडों पेस्ट लावणे, बाष्पीभवन कमी करणाऱ्या फवारण्या करणे, पाणीटंचाईच्या भागांत टँकरने पाणीपुरवठा करणे तसेच शेततळ्यांची निर्मिती करणे, अशा उपाययोजना राबविण्याची मागणी केली.

Jalgaon News: पायांना साखळी, कुलूप अन् तापी नदीत मृतदेह! जोडप्याच्या …

यासोबतच फळपीक विमा योजनेची प्रभावी अंमलबजावणी करून पात्र शेतकऱ्यांना वेळेत लाभ मिळावा, तसेच जिल्हा महसूल प्रशासन आणि कृषी विभागाने समन्वयाने काम करून कृती आराखडा तयार करावा, असे आवाहन आबा पाटील, डॉ. प्रवीण पाटील आणि अविनाश पाटील यांनी केले.

 

Web Title: Bodwad farmers urgent measures save fruit orchards rainfall deficit rv

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 10, 2026 | 07:02 PM

Topics:  

  • Jalgaon News
  • Maharshtra news

संबंधित बातम्या

Jalgaon : “जनता दुष्काळात असताना खडसे कुटुंबीय फुगड्या  खेळत होतं – चंद्रकांत पाटील | Navarashtra
1

Jalgaon : “जनता दुष्काळात असताना खडसे कुटुंबीय फुगड्या खेळत होतं – चंद्रकांत पाटील | Navarashtra

Jalgaon News: पायांना साखळी, कुलूप अन् तापी नदीत मृतदेह! जोडप्याच्या हत्येने खळबळ; नेमकं काय घडलं?
2

Jalgaon News: पायांना साखळी, कुलूप अन् तापी नदीत मृतदेह! जोडप्याच्या हत्येने खळबळ; नेमकं काय घडलं?

Jalgaon News: ग्रामरोजगार सेवकांचा एल्गार! २४ महिन्यांचे थकीत मानधनासाठी कामबंद आंदोलनाचा इशारा
3

Jalgaon News: ग्रामरोजगार सेवकांचा एल्गार! २४ महिन्यांचे थकीत मानधनासाठी कामबंद आंदोलनाचा इशारा

Maharashtra News :भूजल वाढीसाठी जलसंधारणावर भर द्या; हसन मुश्रीफ यांचे प्रशासनाला निर्देश
4

Maharashtra News :भूजल वाढीसाठी जलसंधारणावर भर द्या; हसन मुश्रीफ यांचे प्रशासनाला निर्देश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.