Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 2 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Ashadhi Ekadashi |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Jalgaon News: भिशीच्या नावाखाली २० लाखांना गंडविले! नेमकं काय घडलं?

Jalgaon News: शहरातील टीएम नगरात राहणाऱ्या आयुषी दीपक बुटवाणी (रा.टीएमनगर) यांचे सिंधी कॉलनीत रेडीमेड कपड्यांचे दुकान आहे. आदर्शनगरात राहणारी संशयित गितादारा ही महिला त्यांच्याकडे खरेदीसाठी येत होती.

  • By Riddhi Vanne
Updated On: Aug 02, 2026 | 02:58 PM
Jalgaon News: भिशीच्या नावाखाली २० लाखांना गंडविले(फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Jalgaon News: भिशीच्या नावाखाली २० लाखांना गंडविले(फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Follow Us
Follow Us:
  • जळगावात लकी ड्रॉ भिशीच्या नावाखाली २० जणांची फसवणूक.
  • गुंतवणूकदारांचे सुमारे २० लाख ८ हजार रुपये अडकल्याचा आरोप.
  • रामानंद नगर पोलिसांत गुन्हा दाखल; आरोपी महिला फरार.
Jalgaon News: जळगावात हजार रुपये प्रति महिन्याप्रमाणे २० महिने लकी ड्रॉ (भीशी) मध्ये गुंतवणुकीवर चांगला परतावा मिळण्याचे अमिष दाखवित गिता निलेश दारा (रा. सरस्वती अपार्टमेंट, आदर्शनगर) या महिलेने २० जणांची २० लाख ८ हजार रुपयात फसवणूक केली. ही घटना सप्टेंबर २०२४ ते मे २०२६ दरम्यान घडली. ही महिला अशा पद्धतीने तीन वेगवेगळ्या पद्धतीने भिशी चालवित असल्याने तीने अनेक जणांना गंडविल्याचा संशय असून गुन्हा दाखल करण्यापुर्वीच ती महिला पसार झाली आहे. याप्रकरणी रामानंद नगर पोलिसात गुन्हा दाखल केला आहे

भिशीतून चांगला परतावा मिळविण्याचे आमिष

शहरातील टीएम नगरात राहणाऱ्या आयुषी दीपक बुटवाणी (रा.टीएमनगर) यांचे सिंधी कॉलनीत रेडीमेड कपड्यांचे दुकान आहे. आदर्शनगरात राहणारी संशयित गितादारा ही महिला त्यांच्याकडे खरेदीसाठी येत होती. यावेळी त्या महिलेने बुटवाणी यांच्यासोबत ओळख करुन त्यांना भिशीतून चांगला परतावा मिळविण्याचे आमिष दाखवत लकी ड्रॉ भिशीमध्ये गुंतवणुक करण्यास सांगितले. गीता दारा ही महिला २०२४ पासून भिशी (चिट फंड) चालवत होती. बुटवाणीसह अनेक जणांचा विश्वास संपादन केल्यानंतर त्या सर्वांनी त्या महिलेवर विश्वास ठेवून सप्टेंबर २०२४ पासून दरमहा नियमितपणे पैसे भरणे सुरू केले.

गुंतवणुकीच्या माध्यमातून यांची झाली फसवणूक….

भिशीच्या माध्यमातून ओम रविंद्र माळी (४० हजार), पुर्णिमा अनिल हसवानी (६८ हजार), मनोज दिगंबर चौधरी (२६ हजार), लक्ष्मी कारडा (४० हजार), पिंकी विजय हेमनानी (१ लाख ८ हजार), काजल संजय ललवाणी (५ लाख), चंद्रकांत रामदास जोशी (४० हजार), दिव्या भिमराव पवार (६० हजार), सुलक्षणा व शामकांत पवार (९८ हजार), निशा दिनेश ओचांनी (६० हजार), दिलीप कुमार तैओमलन (१ लाख), निलेश तुकाराम सोनवणे (२० हजार), सागर सुमिल महाजन (१ लाख २८ हजार), सिमा सुनिल अडवाणी (२ लाख), सोनी दिपक घुगे (३० हजार), सविता विनोद हटकर (३० हजार), मीना राजु पुगे (३० हजार), मुस्कान वालेचा (१ लाख ७४ हजार), जय नरेश राजपाल (४० हजार), गजानन शंकर पाटील (२ लाख १३ हजार) यांचा समावेश आहे.

Jalgaon News: जळगावाला पावसाने झोडपलं, रस्त्यांना नद्यांचे स्वरुप

लकी ड्रॉ निघत नसल्याने महिलेवर संशय बळावला

भिशी भरणाऱ्यांऐवजी नातेवाईकांचाच लागला नंबर २०२४ मध्ये सुरु झालेली लकी ड्रॉची ही भिशी में २०२६ मध्ये पूर्ण होणार होती. मात्र, संपूर्ण मुदत संपत आली तरी भिशी भरणाऱ्या कोणत्याही सामान्य सदस्यांचा नंबर लागलेला नव्हता. भिशीमध्ये गुंतवणुक करणाऱ्या सदस्यांनी ज्यावेळेस आपल्या हक्काचे पैसे व परतावा मागितला, तेव्हा गीता हिने टाळाटाळ करण्यास सुरुवात केली. गीताला फोन केला असता, तिचा नंबर बंद येत होता. पाठपुरावा करुनही 5 भिशीतील रक्कम मिळत नव्हती.

दरम्यान, भिशी काढणाऱ्या 1 काही सदस्य २३ जुलै रोजी सकाळी गीताच्या घरी गेले. मात्र, वे त्या ठिकाणी गीताच्या घराला कुलूप असल्याचे दिसून आले. न तिचे दोन्ही मोबाईल फोनही बंद येत होता, या प्रकरणी २९ जुलै न रोजी आयुषी दीपक बुटवाणी यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन गीता ने दारावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गीता हिने अशाच न प्रकारे आणखीही काही भिश्या चालवल्या असून, तिने 1 अनेकांची आर्थिक फसवणूक केल्याची शक्यता वर्तवली.

Jalgaon News: ‘या’ प्रकरणाने उडवली संस्थाचालक, माजी … – Navarashtra

Web Title: Jalgaon woman allegedly cheats 20 people in 20 lakh investment scam

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 02, 2026 | 02:58 PM

Topics:  

  • maharashtra news

संबंधित बातम्या

D-Martमध्ये धक्कादायक प्रकार! आईस्क्रीममध्ये जे सापडलं ते पाहून ग्राहकाला बसला धक्का
1

D-Martमध्ये धक्कादायक प्रकार! आईस्क्रीममध्ये जे सापडलं ते पाहून ग्राहकाला बसला धक्का

Ahilyanagar News: जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेच्या 107 व्या सभेत राडा; सभेपूर्वी प्रतिसभा, महिला शिक्षिकेला भोवळ
2

Ahilyanagar News: जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेच्या 107 व्या सभेत राडा; सभेपूर्वी प्रतिसभा, महिला शिक्षिकेला भोवळ

Chhatrapati Sambhajinagar: नागरिकांच्या जमिनी अन् गोपनीय डेटा धोक्यात? छत्रपती संभाजीनगरातील ‘या’ शासकीय कार्यालयात एजंटांचे राज्य
3

Chhatrapati Sambhajinagar: नागरिकांच्या जमिनी अन् गोपनीय डेटा धोक्यात? छत्रपती संभाजीनगरातील ‘या’ शासकीय कार्यालयात एजंटांचे राज्य

Rapido RTO Action: रॅपिडो कंपनीच्या संचालकांवर संभाजीनगरात थेट गुन्हा दाखल! अनधिकृत प्रवासी वाहतूक प्रकरणी आरटीओचा मोठा दणका
4

Rapido RTO Action: रॅपिडो कंपनीच्या संचालकांवर संभाजीनगरात थेट गुन्हा दाखल! अनधिकृत प्रवासी वाहतूक प्रकरणी आरटीओचा मोठा दणका

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.