Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 11 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Jalgaon News: रावेर तालुक्यात नेमकं चाललंय काय? ९ महिन्यांत ९५ महिला-मुली बेपत्ता

Jalgaon News: जानेवारी ते सप्टेंबर २०२६ या नऊ महिन्यांत रावेर तालुक्यातील निंभोरा, रावेर आणि सावदा पोलीस ठाण्यांच्या हद्दीतून महिला व मुली बेपत्ता झाल्याच्या घटनांची नोंद झाली आहे. ७८ सज्ञान महिला आणि १७ अल्पवयीन मुलींचा समावेश असून, ८८ महिला-मुलींचा शोध लागला.

  • By Riddhi Vanne
Updated On: Oct 11, 2026 | 01:49 PM
Jalgaon News: (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Jalgaon News: (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Follow Us
Follow Us:
  • महिला-मुली बेपत्ता होण्याच्या घटना
  • बहुतांश प्रकरणांत प्रेमसंबंधांची पार्श्वभूमी
  • अल्पवयीन मुलींच्या प्रकरणांकडे गांभीर्याने पाहण्याची गरज
सावदा रावेर तालुक्यात महिला व मुल बेपत्ता होण्याच्या घटनांची आकडेवारी समो आली असून, ती पालकांसह समाजासाट चिंताजनक ठरणारी आहे. जानेवारी सप्टेंबर २०२६ या नऊ महिन्यातील पोलिसांकडून मिळालेल्या आकडेवारीनुसा रावेर तालुक्यातील निंभोरा, रावेर आणि सावदा पोलीस ठाण्यांच्या हद्दीतून तब्बल ९० महिला व मुली बेपत्ता झाल्याची नोंद झाल् आहे. Jalgaon News

प्रेमविवाहाची पार्श्वभूमी

यामध्ये ७८ सज्ञान महिला आणि १५ अल्पवयीन मुलींचा समावेश आहे. यापैकी ८८ महिला-मुलींचा शोध लागून त्य परत आल्या आहेत, तर सात प्रकरणे अद्या बाकी आहेत. विशेष म्हणजे, उपलब्ध माहितीनुसार बहुतांश प्रकरणांमध्ये प्रेमसंबंध अथवा प्रेमविवाहाची पार्श्वभूमी असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे ही आकडेवारी केवळ पोलिसांच्या नोंदवहीपुरती मर्यादित न राहता बदलत्या सामाजिक परिस्थितीचा गंभीर संकेत देणारी ठरत आहे. ही केवळ पोलिसांची आकडेवारी असून बहुतांशी प्रकरण पोलीस स्टेशन बाहेरच सामाजिक सलोख्याने गुंडाळली जात असल्याने पोलीस ठाण्यात त्यांची नोंद नसल्याने प्रकरणे अजून वाढू शकतात.

१७ अल्पवयीन मुलींमुळे पालकांसाठी चिंता

या आकडेवारीतील सर्वाधिक चिंतेची बाब म्हणजे १७ अल्पवयीन मुली बेपत्ता झाल्याची नोंद आहे. त्यापैकी १६ मुलींचा शोध लागला असला, तरी अल्पवयीन मुली घरातून निघून जाण्याच्या घटना गंभीरपणे घेण्याची गरज आहे. किशोरवयातील भावनिक आकर्षण, प्रेमसंबंध, मोबाईल आणि सोशल मीडियाचा वाढता वापर, पालकांशी संवादाचा अभाव तसेच कुटुंबातील दुरावा यांसारख्या विविध कारणांकडे समाजाने गांभीर्याने पाहण्याची आवश्यकता आहे.

Jalgaon News: डोळ्यांदेखत फळबागा करपल्या; बोदवडच्या शेतकऱ्यांना …

निंभोरा गावातूनः ३२ महिला-मुली बेपत्ता

निंभोरा पोलिस ठाण्याच्या हद्दीत नऊ महिन्यांत २७सज्ञान महिला बेपत्ता झाल्या. त्यापैकी २४ महिलांचा शोध लागला आहे. तर ५ अल्पवयीन मुली बेपत्ता झाल्या असून या सर्व पाचही मुली परत आल्या आहेत.

रावेर : ३६ तर सावद्यात २७ महिला-मुली बेपत्ता

रावेर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ३० सज्ञान महिला बेपत्ता झाल्या असून त्यापैकी २९ महिला परत आल्या आहेत. याशिवाय ६ अल्पवयीन मुली बेपत्ता झाल्या. त्यापैकी ५ मुलींचा शोध लागला आहे. सावदा पोलीस ठाण्याच्या हद्दीत २१ सज्ञान महिला बेपत्ता झाल्या असून त्यापैकी १९ महिला परत आल्या आहेत. तसेच ६ अल्पवयीन मुली बेपत्ता झाल्या होत्या. या सर्व सहाही मुलींचा शोध घेण्यात आला आहे.

Jalgaon News: ग्रामरोजगार सेवकांचा एल्गार! २४ महिन्यांचे थकीत …

प्रेमसंबंध, प्रेमविवाहाची पार्श्वभूमी चर्चेत

बेपत्ता झालेल्या महिला-मुलींच्या प्रकरणाचा तपास करताना बहुतांश प्रकरणांमध्ये प्रेमसंबंध किंवा प्रेमविवाहाची पार्श्वभूमी असल्याची माहिती समोर येत आहे. काही महिला व मुलींनी कुटुंबीयाना न सांगता आपल्या पसंतीच्या व्यक्तीसोबत जाण्याचा निर्णय घेतल्याचेही आढळते. मात्र, प्रत्येक बेपत्ता प्रकरणामागे प्रेमसंबंध किंवा प्रेमविवाहच कारण आहे, असे सरसकट म्हणता येणार नाही, प्रत्येक प्रकरणाची स्वतंत्र चौकशी करून नेमके कारण समोर आणणे आवश्यक आहे.

 

Web Title: Raver taluka missing women girls cases 2026 rv

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 11, 2026 | 01:49 PM

Topics:  

  • crime news marathi
  • Jalgaon News
  • Maharshtra news

संबंधित बातम्या

Jalgaon News: डोळ्यांदेखत फळबागा करपल्या; बोदवडच्या शेतकऱ्यांना आता मदतीची आस
1

Jalgaon News: डोळ्यांदेखत फळबागा करपल्या; बोदवडच्या शेतकऱ्यांना आता मदतीची आस

Jalgaon : “जनता दुष्काळात असताना खडसे कुटुंबीय फुगड्या  खेळत होतं – चंद्रकांत पाटील | Navarashtra
2

Jalgaon : “जनता दुष्काळात असताना खडसे कुटुंबीय फुगड्या खेळत होतं – चंद्रकांत पाटील | Navarashtra

Jalgaon News: पायांना साखळी, कुलूप अन् तापी नदीत मृतदेह! जोडप्याच्या हत्येने खळबळ; नेमकं काय घडलं?
3

Jalgaon News: पायांना साखळी, कुलूप अन् तापी नदीत मृतदेह! जोडप्याच्या हत्येने खळबळ; नेमकं काय घडलं?

Jalgaon News: ग्रामरोजगार सेवकांचा एल्गार! २४ महिन्यांचे थकीत मानधनासाठी कामबंद आंदोलनाचा इशारा
4

Jalgaon News: ग्रामरोजगार सेवकांचा एल्गार! २४ महिन्यांचे थकीत मानधनासाठी कामबंद आंदोलनाचा इशारा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.